Big Boss 20: लोकप्रिय रिऍलिटी शो 'बिग बॉस 20' प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. रोज घडणारे अनपेक्षित ट्विस्ट, ड्रामा, वादविवाद यामुळे नेहमीच हा शो चर्चेचा विषय ठरतो. यातच आता वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानने अभिनेत्री माही विजला निर्मात्यांवर चुकीचे आरोप केल्याबद्दल आणि तिच्या वर्तनाबद्दल सुनावले आहे. दिवाळीनिमित्त फॅमिली-मेसेज टास्कदरम्यान स्पर्धक लव्ह गिलच्या आईने माहीच्या एका वक्तव्यावर आक्षेप घेतला, तेव्हा माहीला वाटले की तिला मुद्दाम लक्ष्य केले जात आहे. तिने बाथरूममध्ये माईक घेऊन आणि कन्फेशन रूममध्ये जाऊन बिग बॉसच्या निर्मात्यांवर आरोप केला की, ते तिची प्रतिमा मुद्दाम नकारात्मक (Negative) दाखवत आहेत. तिचे असे म्हणणे आहे की, केवळ तिचेच कमेंट्स हायलाईट केले जातात आणि यामुळे ती शो सोडण्यास देखील तयार आहे.
यावर आता शनिवारच्या भागात सलमान खानने माही विजच्या या आरोपांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. सलमानने सांगितले की निर्माते न्यूट्रल आहेत. बिग बॉसचे निर्माते तिच्या बाजूनेही नाहीत आणि तिच्या विरोधातही नाहीत. ते फक्त तेच दाखवतात जे ती घरात बोलते किंवा करते. प्रेक्षक किंवा बाहेरील लोक जर तिला काही बोलत असतील, तर तिने स्वतःच्या वागण्यात काहीतरी चुकीचे केले असणार, हे तिने समजून घेतले पाहिजे. हा फीडबॅक तिला गेम सुधारण्यासाठी दिला गेला होता,ना की तिची बदनामी करण्यासाठी. त्यामुळे फीडबॅकचा आदर करा.
Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला मध्यनजर ठेऊन राज्यातील मंत्री दुष्काळग्रस्त भागात जाऊन, त्यांना मदत करून दिवाळी साजरी करत ...
तसेच, सलमानने माहीला आठवण करून दिली की, ती या सीझनची सर्वात बहुप्रतिक्षित स्पर्धक होती, जिला शोमध्ये आणण्यासाठी निर्माते गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न करत होते. मात्र, प्रत्यक्षात ती घरात फक्त गॉसिप आणि पाठीमागे चुगल्या करण्यापलीकडे काहीही योगदान नाही.
दरम्यान, रोहित शेट्टीच्या आधीच्या फीडबॅकवरही माहीने वाद घातला होता. सलमानने यावरही तिला ऐकवले. तिने अशा प्रकारे निर्मात्यांवर संशय घेण्याऐवजी स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि पुढील वाटचालीचा विचार करण्याचा सल्ला दिला.सलमानने समजावल्यानंतर आणि तिचे सत्य समोर आणल्यानंतर माही विजला तिची चूक उमजली. त्यामुळे आता येणाऱ्या काळात माही आपला गेम कसा खेळते हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे.