Pravin Tarde Birthday: तो ब्लाॅकबस्टर आहे, तो डायलाॅगमास्टर आहे...प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त विजू मानेंची खास पोस्ट

'देऊळ बंद' फेम मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांचा आज वाढदिवस.त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खास प्रसंगी दिग्दर्शक विजू माने यांनी प्रवीण तरडेंसाठी लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजू माने नेमकं काय म्हणाले? त्यांची पोस्ट सोशल मीडियावर इतकी व्हायरल का होत आहे? एकेकाळचे स्पर्धक ते 'खतरनाक मित्र' अशी विजू माने आणि प्रवीण तरडे यांची मैत्री.

Pravin Tarde Birthday: 'देऊळ बंद' फेम मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांचा आज वाढदिवस.त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खास प्रसंगी दिग्दर्शक विजू माने यांनी प्रवीण तरडेंसाठी लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजू माने नेमकं काय म्हणाले? त्यांची पोस्ट सोशल मीडियावर इतकी व्हायरल का होत आहे? एकेकाळचे स्पर्धक ते 'खतरनाक मित्र' अशी विजू माने आणि प्रवीण तरडे यांची मैत्री.


दोन दिग्दर्शकांमध्ये अत्यंत घट्ट मैत्री आहे आणि हाच जुना काळ आठवत विजू माने यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. विजू माने यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रवीण तरडेंचा एक फोटो शेअर करत त्यांच्यातील निखळ मैत्रीचा प्रवास चाहत्यांसमोर सांगितला आहे.



विजू मानेंची पोस्ट
खतरनाक मित्र. प्रवीण तरडे भाई का बड्डे.... तो ब्लाॅकबस्टर आहे, तो डायलाॅगमास्टर आहे...ह्या सगळ्या पलीकडे तो प्रत्येकाच्या आयुष्यात असावा असा मित्र आहे... मदत कुणाला करायची आहे? याच्या आधी मदत काय करायची आहे? हा प्रश्न येणारा दिलदार. माझ्या एकांकिका काळातला प्रतिस्पर्धी आता माझ्या प्रत्येक सिनेमाचा 'निस्वार्थ' भाग असतो. लव्ह यू मित्रा. खूप मोठा आहेसच. अजून मोठा हो...happywala birthday





या पोस्टवर प्रवीण तरडे यांनीही कमेंट केली आहे. खूप खूप धन्यवाद मित्रा विजू.. आपली मैत्री पण ब्लॅाकबस्टर आहे.


प्रवीण तरडे यांनी 'देऊळ बंद', 'मुळशी पॅटर्न', 'धर्मवीर' आणि 'सरसेनापती हंबीरराव' यांसारख्या भव्य चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. तर दुसरीकडं विजू माने यांनीही आपल्या दिग्दर्शनानं मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 'पांडू' चित्रपटादरम्यान या दोघांची जुळलेली केमिस्ट्री प्रेक्षकांनी बघितली होती.

Comments
Add Comment

Rohit Shetty on viral FB comment: रोहित शेट्टी यांचा खुलासा, फेसबुकवरील पोस्ट माझी नाही, बनावट खात्यांपासून सावध राहा

प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या एका वादावर अखेर मौन सोडले आहे. त्यांच्या

Ranveer Sinh Grandfather: रणवीर सिंगच्या आजोबांचे निधन; बहीण सौम्याने शेअर केली भावूक पोस्ट

Ranveer Sinh: दिवाळीनिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या घरी दुःखद घटना घडली आहे.

IPL ची 'मिस्ट्री गर्ल' काव्या मारन अडकणार विवाहबंधनात! संगीतकार अनिरुद्धसोबत ग्रीसमध्ये साखरपुडा

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादच्या सह-मालक काव्या मारन यांचा १० नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये

Marathi Entertainment News: 13 वर्षांनंतर पुन्हा जमणार ललित-प्राजक्ताची जोडी! नव्या चित्रपटातील सीन लीक?

Marathi Entertainment News: मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री

Ramayana Oscar 2027: रणबीर कपूरच्या रामायणची ऑस्करच्या शर्यतीत एंट्री?

मुंबई: बॉलीवूडचे ख्यातनाम आणि अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित व महाकाय

कर्णधार गिल लग्नबंधनात अडकणार? रोहित शर्मा शोमध्ये शुभमन बद्दल काय म्हणाला?

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचा 'फॅमिली फुल हाऊस विथ रोहित' हा शो सध्या बऱ्याच लोकप्रिय होत आहे. या शोच्या