
कांदिवली: मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून चोरट्याने पलायन केले. 3 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 9:30 वाजता उमंग अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची ही घटना कैद झाली असून, त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने साधला डाव
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या माहितीनुसार, वृद्ध महिला घराचा दरवाजा उघडत असताना एक व्यक्ती पायऱ्या चढून तिच्याजवळ येतो. त्यानंतर तो खिशातून एक कागद काढून इमारतीत एका व्यक्तीचा पत्ता विचारण्याचे नाटक करतो.
महिलेने त्याला संबंधित व्यक्ती तिसऱ्या मजल्यावर राहत असल्याचे सांगितले. पत्ता समजल्याचे भासवत आरोपी काही क्षण तिच्याशी बोलतो. मात्र, त्यानंतर अचानक तिच्यावर हल्ला करून गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावतो.
Yesterday, at Umang Apartment, Kandivali West, Mumbai, a man approached an elderly woman pretending to ask about someone living nearby. He suddenly attacked her, snatched her gold chain and ran away.
The entire incident was caught on CCTV. https://t.co/MmJ2XOPo4v — Tehxi (@yajnshri) November 5, 2026
सीसीटीव्हीत चोरीची घटना कैद
साखळी हिसकावल्यानंतर आरोपी तिथून पळून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या प्रकारामुळे वृद्ध महिला घाबरलेल्या अवस्थेत राहते. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला आणि संधी मिळताच चोरी केल्याचे फुटेजवरून दिसते.
या घटनेमुळे निवासी इमारतींमधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी इमारतींमध्ये येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची नोंद ठेवणे आणि सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.






