न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहे. तिसऱ्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला बसवलं आहे. तसेच तीन सामन्यात आपली छाप सोडण्यात अपयशी ठरलेल्या भुवनेश्वर कुमारला बसवलं आहे. पण दोन्ही निर्णय क्रीडाप्रेमींना काही रुचले नाहीत. संघ व्यवस्थापनाने असे निर्णय का घेतले? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. कारण वैभव सूर्यवंशीने तिसऱ्या टी20 सामन्यात आक्रमक फलंदाजी केली होती. त्यामुळे त्याला असं बसवल्याने क्रीडाप्रेमींना प्रश्न पडणं सहाजिकच आहे. इशान किशन दुसऱ्या तिसऱ्या टी20 सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याच्या जागी वैभवला संधी मिळाली होती. आता इशान किशन फिट झाला असून त्याचं संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे वैभवला बसवण्याचा निर्णय घेतला.
भुवनेश्वर कुमारचं काय?
भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत सलग तीन विजय मिळवून पकड मिळवली आहे. त्यामुळे आता चौथ्या आणि पाचव्या सामन्यात मालिका गमवण्याचं टेन्शन नाही. अशा स्थितीत संघात बदल करणं अपेक्षित होतं. तसंच कर्णधार श्रेयस अय्यरने केलं. चार वर्षानंतर भुवनेश्वर कुमारचं भारतीय संघात पुनरागमन झालं. पण त्याला मागच्या तीन सामन्यात काही छाप सोडता आली नाही. दुसरीकडे मयंक यादवला मागच्या दोन सामन्यात आराम दिला होता. त्यामुळे ऑकलँडमध्ये भुवनेश्वर कुमारच्या जागी मयंक यादवला संधी दिली आहे.
टी20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची तयारी सुरू झाली आहे. 4 ...
काय म्हणाला श्रेयस अय्यर?
श्रेयस अय्यने मालिका विजयानंतर आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे. श्रेयस अय्यर म्हणाला की, 'आतापर्यंत निकाल काहीही लागला असला तरी तुमचा स्वभाव तसाच असणे महत्त्वाचे आहे. मुलांना तोच संदेश देण्यात आला आहे. प्रसंग कोणताही असो, तुम्ही अविचलित राहिले पाहिजे. मला वाटते की सर्वजण उत्साहात आहेत.या खेळपट्टीबाबत काही सांगता येत नाही. खेळपट्टीवर बऱ्यापैकी गवत आहे, त्यामुळे उसळी आणि सीम मूव्हमेंटची नक्कीच अपेक्षा आहे. आम्ही संघात दोन बदल केले आहेत. वैभवच्या जागी इशान संघात परत आला आहे आणि भुवीच्या जागी मयंक आला आहे.'