पहिल्या षटकात काय घडलं?
न्यूझीलंडकडून पहिलं षटक टाकण्यासाठी मॅट हेनरी आला होता. त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला तंबूचा रस्ता दाखवला. रोहित शर्माला गोल्डन डकवर बाद झाला. या मालिकेत शून्यावर बाद होण्याची रोहित शर्माची ही दुसरी वेळ आहे. त्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला आणि त्याने तीन चेंडू खेळून काढले. पण पाचव्या चेंडूवर मॅट हेनरीने त्याची विकेट काढली. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली. कर्णधार श्रेयस अय्यरकडून अपेक्षा होती. मात्र श्रेयस अय्यर आणि पहिल्याच चेंडूवर पायचीत होऊन तंबूत परतला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तीन सामन्यानंतर 2-0 अशी स्थिती आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्याने ...
यापूर्वी असं कधी घडलं होतं?
वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी अशीच घटना 2010 मध्ये दांबुला येथे श्रीलंकेविरुद्ध घडली होती. वनडे सामन्यांमध्ये एकही धाव न काढता पहिल्या तीन विकेट गमावणारे चार संघ आहे. यात पाकिस्तानवर अशी स्थिती दोन वेळा ओढावली आहे. वनडे वर्ल्डकप 1983 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने तीन विकेट गमावले होते. त्यानंतर 1997 मध्ये लाहोरमधील वनडे सामन्यात पाकिस्तानवर अशीच स्थिती ओढावली होती. तेव्हा दक्षिण अफ्रिकेने पहिल्याच षटकात तीन विकेट काढल्या होत्या. वनडे वर्ल्डकप 2003 मध्ये पीटरमारित्झबर्ग येथे रंगलेल्या सामन्यात श्रीलंकने बांगलादेशचे तीन विकेट पहिल्या षटकात काढले होते. अशीच स्थिती ऑस्ट्रेलियाची 2026 मध्ये झाली होती. मिरपूरमध्ये रंगलेल्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचे तीन विकेट काढले होते. आता भारत न्यूझीलंड सामन्यात भारतावर अशी नामुष्की ओढावली आहे.
10 धावांच्या आत 4 विकेट गमवण्याची दुसरी वेळ
पहिल्या षटकात तीन विकेट गमवल्यानंतर ऋतुराज गायकवाडही फार काळ तग धरू शकला नाही. सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर काइल जेमिसनने त्याची विकेट काढली. या सामन्यात फक्त 5 धावा करून बाद झाला. या विकेटसह वनडे सामन्यात 10 पेक्षा कमी धावांत पहिल्या चार विकेट गमावण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 1983च्या विश्वचषक स्पर्धेत टुनब्रिज वेल्स येथे झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताची 9 धावांवर 4 विकेट अशी स्थिती होती.