राणीबागेत आशियाई सिंह येण्याची वाट मोकळी! साकरबाग व मुंबई प्राणिसंग्रहालय या दोघांदरम्यान सामंजस्य करार करण्याचे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश

साकरबाग प्राणिसंग्रहालय आणि मुंबई प्राणिसंग्रहालय या दोघांदरम्यान सामंजस्य करार करण्याचे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) आशियाई सिंह आता लवकरच दाखल होणार आहे. गुजरातहून मुंबईत सिंह येण्याची वाट मोकळी झाली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासंदर्भात मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची गांधीनगर (गुजरात) येथील मुख्यमंत्री निवास येथे बुधवारी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी बुधवारी सायंकाळी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री यांनी साकरबाग प्राणिसंग्रहालय आणि मुंबई प्राणिसंग्रहालय या दोघांदरम्यान सामंजस्य करार करण्याचे निर्देश दिले.

गुजरातमधील जुनागढ येथील प्रसिद्ध साकरबाग प्राणिसंग्रहालयाकडून मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयासाठी दोन जोड्या (२ नर व २ मादी) आशियाई सिंह देण्याचा प्रस्ताव आहे. या बदल्यात मुंबई प्राणिसंग्रहालयातर्फे तीन जोड्या टफ्टेड कॅपुचिन माकडे साकरबाग प्राणिसंग्रहालयास देण्यात येणार आहे. दोन्ही प्राणिसंग्रहालयांनी या देवाणघेवाणीस आधीच संमती दर्शविली आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (सी झेड ए) (नवी दिल्ली) यांच्या अंतिम मान्यता प्राप्त आराखड्यानुसार (मास्टर लेआऊट प्लॅन) मुंबई प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंहांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक निवासस्थान सज्ज करण्यात आले आहे.



याबाबत विलंब होत असल्याने गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची मुंबईच्या महापौर मुंबईच्या रितू तावडे यांनी भेट घेतली. यावेळी यांच्यासह ध्रंगध्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशभाई वरमोरा, गुजरात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव संजीव कुमार, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शाह, मुंबई महानगरपालिकेचे संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर गुजरातचे वन राज्यमंत्री प्रवीणकुमार माळी यांचीही मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बुधवारी गांधीनगर येथे भेट घेतली. मुंबई प्राणिसंग्रहालयाला आशियाई सिंह लवकर द्यावेत, यासाठी वन विभागाला योग्य ते निर्देश देण्याची विनंती महापौरांनी राज्यमंत्री माळी यांना केली. त्यावर, श्री. माळी यांनीही महापौरांचे निवेदन स्वीकारून त्यावर तत्काळ शेरा लिहून वन खात्याच्या प्रधान सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले.

याबाबत, लवकरात लवकर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून, जुनागढचे साकरबाग प्राणिसंग्रहालय आणि मुंबई प्राणिसंग्रहालय यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्याचे निर्देश गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी गुजरात राज्य प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेला लवकरच गुजरात शासनाकडून मंजुरीचे लेखी पत्र आणि सामंजस्य करार मसुदा प्राप्त होणार आहे. या मंजुरीमुळे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुंबईला एकप्रकारे दिवाळी भेट दिली आहे.
मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांच्या या सक्रिय पुढाकारामुळे दोन्ही राज्यांमधील वन्यजीव संवर्धन सहकार्याला नवी दिशा मिळाली आहे. ही भेट महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील नैसर्गिक वारसा व परस्पर सौहार्दाचे उत्तम प्रतीक ठरणार आहे.
Comments
Add Comment

BMC : आयुक्तांसह महापालिकेची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना त्वरीत निलंबित करा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बोरीवली पूर्व येथील स्वामी विवेकानंद मार्गावर बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या

BMC : मुंबई महापालिका सभागृह बांधकामाच्या मंजुरीचा प्रस्ताव लांबणीवर; सादर केलेला प्रस्ताव तांत्रिक कारणाने प्रशासनाने घेतला मागे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा

महापालिकेच्यावतीने बांधकामांच्या ठिकाणी होणार थर्ड पार्टी ऑडीट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हवेच्या

Diwali Exhibition : महानगरपालिका मुख्यालयात दिवाळीनिमित्त आयोजित महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या विविध

सर्वोच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांवरील निर्बंध घेतले मागे

मुंबई (विशेष प्रतिनिधी): माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशांचे पालन

पश्चिम रेल्वेचा 76 वा स्थापना दिवस, रेल्वेच्या गौरवशाली प्रवासाचे प्रदर्शनातून होणार दर्शन

मुंबई: पश्चिम रेल्वेकडून 5 नोव्हेंबर 2026 रोजी अर्थात उद्या 76 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. राष्ट्राच्या सेवेतील