नागपूर: दिवाळी सणानिमित्त नागपूर शहरातील मेट्रो सेवा काही ठराविक वेळेपर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय 'नागपूर मेट्रो रेल्वे'चा निर्णय घेतला आहे. लक्ष्मी पूजनच्या दिवशी संपूर्ण देशभरामध्ये नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष असतो. शिवाय, शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडत असतात. यामुळे 'नागपूर मेट्रो रेल्वे'ने महत्त्वाचा निर्णय घेत, दिवाळीनिमित्त फक्त 12 तासांसाठीच मेट्रो चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाकीची वेळ मेट्रो बंद राहणार असल्याची माहिती 'मेट्रो रेल्वे नागपूर'ने त्यांच्या सोशल मीडियावरून नागरिकांना महत्त्वाची माहिती दिली आहे. दरम्यान, नागपूर मेट्रोची लक्ष्मीपूजनच्या दिवशी कसे वेळापत्रक आहे, जाणून घेऊया...
Nashik Crime : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे प्रेमसंबंधांच्या वादातून एका १८ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची ...
'नागपूर मेट्रो रेल्वे'च्या एक्स अकाऊंटवर माहिती शेअर करण्यात आली की, "दिवाळीनिमित्त मेट्रोच्या विशेष वेळा आहेत. 8 नोव्हेंबर 2026 रोजी (दिवाळी– लक्ष्मीपूजन)च्या दिवशी नागपूर मेट्रोची सेवा सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या दिवशी मेट्रो गाड्या 15 मिनिटांच्या अंतराने धावणार आहेत. चारही टर्मिनल स्थानकांवरून शेवटची मेट्रो सायंकाळी 6 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवसापासून 'नागपूर मेट्रो'ची सेवा नियमितपणे पुर्ववत होणार आहे. त्याप्रमाणे नागपूरकरांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन 'नागपूर मेट्रो रेल्वे'ने आपल्या प्रवाशांना केले आहेत." त्यानंतर, 'नागपूर मेट्रो'ने नागपूरकरांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दिवाळीनिमित्त मेट्रोच्या विशेष वेळा
८ नोव्हेंबर २०२६ रोजी (दिवाळी – लक्ष्मीपूजन) नागपूर मेट्रोची सेवा सकाळी ६:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत सुरू राहील.
मेट्रो गाड्या १५ मिनिटांच्या अंतराने धावतील.
चारही टर्मिनल स्थानकांवरून शेवटची मेट्रो सायंकाळी ६:०० वाजता सुटेल.
पुढील दिवसापासून मेट्रोची नियमित सेवा पूर्ववत सुरू राहील.
प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे.
आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
#DiwaliDay #MetroTimings #DiwaliCelebration #TravelSmart #TravelSafe
— Nagpur Metro Rail (@MetroRailNagpur) November 7, 2026
शिवाय, 'नागपूर मेट्रो रेल्वे'ने प्रवाशांना मेट्रोमध्ये फटाके नेण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. दिवाळी आनंदाने साजरी करा, पण सुरक्षेला नेहमी प्राधान्य द्या. मेट्रो परिसरात फटाके, स्फोटकशील पदार्थ किंवा ज्वलनशील पदार्थ नेऊ नका. सुरक्षितपणे सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. सर्व प्रवाशांनी सहकार्य करून सुरक्षित आणि सुनिश्चित प्रवास करण्याची विनंती 'नागपूर मेट्रो रेल्वे'ने केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. ...