Nashik Kumbhmela Live : नाशिकमध्ये आजपासून कुंभमेळ्याचं पर्व सुरू होणार, ध्वजारोहण सोहळ्याचे सर्व अपडेट एका क्लिकवर

नाशिकमध्ये शैव आणि वैष्णवांचा मेळा भरणार आहे. नाशिकमध्ये 12 वर्षानंतर कुंभमेळ्याचं पर्व सुरू होत आहे. गुरू ग्रहाचं 12 राशीत भ्रमण होत असताना सिंह राशीत आला की या पर्वाला सुरूवात होते, म्हणूनच नाशिकच्या कुंभमेळ्याला सिंहस्थ कुंभमेळा संबोधलं जातं.

नाशिकमध्ये 12 वर्षानंतर कुंभमेळ्याचं पर्व सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर या पर्वाला सुरुवात होते. 31 ऑक्टोबर 2026 रोजी, दुपारी 12.02 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर ध्वजारोहण होणार आहे. यानंतर कुंभमेळा पर्वाला अधिकृतरित्या सुरूवात होईल. नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर एकाच वेळी ध्वजारोहण होणार आहे.

 
Live Updates

नाशिक कुंभमेळ्याचं काय आहे वेगळेपण?

देशातील चार ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. पण नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळा थोडा वेगळा असतो. कारण नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त येथे अमृतस्नान होतं. वैष्णव आखाडे प्रभू रामांच्या वनवास स्थळ असलेल्या पंचवटीच्या नाशिकमधील रामकुंडातील गोदावरीच्या पवित्र पात्रात अमृतस्नान करतील. तर शैव आखाडे त्र्यंबकेश्वर अर्थात शिवनगरीतील गोदावरी नदी उगम पावलेल्या कुशावर्त कुंडात अमृतस्नान करतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रामतीर्थ येथे सिंहस्थ महाकुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहणी

गोदावरीच्या पवित्र तीरावर शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचा मंगलमय शुभारंभ होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री रामतीर्थ परिसरास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.


नाशिक कुंभमेळा 21 महिने असणार

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा यावेळी 21 महिन्यांचा असणार आहे. कुंभमेळ्याची सुरूवात 31 ऑक्टोबर 2026 पासून होईल आणि त्याची सांगता 24 जुलै 2028 रोजी होणार आहे. जवळपास दोन वर्षे हा सोहळा चालणार आहे.

नाशिक कुंभमेळा ध्वजारोहण

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ध्वजारोहण दोन स्थानी केलं जातं. नाशिकच्या रामकुंड घाट आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडाजवळ ध्वजारोहण होते. त्यासाठी या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त येथे एकाच वेळी ध्वजारोहण केलं जाणार आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने होणार सिंहस्थाचा शंखनाद, कुंभमेळ्यासाठी नाशिकनगरी सजली

नाशिक (सुहास शेलार) : गोदावरीच्या तीरावर वेदमंत्रांचे स्वर, रामतीर्थावर उभारलेले भव्य व्यासपीठ, विद्युत

सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी; रामकुंडावरील विहंगम महागोदा आरती आणि शंखनाद सोहळा

[caption id="attachment_1070716" align="aligncenter" width="800"] नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड घाटावर हजारो दिव्यांच्या प्रकाशात आणि मंत्रोच्चारात

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य धार्मिक शुभारंभ; धर्मध्वज आणि ग्रामपरिक्रमेने संपूर्ण नगरी भक्तिरसात न्हाली

[caption id="attachment_1070652" align="aligncenter" width="800"] नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाच्या शुभारंभाप्रसंगी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभ मुहूर्त समीप! ध्वजारोहणानंतर होणार सुरूवात, धर्मध्वजाची वैशिष्ट्य जाणून घ्या

नाशिकमध्ये 12 वर्षानंतर कुंभमेळा होत आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12.02 मिनिटांनी

Nashik Kumbhmela : रामकुंडावर पुरोहित संघाच्या ध्वजस्तंभाची परंपरेनुसार प्राणप्रतिष्ठापना संपन्न!

[caption id="attachment_1070623" align="aligncenter" width="800"] नाशिकच्या पवित्र रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा; तपोवनात धर्मध्वज आणि भव्य ग्रामपरिक्रमेने धार्मिक पर्वाचा मंगलमय शुभारंभ

[caption id="attachment_1070611" align="aligncenter" width="800"] भक्तीचा गजर, संत-महंतांचा पावन सहवास, धर्मध्वजाची दिव्य पताका आणि लाखो भाविकांच्या