फटाके फोडायला गेला अन् 50 फूट खोल दरीत कोसळला, पनवेलमध्ये 16 वर्षीय मुलाचा थरारक बचाव

दिवाळीचा आनंद साजरा करताना एक क्षणाचा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याचा धक्कादायक अनुभव पनवेलमध्ये एका कुटुंबाला आला. फटाके फोडण्यासाठी घराबाहेर पडलेला १६ वर्षांचा मुलगा थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळला.

दिवाळीचा आनंद साजरा करताना एक क्षणाचा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याचा धक्कादायक अनुभव पनवेलमध्ये एका कुटुंबाला आला. फटाके फोडण्यासाठी घराबाहेर पडलेला १६ वर्षांचा मुलगा थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळला. सुमारे ४० ते ५० फूट खोलवर पडलेल्या या मुलाला अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून बाहेर काढले, त्यामुळे त्याचे प्राण वाचले. ही घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. कर्नाळा स्पोर्ट्स परिसराजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून तो खाली पडला. हा पूल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. फटाक्यांच्या धमाक्यांमध्ये नेमके काय घडले, हे कळायच्या आतच मुलगा खोल भागात कोसळला होता. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा करताच परिसरात एकच गोंधळ उडाला.

माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाची दोन वाहने सायरन वाजवत घटनास्थळी पोहोचली. मात्र घटनास्थळापर्यंत पोहोचणेही सोपे नव्हते. रस्ता नसल्यामुळे दोन जवानांनी तब्बल दीड किलोमीटर पायपीट करत खोल भागापर्यंत धाव घेतली. अंधार, खडकाळ जमीन आणि खोल दरी यामुळे बचावकार्य अधिकच अवघड झाले होते. जवानांनी परिस्थितीचा अंदाज घेत तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ बोलावले. त्यानंतर तीन दोरखंड, बॉडी हार्नेस, हेल्मेट आणि टॉर्चच्या मदतीने खाली उतरण्याची तयारी करण्यात आली. एक जवान दोराच्या साहाय्याने हळूहळू खाली उतरला आणि जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाला सुरक्षितपणे हार्नेसमध्ये बांधले. वरून इतर जवानांनी दोर खेचत दोघांनाही वर आणले. तब्बल तासभर चाललेल्या या थरारक प्रयत्नानंतर मुलाची सुटका करण्यात आली. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले.



बचाव झालेला मुलगा ओल्ड पनवेलमधील लाइन आळी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. या मोहिमेत अग्निशमन दलाच्या पथकाने दाखवलेले धाडस आणि शिस्त याचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. दरम्यान, या उड्डाणपुलावर अजूनही काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तिथे गर्दी करू नये आणि फटाके फोडू नयेत, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे. दिवाळीत आनंद साजरा करताना सुरक्षित ठिकाण निवडणे किती गरजेचे आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
Comments
Add Comment

Teacher Promotion Stay: जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नतीला तूर्त स्थगिती

मुंबई(सुहास शेलार): राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला तूर्त स्थगिती देण्याचे

Nanded News: 'दुष्काळात तेरावा महिना'! रील बनवण्याच्या नादात फटाक्यांची आतषबाजी; पाच एकर ऊस जळून खाक, Video

नांदेंड : महाराष्ट्रात आधीच भीषण दुष्काळजन्य परिस्थिती असताना, नांदेडमधून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल; दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा, पुढील काही दिवस हवामान कोरडे

Maharashtra Weather : नोव्हेंबर महिन्यात राज्यातील हवामानात बदल जाणवू लागला आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारवा वाढत असून,

Central Government : रब्बी हंगामासाठी केंद्राकडून ६२ हजार ३७० कोटींची तरतूद

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खतांच्या वाढत्या किमतींच्या

इंस्टाग्राम रील्स बनवून मिळवा 1 लाख रुपये! महाराष्ट्र सरकारची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी नवी संधी

सोशल मीडियावर रील्स, शॉर्ट्स आणि व्हिडिओ तयार करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता

गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या 3 समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’चा अंतिम आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई: महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि महत्त्वपूर्ण कामगिरीची नोंद झाली आहे.