Diwali 2026: दिवाळीत तुम्ही भेसळयुक्त मिठाई तर नाही खात आहात ना? मिठाई खरेदी 'या' गोष्टी एकदा नक्की तपासा

विशेषतः दुग्धजन्य पदार्थांपासून बनवलेल्या मिठाईमध्ये भेसळीचा धोका उदभवण्याची शक्यता जास्त असते. तसेच गर्दी टाळण्यासाठी, लोक अनेक वेळा बाजारात जाण्याऐवजी ऑनलाइन मिठाई मागवतात. ऑनलाइन मिठाई मागवल्याने तुमचा वेळ वाचतो, पण तुम्ही ऑनलाइन मागवलेल्या मिठाईच्या गुणवत्तेचा कधी विचार केला आहे का? त्यामुळे मिठाई खाण्यापूर्वी तिच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आणि तितकेच महत्वाचे आहे.

Diwali 2026: दिवाळीचा सण म्हणजे रोषणाई, फराळ, मिठाई, फटाके. फराळासोबतच मिठाईचीही रेलचेल आपल्या प्रत्येकाच्या घरी असते. काजू कतली, लाडू, बर्फी, पेढे अशा विविध मिठाईंची देवाणघेवाण आपण दिवाळीत मोठ्या प्रमाणात करतो. सणानिमित्त नातेवाईक, मित्रपरिवार आणि ओळखीच्या व्यक्तींकडून मिठाईचे बॉक्स भेट दिली जाते. मात्र, आकर्षक पॅकिंगमध्ये मिळालेली मिठाई शुद्ध घटकांपासून बनवलेली असते का की त्यात भेसळ करण्यात आली आहे, हे ओळखणे इतके सहज शक्य नसते. विशेषतः दुग्धजन्य पदार्थांपासून बनवलेल्या मिठाईमध्ये भेसळीचा धोका उदभवण्याची शक्यता जास्त असते. तसेच गर्दी टाळण्यासाठी, लोक अनेक वेळा बाजारात जाण्याऐवजी ऑनलाइन मिठाई मागवतात. ऑनलाइन मिठाई मागवल्याने तुमचा वेळ वाचतो, पण तुम्ही ऑनलाइन मागवलेल्या मिठाईच्या गुणवत्तेचा कधी विचार केला आहे का? त्यामुळे मिठाई खाण्यापूर्वी तिच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आणि तितकेच महत्वाचे आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) दिलेल्या माहितीनुसार, काही सामान्य भेसळीचे घटक घरच्या घरी प्राथमिक चाचण्यांद्वारे आपण तपासू शकतो. ते कसे जाणून घेऊ या.


मिठाई खरेदी 'या' गोष्टी एकदा नक्की तपासा


सगळ्यात आधी, ऑनलाइन मिठाई ऑर्डर करताना, तुम्ही ज्या दुकानातून किंवा ब्रँडकडून ऑर्डर करत आहात त्याबद्दल योग्य ती माहिती मिळवा. लक्षात ठेवा, विश्वासार्ह मिठाईच्या दुकानातूनच मिठाई मागवा. मिठाई मागवण्यासाठी प्रतिष्ठित झोमॅटो आणि स्विगीसारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्सचा वापर करा.


मिठाईच्या पॅकिंगवर उत्पादनाची तारीख आणि वापरण्याची अंतिम तारीख चेक करा. मुदत संपलेली मिठाई खाणे टाळा.


बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीत मिळणाऱ्या मिठाईबाबत थोडे सतर्क राहा.


स्वच्छता राखणाऱ्या आणि विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच मिठाई खरेदी करा. विशेषतः दूध आणि खव्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या बाबतीत काळजी घ्या.


ऑनलाईन ऑर्डर करताना दुग्धजन्य मिठाई ज्यात पनीर, खवा, अंडी मावा वापरला आहे, असे पदार्थ मागवणे टाळा. त्याऐवजी काजूकतली, सोन पापडी, म्हैसूर पाक आणि सुक्या मेव्यापासून बनवलेल्या मिठाई ऑनलाइन मागवणे फायदेशीर ठरू शकते.


त्यामुळे दिवाळीत भेट म्हणून मिळालेली मिठाई खाण्यापूर्वी तिचे पॅकिंग, उत्पादनाची तारीख आणि मुदत तपासून घ्या. तसेच मिठाईचा रंग, वास किंवा चव असामान्य वाटत असेल तर ते खाणे टाळा.

Comments
Add Comment

Social Media Law Changes: भारतात कार्यरत असणाऱ्या सोशल मीडिया कंपनीच्या कार्यपद्धतीत बदल होण्याची शक्यता; मोदी सरकार नियम बदलण्याच्या तयारीत

Social Media Law Changes: भारतात कार्यरत असणाऱ्या सोशल मीडिया कंपनी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि एक्स यांची कायदेशीर

९ वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू; वर्गात असताना अचानक कोसळली

Delhi: दिल्लीयेथे इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थिनी

Jui Gadkari: लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मधील सायलीचा स्त्रीसन्मानासाठी न्यायालयात बुलंद आवाज; नायिकेच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक

Jui Gadkari: स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मध्ये सध्या आश्रमातील मुलींच्या तस्करीचं गंभीर

Shital Upare: अभिनेत्री, मॉडेल शितल उपरेच दिवाळी स्पेशल फोटोशूट

[caption id="attachment_1072428" align="alignnone" width="800"] ग्लॅमर अभिनेत्री आणि Miss Heritage International किताबाची मानकरी असलेली शितल उपरे हिने अलीकडेच आपला

Diwali 2026: धनत्रयोदशीच्या दिवशीचे महत्व, शुभ वेळ, अचूक पूजा कशी करावी? जाणून घ्या

Diwali 2026: सर्वसामान्य जनतेपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत, प्रत्येकजण दिवाळी सणाच्या वर्षभर प्रतीक्षेत असतात. त्यातील

DCM Eknath Shinde: धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वचन

मुंबई: सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, सत्तेपेक्षा सत्य मोठे आणि अधिकारापेक्षा धर्म व कर्तव्य श्रेष्ठ आहे. सनातन