Mumbai Airport News: ना विमान, ना माहिती! मुंबई विमानतळावर स्पाईसजेटच्या प्रवाशांचा संताप

देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर मंगळवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत.

Mumbai Airport News: देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर मंगळवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत. मुंबई विमानतळावरून स्पाईसजेटचे एकही विमान उड्डाण करण्यात आलेले नाही. साहजिकच, एअरलाइनच्या काउंटरवर प्रवाशांची मोठी गर्दी असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून स्पाईसजेटच्या अनेक विमानांना विलंब होत आहे. त्यामुळे स्पाईसजेटविरोधात त्रस्त प्रवाशांनी घोषणाबाजीही केली.


विमानांसाठी बोर्डिंगला रात्री 11:30 वाजताच्या सुमारास खूप उशीर झाला. यासंदर्भात प्रवाशांना विलंबाचे कारण किंवा अपेक्षित प्रस्थान वेळेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच स्पाईसजेट किंवा विमानतळ प्रशासनाकडून प्रवाशांना कोणतीही समाधानकारक व स्पष्ट उत्तरे मिळू शकली नाहीत, ज्यामुळे घबराट आणि अस्वस्थता निर्माण झाली.






प्रवाशांना विमानतळावर थांबण्यास भाग पाडले गेले


आपली विमाने केव्हा उड्डाण करतील याबद्दल माहिती नसल्याने, प्रवासी विमानतळावर वाट पाहत राहिले. तसेच स्पाईसजेट विलंबाबद्दल किंवा नवीन प्रस्थान वेळेबद्दल कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. स्पाईसजेटने अद्याप या संदर्भात कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून स्पाईसजेटच्या विमानसेवेवर सतत परिणाम झाला आहे. मागील आठवड्यात, म्हणजेच रविवारी एअरलाइनने दुबईहून चार उड्डाणे रद्द केली. थकबाकी न भरल्यामुळे एअरलाइनच्या ग्राउंड-हँडलिंग कंपनीने चेक-इन सेवा निलंबित केल्यामुळे हे घडले आहे असे सांगण्यात आले आहे. स्पाईसजेटकडे ग्राउंड-हँडलिंग कंपनी डनाटाचे 14 दशलक्ष यूएई दिरहॅमपेक्षा जास्त देणे आहे. चेक-इन सेवांचे हे निलंबन केवळ 12 नोव्हेंबरपर्यंतच वैध होते.





दिल्ली-मुंबई विमानतळासाठी सूचना जारी


आगीत आठवड्यातील शुक्रवारी, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने (आयजीआयए) देखील प्रवाशांना सूचना जारी केल्या होत्या. एअरलाइनला भेडसावणाऱ्या परिचालन अडचणींमुळे स्पाइसजेटच्या विमानांना संभाव्य विलंब किंवा इतर व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवली गेली होती. दुसऱ्या दिवशी, शनिवारी, मुंबई विमानतळानेही प्रवाशांसाठी अशीच सूचना जारी करण्यात आली. नोव्हेंबरमध्ये, सुमारे 65 नियोजित सेवा चालवत असूनही, एअरलाइन दररोज 15 ते 20 उड्डाणे रद्द करत आहे.  महसूल वार्षिक तुलनेत 13.4 टक्क्यांनी घटून 792 कोटी रुपयांवर आला.

Comments
Add Comment

Dawood House Demolition: भेंडी बाजारातील दाऊदच्या घरावर महापालिकेची कारवाई; धोकादायक इमारत जमीनदोस्त होणार

Dawood House Demolition: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे शहर ऐतिहासिक आणि गर्दीचा भाग म्हणून ओळखला जातो. यंत्रमाग उद्योगाची राजधानी,

BSc Nursing College: बीएससी नर्सिंग कॉलेजच्या समोर उबाठा आडवे

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या वांद्रयातील के. बी. भाभा महानगरपालिका रुग्णालयातील

BMC च्या मालमत्ता कर वसुलीसाठी व्हॉट्सअप आणि गुगल मेसेजचा वापर करणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मालमत्ता कराची वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी आणि मालमत्ताधारकांना सुविधा देण्यासाठी

मुंबईत तात्पुरत्या अंगणवाड्यांसाठी उद्यान, मैदानांमध्ये कंटेनरची सुविधा? ठरावाच्या सूचनेद्वारे केली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक एसआरए तसेच इतर गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये बालवाडीच्या जागा बाधित होत

Kandivali Railway Station: कांदिवली रेल्वे स्थानकात पाकिस्तानी दहशतवादी? RPF ची धावपळ; व्हिडीओ व्हायरल

मुंबई: अनेकदा AI व्हिडिओमुळे आपण सहज फसतो, या बनावट व्हिडिओमुळे रेल्वे पोलीस आणि RPF पोलिसांची चांगलीच पळापळ झाली

Mumbai Food Safety: मुंबईतील हॉटेल्स, रेस्तराँमध्ये लाईव्ह किचन स्क्रीन बसवणे बंधनकारक

मुंबई (विशेष प्रतिनिधी): खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता निर्माण व्हावी आणि नागरिकांच्या आरोग्याचे