IND vs NZ, 1st ODI: भारताने पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला पाजलं पराभवाचं पाणी, असा झाला सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात काय घडलं ते जाणून घेऊयात

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका सुरू असून पहिल्याच सामन्यात भारताने सरशी घेतली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कर्णधार शुभमन गिलचा हा निर्णय योग्य ठरला. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. न्यूझीलंडला 40.2 षटकात सर्व गडी गमवून 185 धावा करता आल्या. यामुळे भारतापुढे 186 धावांचं सोपं आव्हान आलं. भारताने हे आव्हान सहज गाठलं असतं. भारताने हे आव्हान 5 गडी गमवून पूर्ण केलं. पण या सामन्यात पावसाचा वारंवार व्यत्यत आला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार धावा आणि षटकं कमी करण्यात आल. भारताला 32 षटकात 143 धावांचं आव्हान दिलं गेलं. हे आव्हान भारतासाठी आणखी सोपं झालं. कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली यांची भागीदारी निर्णायक ठरली. भारताने पहिल्या वनडे सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता उर्वरित चार सामन्यात कोण सरशी घेते? याकडे लक्ष लागून आहे.

भारताचा डाव


न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात रोहित शर्माची विकेट पडली. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर जातो की काय असं वाटलं. पण कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी डाव सावरला. या दोघांनी सावध पण विजयी भागीदारी केली. कर्णधार शुभमन गिलने 56 चेंडूत 37 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 5 चौकार मारले. दुसरीकडे, विराट कोहलीने एका बाजूने किल्ला लढवला. विराट कोहलीने 51 चेंडूत 74 धावांची खेळी करून बाद झाला. त्याने 13 चौकार आणि एक षटकार मारला. त्याच्या खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला होता. विजयासाठी फक्त 19 धावांची गरज होती.  पण अक्षर पटेलची विकेट पडली आणि भारतीय क्रीडाप्रेमींची चिंता वाढली.  त्याने 2 चेंडूंचा सामना केला आणि एकही धाव न करता बाद झाला. श्रेयस अय्यर देखील 15 धावा करून बाद झाला.


न्यूझीलंडचा डाव


न्यूझीलंडची सुरूवात काही चांगली झाली नाही. विल यंश 9 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विकेट पडत केल्या. हेनरी निकोल्स 9 धावांवर बाद झाला. टिम सैफर्टने 38, डॅरेल मिचेल 28, टॉम लॅथम 3, ग्लेन फिलिप्स 30, मिचेल सँटनर 4, नाथन स्मिथ 1, काइल जेमिसन 1 आणि ब्लेयर टिकनर 34 धावा करून बाद झाले. तर जेकब डफी 15 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून अर्शदीप सिंगने 4, गुरनूर ब्रारने 3 आणि अंशुल कंबोजने 2 विकेट काढल्या.
Comments
Add Comment

विराट कोहलीचा सुपरमॅन कॅच! धनुष्य-बाण सेलिब्रेशन पाहून चाहते म्हणाले, ‘रामायणाचा प्रचार सुरू आहे का?’

ऑकलंड येथील ईडन पार्कवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात माजी भारतीय

IND vs NZ 1st ODI: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत रचला नवा इतिहास

[caption id="attachment_1072039" align="aligncenter" width="800"] ऑकलँडच्या ईडन पार्कवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात विराट कोहलीच्या

0,0,0,0,0,W..! न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात रोहित शर्मा शून्य, वर्ल्डकपपूर्वीच्या कामगिरीला धक्का

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना ऑकलँडच्या ईडन पार्कवर सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल

Jesus De Miguel Death: सामना सुरू असताना गोलकीपरची जोरदार धडक, उपचारादरम्यान 30 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू

मुंबई: क्रिडा जगतातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटूचं निधन झालं आहे. टेनेरिफ संघाचा प्रसिद्ध

Glenn Maxwell: ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

अवघ्या 35 धावांत दोन धक्के, पण जैस्वाल- राठोडची वादळी खेळी! 247 धावांची भागीदारी करत भारताला तारलं

मुंबई: न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमध्ये भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात खेळला गेलेला दुसरा अनौपचारिक कसोटी