Ashish Shelar : मुंबईत 5 हजार बालके कुपोषित; ही बाब अत्यंत शरमेची! 'कुपोषणमुक्त मुंबई'साठी एसआरएने स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा

मुंबईतील 5 हजार कुपोषित बालकांच्या संख्येवर चिंता व्यक्त करत पालकमंत्री आशिष शेलार यांनी 'कुपोषणमुक्त मुंबई'साठी एसआरएने स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा आणि पंधरा दिवसांत कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

मुंबई: मुंबईत मध्यम कुपोषित बालकांची संख्या 5 हजार असून ही बाब आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत शरमेची आहे, अशी स्पष्ट शब्दांत खंत व्यक्त करत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी 'कुपोषणमुक्त मुंबई' अभियान राबवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.



एसआरएने हाती घ्यावा स्वतंत्र कार्यक्रम


ज्याप्रमाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (SRA) 'झोपडपट्टीमुक्त मुंबई' असा संकल्प केला आहे, त्याच धर्तीवर आता झोपडपट्ट्यांमध्ये असणारे कुपोषण रोखण्यासाठी एसआरएने 'कुपोषणमुक्त मुंबई' असा स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच यासंदर्भातील सविस्तर कृती आराखडा येत्या पंधरा दिवसांत सादर करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. एसआरए योजनांमधील झोपडपट्ट्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याबरोबरच अंगणवाड्यांच्या जागेचा प्रश्नही कायमस्वरूपी सोडवावा, असे त्यांनी नमूद केले. यासाठी मुंबई महानगरपालिका, महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाची मदत घ्यावी, असे सांगण्यात आले.



महापालिकेला दिलासादायक व कठोर निर्देश


ही गंभीर परिस्थिती बदलण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व संबंधित प्राधिकरणे आणि शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून एक ठोस कृती आराखडा तयार करावा आणि महिन्याभरात अहवाल सादर करावा, असे निर्देश आशिष शेलार यांनी दिले. याशिवाय, दुष्काळी परिस्थितीमुळे मुंबईत स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांसोबत येणाऱ्या बालकांची तातडीने नोंदणी करून त्यांना योग्य पोषण आहार आणि आवश्यक आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Mumbai local train incident : मुंबई लोकल प्रवासात संतापजनक घटना : विनयभंगाला विरोध केल्याने महिलेला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलले; पीडितेला हात गमवावा लागल्याने खळबळ

मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बोरीवली

मुंबईत संतापजनक प्रकार! फटाके फोडण्याच्या वादातून दाम्पत्य आणि चिमुरडीवर 10 जणांचा जीवघेणा हल्ला

मुंबई: दिवाळीच्या आनंदात मग्न असलेल्या मुंबई शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.

Ashish Shelar : 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान राज्यभर 'भगवान बिरसा मुंडा गौरव दिन सप्ताह'; मुंबई उपनगरात 5 लाख वृक्षलागवडीचा संकल्प!

मुंबई : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिन साजरा होत असून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने 11 ते 18

मुंबईतील कुकची महिना 1.05 लाख कमाई, एमबीएवाल्यांनाही मागे टाकले

मुंबईत एका घरात स्वयंपाकाचे काम करणाऱ्या कुकची कहाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या कुकची

Mumbai Diwali fire: मुंबईत पाच दिवसांमध्ये एकूण 499 आगीच्या दुर्घटना; फटाक्यांमुळेच लागल्या तब्बल 333 आगी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत दीपावलीच्या उत्सवामध्ये मोठयाप्रमाणात आगी लागण्याच्या दुर्घटना घडल्या असून

Water Wastage : पाण्याचा अपव्यय: आयुक्तांचे आदेश धाब्यावर, रस्त्यांवर मोटरद्वारे पाण्याचा वापर करून धुतली जातात वाहने

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर पिण्याचा पाण्याचा अपव्यय होवून तसेच पिण्या