Nora Fatehi : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही सुकेश चंद्रशेखर यांच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात २ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने तिला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, दिल्लीतील पटियाला हाऊस येथील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अभिनेत्री नोरा फतेही साक्ष देण्यासाठी हजर राहिली नाही. त्यामुळे न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत, नोराचे वर्तन अयोग्य असल्याचे सांगत तिच्यावर टीका केली आहे. न्यायालयाने नोरा फतेहीच्या वकिलाला "न्यायालयाची फसवणूक करू नका" असे नोराला सांगण्यास सांगितले आहे. ( Nora Fatehi Legal Trouble)
मुंबई: मनुष्याला ज्या प्रमाणे, पाणी आणि अन्नाची गरज असते, त्या प्रमाणेच हवेची सुद्धा गरज असते. हवेच्या माध्यमातूनच मनुष्य श्वास घेतो. आपण सर्वजण ...
दरम्यान, याआधी सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने फतेहीची चौकशी केली होती. सन २०२१ रोजी हे प्रकरण सुरु झाले होते. या प्रकरणातील चौकशी दरम्यान नोराने दावा केला की तिला सुकेश व त्याच्या पत्नीने एका पार्टीत आमंत्रित केले होते. तसेच त्यांनी तिच्या कामाच्या बदल्यात तिला मानधन म्हणून रोख रकमेऐवजी महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या होत्या.
मनी लाँड्रिंग प्रकरणात या सर्व महागड्या भेटवस्तूंची चौकशी केली, ज्यात बीएमडब्ल्यू कार आणि गुच्ची बॅगसह डिझायनर वस्तूंचा समावेश होता. तसेच अभिनेत्रीने तिचा सुकेशशी कोणताही संबंध नव्हता आणि ती त्या ठगाच्या टोळीची बळी ठरली होती, असेही सांगितले आहे. दरम्यान, या बाबतीत काहीतरी चुकीचे घडत आहे हे लक्षात आल्यावर तिने सुकेशसोबतचे सर्व संबंध तोडले होते.
Rs 200 crores Extortion case | Delhi police informed the Rouse Avenue court that Nora Fatehi was summoned but they have no information whether she is coming or not. Her counsel has moved plea seeking exemption. Court pulled up the counsel and said "she is a witness and was supposed to be here, her conduct is not up to the mark, don't take the court for granted"
— ANI (@ANI) November 2, 2026
सुकेश चंद्रशेखरचं मनी लाँड्रिंग प्रकरण काय आहे?
ठग सुकेश चंद्रशेखर यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. तिहार तुरुंगात कैद आपण त्याने कायदा मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मालविंदर सिंग यांच्या पत्नींकडून जवळपास २०० कोटी रुपये जामीन मिळवून देऊ या नावाखाली उकलण्यात आले. यावर ईडीने असा आरोप केला आहे की, सुकेशने बेकायदेशीरपणे मिळवलेल्या या पैशांचा वापर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यासह आपल्या जवळच्या लोकांसाठी आलिशान भेटवस्तू, गाड्या आणि इतर महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी करण्यात आला आहे.