Mohammed Shami : 'सफेद जर्सी से विदा ले रहा हूं...'; मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

शमीने क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतलेली नसून तो मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार आहे.

Mohammed Shami: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 6 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री उशिरा सोशल मीडियावर भावनिक संदेश शेअर करत त्याने आपल्या निर्णयाची माहिती दिली. मात्र, शमीने क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतलेली नसून तो मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार आहे. ( Mohammed Shami)



‘पांढऱ्या जर्सीला निरोप, आठवणी कायम’


शमीने आपल्या पोस्टमध्ये भारतीय कसोटी संघाची पांढरी जर्सी आणि या प्रवासातील आठवणींना निरोप देत असल्याचे म्हटले आहे. पहिल्यांदा भारताची कसोटी जर्सी परिधान केली, तेव्हा देशासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न होते, असे त्याने सांगितले.


 


कसोटी क्रिकेट हा केवळ खेळाचा प्रकार नसून आयुष्यातील एक खास भाग असल्याचेही शमीने नमूद केले. या प्रवासात मिळालेल्या प्रत्येक विकेटने, संघर्षाने, दुखापतीने आणि पुनरागमनाने आपल्याला नवे काही शिकवले, अशी भावना त्याने व्यक्त केली.


या प्रवासात साथ देणारे सहकारी, प्रशिक्षक, कुटुंबीय आणि चाहत्यांचे त्याने आभार मानले. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) यांनी दिलेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.



2013 मध्ये कसोटी पदार्पण


उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे जन्मलेल्या मोहम्मद शमीने बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत आपली ओळख निर्माण केली. त्याने 6 नोव्हेंबर 2013 रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याच सामन्यात रोहित शर्मानेही कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.


पदार्पणाच्या सामन्यात शमीने प्रभावी गोलंदाजी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील काळात जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासह त्याने भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाला बळ दिले. परदेशातील कसोटी मालिकांमध्येही त्याने अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी केल्या.



अशी राहिली कसोटी कारकीर्द


शमीने भारतासाठी एकूण 64 कसोटी सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने 229 विकेट्स घेतल्या. त्याच्या नावावर 6 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी आहे. त्याची कसोटीतील गोलंदाजीची सरासरी 27.71 होती, तर सर्वोत्तम कामगिरी 56 धावांत 6 विकेट्स अशी आहे.


2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत हा शमीचा भारतासाठीचा शेवटचा कसोटी सामना ठरला. दुखापती आणि पुनरागमनाच्या टप्प्यांतून जात त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय कामगिरी केल्या.



एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळणार


शमीने केवळ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार आहे. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता कायम आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पुढील कारकिर्दीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.


Comments
Add Comment

वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, टी20 संघाची धुरा सांभाळणार

[caption id="attachment_1073007" align="aligncenter" width="800"] सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला 14 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेच्या

India vs New Zealand live streaming: भारत-न्यूझीलंड दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने

IND vs NZ 2nd ODI: वेलिंग्टनमध्ये विराट कोहलीच्या रडारवर सचिन आणि पॉन्टिंगचे विक्रम, काय ते जाणून घ्या

[caption id="attachment_1072895" align="aligncenter" width="800"] विराट कोहलीची रनमशिन म्हणून ख्याती आहे. पण टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती

अंडर-19 आशिया चषकात भारताची विजयी सलामी! नेपाळचा 10 विकेट्सने धुव्वा; पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्याआधी दमदार संदेश

मस्कत : अंडर-19 आशिया चषक 2026 मध्ये भारतीय युवा संघाने शानदार विजयी सुरुवात केली आहे. ओमानमधील अल अमरात येथे झालेल्या

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपणार का? वेलिंग्टनमधील रेकॉर्ड पाहून तुम्हीही तसंच म्हणाल

[caption id="attachment_1072774" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ पाच सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या

IND vs BAN: भारतीय संघ जानेवारी महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार? दोन वर्षांचा गुंता सुटला का?

बांगलादेशमध्ये गेल्या काही वर्षात राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती आहे. दरम्यानच्या काळात