Borivali Encroachment : बोरिवलीतील त्या 27 अतिक्रमित गाळ्यावर कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या कडक शिक्षेनंतर महापालिकेने फास्टट्रॅकवर राबवली मोहीम

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाच्या बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या बोरिवली पूर्व येथील भूखंडावरील अतिक्रमणांविरोधात अखेर मुंबई महापालिकेने बुधवारी सकाळी धडक कारवाई सुरू केली आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाच्या बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या बोरिवली पूर्व येथील भूखंडावरील अतिक्रमणांविरोधात अखेर मुंबई महापालिकेने बुधवारी सकाळी धडक कारवाई सुरू केली आहे. स्वामी विवेकानंद मार्गावरील सुमारे 3,400 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम हाती घेतली असून या कारवाईत 27 पैकी तब्बल 26 व्यावसायिक गाळे हटवण्यात करण्यात आले आहेत. याच प्रकरणात न्यायालयाने महापालिका आयुक्तांना येथील अतिक्रमणांवर कारवाई न केल्याचा दोषारोप ठेवून पाच लाखांचा दंड केला होता आणि नोव्हेंबर महिन्याचा वेतन रोखण्याचे निर्देश दिले होते. आर मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या टीम सोबत विधी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा फटका कल्पना नसतानाही महापालिकेचे प्रमुख या नात्याने त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात निष्काळजी अधिकाऱ्यांना महापालिका प्रशासन निलंबित करते का याकडे लक्ष आहे.

बोरिवली पूर्व येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील अंमलबजावणीसाठी निश्चित केलेला हा भूखंड नगर भूमापन क्रमांक 15 तसेच नगररचना योजना क्रमांक 2 अंतर्गत बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित आहे. मात्र, या आरक्षित जागेवर व्यावसायिक गाळ्यांचे अतिक्रमण झाल्याने बस स्थानकाच्या नियोजित वापरात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या आर/मध्य विभागाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली.



या कारवाईसाठी आर/मध्य विभागातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांसह सुमारे 70 कामगार-कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. दोन जेसीबी, चार डंपर यांच्या सहाय्याने अतिक्रमित बांधकामे हटविण्यात येत आहेत. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उर्वरित एका गाळ्याबाबत पुढील कारवाई काय होते आणि हा भूखंड प्रत्यक्षात बेस्ट बस स्थानकाच्या विकासासाठी कधी उपलब्ध होतो, याकडे आता बोरिवलीकरांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

Bhandup Food Poison Case: लग्नातील अन्नातून विषबाधा प्रकरणी कॅटरर्स मालकाला पोलिसांची नोटीस

रविवारी (1 नोव्हेंबर) नाहूर पश्चिम येथील नालंदा बुद्ध विहार हॉलमध्ये आयोजित एका लग्नसमारंभात अन्नातून विषबाधा

मुंबईतील अ‍ॅल्युमिनियम फॉइल कंपनी CBIच्या रडारवर; बँक फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल, अनेक ठिकाणांवर छापे

Mumbai News : औषधे, खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅल्युमिनियम फॉइलचे उत्पादन

दात घासताना पोटात गेला ब्रश; विना शस्त्रक्रिया डॉक्टरांनी वाचवला रिक्षा चालकाचा जीव!

महाराष्ट्रातील पेण येथे राहणाऱ्या एका 50 वर्षीय रिक्षा चालकाच्या बाबतीत एक अत्यंत विचित्र आणि थक्क करणारी घटना

BMC News : कचरा वेचकांनाही हातभार, महापालिकेच्यावतीने पाच ठिकाणी नोंदणीकृत संस्थेची निवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) देवनार डम्पिंग ग्राउंडसह चार कचरा हस्तांतरण केंद्रांसाठी आता नोंदणीकृत कचरा वेचक

Mumbai road development : मुंबईतील उर्वरीत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, शेवटचा हात फिरवण्यासाठी लवकरच निविदा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पहिल्या दोन टप्प्यांमध्ये रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

BMC : महापालिका मुख्यालयासह फोर्ट हेरिटेज परिसरातील पदपथांची होणार सुधारणा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या फोर्ट हेरिटेज परिसराचा कायापालट आता वेगळ्या पध्दतीने केला जाणार