
Diwali Firecracker Pollution: दिवाळीत फटाक्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. दिवाळी म्हटली की फटाक्यांची आतिषबाजी आलीच पाहिजे. पण दुसरीकडे बदलत्या काळाबरोबर प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामळून फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची भर पडत असल्याने त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. फटाके फोडल्यानंतर हवेत पसरणारा धूर केवळ प्रदूषण वाढवत नाही, तर त्यातील रासायनिक घटक फुफ्फुसांवरही गंभीर परिणाम करू शकतात.
विशेषतः ज्या व्यक्तींना श्वसनांचे त्रास आहेत. त्यात दमा, सीओपीडी आणि ॲलर्जीचा त्रास असलेल्या व्यक्तींसाठी हा धूर अधिक धोकादायक ठरू शकतो. फटाक्यांच्या धुरामुळे श्वासनलिकेला सूज येऊन ती अरुंद होऊ शकते. त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो, खोकला येणे अशा समस्या उद्भवतात. दरम्यान, काही गंभीर रुग्णांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्याची वेळही येऊ शकते, अशी माहिती श्वसनविकार तज्ज्ञ सांगतात. राजधानी दिल्लीसारख्या शहरांत प्रदूषणामुळे फटाक्यांवर बंदी आहे. बंदी असली तरी फटाके फुटणे मात्र अद्याप थांबलेलं नाही. फटाक्यांचा धूर आकाशात पसरत असतो. यामुळे त्याचे मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतात.
Rise and Fall Season 2 winner: 'एमएक्स ओरिजिनल राइज अँड फॉल सीझन 2' चा विजेता शहजाद पूनावाला ठरला आहे. 6 आठवड्यांच्या स्पर्धेनंतर 'राईज अँड फॉल सीझन 2' या शो चा समारोप झाला ...
सर्वसामान्य नागरिकांनीही फटाक्यांचा धूर टाळण्यासाठी मास्कचा वापर करावा. मास्क उपलब्ध नसल्यास स्वच्छ रुमालाचे दोन पदर करून नाक आणि तोंड झाकल्याने धुराचा थेट संपर्क काही प्रमाणात कमी होऊ शकतो. शक्यतो फटाके फोडताना मोकळ्या जागेची निवड करावी आणि धुराच्या संपर्कात जास्त वेळ राहू नये. दिवाळीच्या काळात फटाके फोडल्यामुळं हवेतील कार्बन मोनोक्साइड, हायड्रोकार्बन्स, सल्फर डायऑक्साइड इत्यादींचं हवेतलं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतं. फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण त्याचबरोबर त्यामुळे होणारा आवाज हा आणखी एक मोठा धोका आहे. त्यामुळे फटाके फोडताना अति धुराचे फटाके फोडणे टाळावे व आपली काळजी घ्यावी. दिवाळी हा जरी आनंदाचा सण असला तरी आपल्या आनंदामुळे इतरांच्या आरोग्याला धोका तर निर्माण होणार नाही ना, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या घरात श्वसनाचा रुग्ण नसला तरी आजूबाजूला लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दमा आणि ॲलर्जीचे रुग्ण असू शकतात. त्यामुळे इतरांचाही विचार करून कमी धूर निर्माण करणाऱ्या फटाक्यांचा वापर करावा आणि सुरक्षितपणे दिवाळी साजरी करा.





