अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 13 आरोपी जेरबंद

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गतच्या विशेष सुट्टीकालीन न्यायालयाने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभिनेत्याच्या गोळीबार प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गतच्या (MCOCA) विशेष सुट्टीकालीन न्यायालयाने आज (11 नोव्हेंबर, बुधवारी) फूल सिंगसह पाच आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



गोळीबार प्रकरणातील आरोपींपैकी एक असलेल्या आरोपी फुल सिंग ह्याने मुंबईतील विशेष मकोका न्यायालयासमोर दावा केला आहे की तो अल्पवयीन आहे. पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वय पडताळण्यासाठी एक पथक हरियाणामध्ये पाठवण्यात आले आहे. त्याचा वय- पडताळणी अहवाल मुंबई पोलिसांकडून 18 नोव्हेंबर रोजी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. फुल सिंगसह रेहान, कुणाल, सुमित आणि अंकित या पाचही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष मकोका न्यायालयाने या पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये, 16 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.


या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 13 जण असलेल्या आरोपींमध्ये या पाचही आरोपींचा समावेश आहे. त्यापैकी सात जणांना आधीच न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे, तर 13 वी आरोपी सुनेहा पंडित हिला 16 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तपासाचा भाग म्हणून सर्व आरोपींना सुनेहा पंडीत हिच्यासमोर हजर करणे आवश्यक असल्याचे सांगत, विशेष मकोका न्यायलयाकडून आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने पाचही आरोपींना त्यांच्या पालकांशी फोनवर बोलण्याची परवानगी दिली असून त्यांचं संभाषण रेकॉर्ड न करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत.



आरोपी फूल सिंग अल्पवयीन आहे की नाही? हे निश्चित करण्याचे निर्देश विशेष मकोका न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले असून त्या प्रमाणेच त्याची वयोमर्यादा पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशेष न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी वयोमर्यादा पडताळणीचा अर्ज मंजूर केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील त्यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत. जोपर्यंत त्याचे वय समजत नाही, तोपर्यंत आरोपी फुल सिंगला बालसुधारगृहात हलवण्याची विनंती न्यायालयाने तात्काळ नाकारली आहे. न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या आत पडताळणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.


दरम्यान, फुल सिंगचे वकील सिद्धांत मोर आणि दिव्यम गौर यांनी अर्ज दाखल केला आहे की, त्याचा जन्म 30 नोव्हेंबर 2008 रोजी झाला आहे. अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये, फुल सिंगचा सहभाग होता. 18 ऑक्टोबर 2026 रोजी जेव्हा टायगरवर गोळीबार झाला तेव्हा तो अंदाजे 17 वर्षे 10 महिन्यांचा होता. फुल सिंगच्या वकिलांकडून त्याचे हरियाणा सरकारचे जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड सादर केले, ज्या दोन्हींवर जन्मतारीख सारखीच असल्याचे म्हटले आहे. फुल सिंग अल्पवयीन असल्याचे आढळल्यास त्याला मोठ्या व्यक्तींच्या कोठडीत ठेवू नये, असा युक्तिवाद करत फुल सिंगच्या वकिलांनी बाल न्याय कायद्यांतर्गत त्याला सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित करण्याची मागणी केली.


Comments
Add Comment

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवे आणि अटल सेतू जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू, फक्त 59 मिनिटांत मुंबई

मुंबई: मुंबई- पुणे प्रवास अधिक जलद आणि सुखकर करण्याच्या दृष्टीने सरकारकडून विशेष पाऊलं उचलली जात आहेत. मुंबई-

मंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला आग; एसीमधील शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज

मुंबई: दिवाळीच्या सणात राज्यभरात विविध ठिकाणी आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता एक अत्यंत

Mumbai Traffic News: छठ पूजेनिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; घर सोडण्यापूर्वी नक्की वाचा महत्त्वाचे नियम

मुंबई: मुंबई महानगर पालिकेकडून मुंबई शहरामध्ये यंदा छठ पूजेनिमित्त जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Mumbai Airport : मुंबईतील एकही विमानउड्डाण नवी मुंबईत स्थलांतरित होणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टर्मिनल-१च्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारला पत्र

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

मंत्रालयाच्या कँटीनमध्ये मिळणार शेगावची कचोरी, पुणेरी मिसळ; ५४ नव्या पदार्थांचा समावेश

मुंबई : मंत्रालय आणि विधानभवनातील कँटीनमधील खाद्यपदार्थांच्या दर्जात सुधारणा करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना

Kedarnath Temple : केदारनाथ यात्रा समाप्त, यंदा 19.22 लाख भाविकांनी घेतले दर्शन; 'जय बाबा केदार'च्या जयघोषात दरवाजे बंद

Kedarnath Temple : उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ धामची यंदाची यात्रा संपन्न झाली आहे. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाबा