Nashik TCS Case : नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट ! इम्तियाज जलीलचा आरोपींमध्ये समावेश

Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित TCS महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. TCS धर्मातर आणि लैगिक शोषण प्रकरणात एमआयएम (MIM) नेते इम्तियाज जलीलचाही आरोपींमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. TCS कंपनीत घडलेल्या बहुचर्चित प्रकरणाच्या गुन्ह्यातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी एमआयएम (MIM) नगरसेवक मतीन पटेल याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अशातच आता इम्तियाज जलीलच्या ( Imtiaz jaleel) विरोधात पुरावे असल्याने जलीललाही आरोपी केल्याची माहिती आहे.


नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या SIT च्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू असून या प्रकरणात इम्तियाज जलीलचे नाव आल्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकामार्फत (SIT) सुरू आहे. तपासादरम्यान काही महत्त्वाचे पुरावे आणि ध्वनिमुद्रण समोर आल्याची माहिती आहे.



इम्तियाज जलीलचा जबाब नोंदवला


मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांनी इम्तियाज जलीलचा जबाब नोंदवला आहे. मतीन पटेलच्या मोबाईल फोनमध्ये काही ध्वनिमुद्रण (Recording) आढळल्याची माहिती समोर आली होती. या ध्वनिमुद्रणांच्या अनुषंगाने इम्तियाज जलीलचेही व्हॉइस सॅम्पलही घेण्यात आले आहे. त्यामुळे इम्तियाज जलीलला पुढील चौकशीसाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी हजर राहावे लागणार असून त्यात जलील काय भूमिका मांडतात, याकडे साऱ्याचं लक्ष लागलं आहे. या पुराव्यांची तपासणी करून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून केला जात आहे.


निदा खानला आश्रय देण्याच्या प्रकरणात इम्तियाज जलीलच्या सहभागाबाबत SIT ने न्यायालयाला माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, पोलिसांकडून विविध पुरावे, मोबाईलमधील रेकॉर्डिंग आणि संबंधित व्यक्तींचे जबाब तपासले जात आहेत.



निदा खानची भूमिका काय ? 


दरम्यान, या प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या भूमिकेबाबत यापूर्वी न्यायालयाने केलेली निरीक्षणेही महत्त्वाची ठरली आहेत. न्यायालयाच्या आदेशातील निरीक्षणानुसार, प्राथमिक चौकशीत निदा खानने इतर सहआरोपींसोबत मिळून पीडित महिलेवर मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तसेच पीडितेचा विश्वास संपादन करून तिला 'हिंदू धर्म योग्य नाही' असे सांगण्यात आल्याचा आणि तिच्या विचारसरणीवर तसेच धार्मिक श्रद्धांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.या प्रकरणात लैंगिक छळ आणि धर्मांतराचे आरोप असून निदा खानची भूमिका तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचेही न्यायालयाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.



SIT तपासाकडे सर्वांचे लक्ष


नाशिकमधील TCS प्रकरणामुळे आधीच राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणात इम्तियाज जलीलचे नाव समोर आल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चा वाढली आहे. पोलिसांच्या SIT तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, संबंधित व्यक्तींची भूमिका काय स्पष्ट होते आणि न्यायालयीन प्रक्रियेत पुढे कोणते वळण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Stock Market : वॉल स्ट्रीटच्या घसरणीचा भारतीय बाजारावर परिणाम; निफ्टी सपाट, सेन्सेक्समध्ये चढ-उतार

Stock Market: गुरुवारी शेअर बाजारात मोठी तेजी नोंदवल्यानंतर शुक्रवारी भारतीय बाजाराची सुरुवात संमिश्र झाली. निफ्टी 50

Navi Mumbai Crime News : कोपरखैरणेत थरार! प्रेमप्रकरणातून दोन बहिणींवर झाडल्या गोळ्या, आरोपीला अटक

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात घरात घुसून दोन बहिणींवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

US-Iran : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा चर्चेचे संकेत ! इराणच्या 7 अटींमुळे पेच मात्र कायम

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरु आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही

Satara News : दिवाळीसाठी घरी निघाले, पण वाटेतच अपघात; साताऱ्यात प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या बसला धडक, 15 जखमी

Satara News: दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी घराकडे निघालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींवर साताऱ्यात अपघाताचे संकट

Mumbai Crime News : 'पत्ता सांगता का?' असं विचारलं अन् पुढच्याच क्षणी... कांदिवलीत वृद्ध महिलेसोबत घडलेली थरार घटना, पहा Video

कांदिवली: मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून चोरट्याने

Pune Crime News: नूडल्स आणि सुकामेव्याच्या पाकिटांतून 3.72 कोटींचा गांजा जप्त; पुणे विमानतळावर प्रवाशाला अटक

Pune Crime News: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई केली आहे. बँकॉकहून