दिल्लीतील खराब हवामान आणि स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे दिल्ली क्रिकेट बोर्डाने ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. बीसीआयने आपल्या पत्रकात स्पष्ट केलं की, "दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विनंतीनुसार सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. हवामानातील संभाव्य अडचणी आणि स्टेडियममधील प्रस्तावित नूतनीकरणाची कामे लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे." बीसीसीआयने पुढे स्पष्ट केलं की, "हा सामना आता 13 डिसेंबर 2026 रोजी विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल."
🚨 News 🚨
First ODI between India and Sri Lanka to be held on December 13 shifted from Delhi to Visakhapatnam
More details 🔽 | #TeamIndia | #INDvSL | @mflone_
https://t.co/P9wJkuYdtJ
— BCCI (@BCCI) November 5, 2026
[caption id="attachment_1072580" align="aligncenter" width="800"] आयपीएल 2027 स्पर्धेसाठी फ्रेंचायझी आता जोरदार तयारी करत आहे. मिनी लिलावापूर्वी खेळाडूंची ट्रेड करण्यासाठी फ्रेंचायझींची धडपड ...
भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
- रविवार, 13 डिसेंबर, 2026, दुपारी 2.00 वाजता, पहिला एकदिवसीय सामना (विशाखापट्टणम)
- बुधवार, 16 डिसेंबर 2026, दुपारी 2.00 वाजता, दुसरी वनडे (बंगळुरू)
- शनिवार, 19 डिसेंबर 2026, दुपारी 2.00 वाजता, तिसरा एकदिवसीय सामना (अहमदाबाद)
- मंगळवार, 22 डिसेंबर, 2026, सायंकाळी 7.00 वाजता, पहिला टी20 (राजकोट)
- गुरुवार, 24 डिसेंबर, 2026, सायंकाळी 7.00 वाजता, दुसरी टी20 (कटक)
- रविवार, 27 डिसेंबर 2026, सायंकाळी 7.00 वाजता, तिसरी टी20 (पुणे)