ब्लॅक कॅट कमांडो म्हणून ओळखले जाणारे देशातील सर्वात उच्चभ्रू सुरक्षा दलांपैकी एक असलेले राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (एनएसजी) आपल्या गणवेशात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. या बदलाचा उद्देश केवळ कमांडोंच्या गणवेशाचा रंग किंवा डिझाइन बदलणे हा नाही,तर त्यांचू कार्यक्षमता, शारीरिक क्षमता आणि तीव्र उष्णतेतील सुरक्षितता सुधारणे हा देखील आहे. व्हीआयपी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एनएसजी कमांडोंना मोकळ्या मैदानांवर, रस्त्यांवर, विमानतळांवर, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी बराच वेळ उभे राहावे लागते. ते अनेकदा जड संरक्षक उपकरणे आणि बुलेटप्रूफ जाकीट घालून तासनतास कर्तव्य बजावतात. उष्णता, घाम, निर्जलीकरण आणि थकवा ही गंभीर आव्हाने निर्माण करतात. नवीन गणवेशात हलके कापड, सुधारित हवा खेळती राहण्याची सोया आणि नायलॉन कापूस मिश्रित नायको कापडाचा वापर करून शरीरातील ओलावा शोषून घेण्याच्या क्षमतेवर भर देण्यात आला आहे.
गणवेश बदलण्याची गरज का भासली?
एनएसजी कमांडोंचे काम सामान्य सुरक्षा कर्मचाऱ्यांपेक्षा खूप वेगळे असते. दहशतवादी हल्ले, ओलीस संकट, विमान अपहरण आणि इतर गंभीर सुरक्षा परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. याव्यतिरिक्त देशातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती असलेल्या व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींच्या संरक्षणासाठीही एनएसजी क्लोज प्रोटेक्शन कमांडो तैनात केले जातात. या कर्तव्यासाठी त्यांना दीर्घकाळ सतर्क राहावे लागते. सुरक्षा कर्तव्यदरम्यान त्यांना अनेकदा मोकळ्या जागेत उभे राहावे लागते जिथे सावली किंवा विश्रांतीची सोय मर्यादित असते. उन्हाळ्यात हे कर्तव्य आणखी कठीण होते. काळे गणवेश, जड बुलेटप्रूफ जॅकेट आणि इतर संरक्षक उपकरणांमुळे शरीरावर अतिरिक्त ताण येतो. जर घाम कपड्यांमध्ये अडकून राहिला आणि बाहेर पडू शकला नाही तर शरीराचे तापमान नियंत्रित करणे कठीण होऊ शकते. यामुळे उष्णतेचा ताण, थकवा, चक्कर येणे आणि बेशुद्ध पडण्याचा धोका वाढतो.
भारतीय हवाई दल 13 ते 21 नोव्हेंबर दरम्यान उत्तराखंडमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) एक उच्च तीव्रतेचा हवाई सराव आयोजित करत आहे. या सरावात आघाडीची लढाऊ ...
एप्रिलमधील एका घटनेमुळे गणवेशात बदल करण्याची गरज अधिक अधोरेखित झाली. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्या संरक्षणासाठी तैनात असलेला एक एनएसजी कमांडो ४४ अंश सेल्सिअस तापमानात बेशुद्ध पडला. या घटनेमुळे जड संरक्षक उपकरणे परिधान करून अत्यंत उष्णतेत दीर्घकाळ कर्तव्य बजावणाऱ्या कमांडोंसाठी सध्याच्या गणवेशाच्या आरामदायीपणाबद्दल प्रश्न निर्माण झाले. यानंतर एनएसजीच्या क्लोज प्रोटेक्शन फोर्स आणि मुख्यालयाने सुरक्षा मानकांशी तडजोड न करता कमांडोंना उष्णतेपासून दिलासा देण्याच्या उद्देशाने गणवेशात बदल करण्याच्या पर्यायांवर गांभीर्याने विचार केला.
नवीन गणवेशात कोणत्या प्रकारचे बदल असतील?
नवीन गणवेशात अनेक बदल होणार असून त्यातील सर्वात महत्त्वाचे बदल कापड, वजन, हवा खेळती राहण्याची क्षमता आणि घाम शोषून घेण्याच्या क्षमतेशी संबंधित आहेत.
- हलके कापड : नवीन गणवेश नायको म्हणजेच नायलॉन आणि कॉटन यांचे मिश्रण असलेला कापड वापरून तयार केले जातील. यात नायलॉनची मजबूती आणि कापसाचा आराम यांचा संगम असल्याने हे गणवेश टिकाऊ तसेच आरामदायक असतील. हे गणवेश सध्याच्या गणवेशापेक्षा हलका असेल ज्यामुळे कमांडोंना जास्त तयार कर्तव्य बजावता येईल.
- सुधारित वायुवीजन : नायको फॅब्रिक्सच्या वापरामुळे हवेचा संचार सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामुळे शरीराभोवतीची उष्णता आणि आर्द्रता कमी होण्यास मदत होते.
- ओलावा शोषून घेणे : उन्हाळ्याच्या उष्णतेत सतत घाम आल्याने कपडे शरीराला चिकटू शकतात. नवीन गणवेशांमध्ये ओलावा शोषून घेण्याच्या क्षमतेला प्राधान्य दिले जाईल.
- सुधारित फिट आणि आराम : गणवेशामुळे कमांडोंना धावणे, वाकणे, वेगाने दिशा बदलणे आणि इतर शारीरिक हालचाली सहजपणे करता आल्या पाहिजेत. तथापि, नवीन गणवेशाच्या फिट आणि डिझाइनचा संपूर्ण अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.