तरुणांसाठी आनंदाची बातमी! नोकरी आणि स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी; कसं करायचा अर्ज...

महाराष्ट्र शासनाच्या अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम (STEP) योजनेचे नामकरण आता 'संत रोहिदास अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम' असे करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला असून, हजारो युवकांसाठी कौशल्य विकासाची मोठी संधी खुली झाली आहे.

मुंबई: आजच्या धावपळीच्या आणि सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी असणे पुरेसे राहिलेले नाही, तर हातात प्रत्यक्ष कौशल्य असणे ही काळाची मोठी गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत (ITI) राबविण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम म्हणजेच STEP योजनेचा विस्तार केला असून, या कार्यक्रमाला आजपासून ‘संत रोहिदास अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नवीन नाव देण्यात आले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त डॉ. अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी तसेच राज्यातील तब्बल 400 आयटीआयचे प्राचार्य ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते.






आधुनिक तंत्रज्ञानावर भर आणि लवचिकता


उद्योगांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन पारंपरिक कौशल्यांसोबतच ‘न्यू एज’ तंत्रज्ञानाचे धडे देण्यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला आहे. यामध्ये ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, HVAC आणि सेमीकंडक्टर यांसारख्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांचा समावेश आहे. नियमित शिक्षण किंवा नोकरी-कामासोबतच तरुणांना प्रशिक्षण घेता यावे, यासाठी दोन, तीन किंवा चार तासांचे प्रमाणित अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.



टप्प्याटप्प्याने वाढलेला विस्तार आणि निधीची तरतूद


8 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात 414 आयटीआय आणि 122 शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रांमध्ये 1,766 तुकड्या सुरू करून 51,042 प्रशिक्षणार्थ्यांनी प्रवेश घेतला. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा नियोजन निधीतून 88 तुकड्यांना मंजुरी मिळाली. आता तिसऱ्या टप्प्यात 56 शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रांतील 67 तुकड्या आणि 346 आयटीआयमधील 817 तुकड्या अशा एकूण 884 तुकड्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या टप्प्यासाठी 26,520 प्रशिक्षण प्रवेश क्षमता उपलब्ध असून, आतापर्यंत 18,266 प्रशिक्षणार्थ्यांनी प्रवेश घेतला असून तिसऱ्या टप्प्यासाठी ‘दक्ष’ (DAKSH) निधीतून तरतूद केली जाणार आहे.






महिलांचा सहभाग आणि पहिल्या दिवसापासून प्रात्यक्षिक


महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष अभ्यासक्रम राबविले जात असून, पहिल्या टप्प्यात 260 तुकड्यांद्वारे 7,234 महिला प्रशिक्षणार्थ्यांना संधी मिळाली. यामध्ये सेमीकंडक्टर टेक्निशियन, ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि ब्युटी थेरपिस्ट यांसारख्या कोर्सेसचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थ्यांना पहिल्या दिवसापासून कच्च्या मालासह प्रत्यक्ष कामाचे आणि प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण मिळायला हवे, जेणेकरून आयटीआयचा ब्रँड अधिक भक्कम होईल आणि युवकांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या भक्कम संधी मिळतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Jejuri Morgao Road Accident: जेजुरी-मोरगाव रस्त्यावर काळाचा घाला! शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; नाझरे परिसरात शोककळा

पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर सोमवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. शिवाई बस आणि दुचाकी

Air Ambulance Service: प्रताप सरनाईक यांचा महत्त्वाचा निर्णय; एअर ॲम्ब्युलन्स सेवेसाठी समिती स्थापन

मुंबई: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या

अहिल्यानगर शहरात भाजपकडून 'लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव' महारॅलीचे आयोजन, पदयात्रेमध्ये हजारो नागरिक यात्रेत सहभागी

अहिल्यानगर: लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव महारॅली हे कोणतेही शक्तीप्रदर्शन नाही. लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण बस अपघात; 2 प्रवाशांचा मृत्यू, 30 जण जखमी

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक 426 येथे रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला.

भूजलाचा ठणाणा; दुष्काळाचे संकट अधिक गडद, गर तालुक्यात सर्वाधिक 4.87 मीटरची घसरण

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : पावसाने पाठ फिरवली, जलसाठे आटू लागले आणि आता जमिनीच्या पोटातील पाण्यानेही तळ गाठण्यास

Bhandara Hit And Run Case: भंडाऱ्यात हिट अँड रनचा थरार; भरधाव वाहनाच्या धडकेत सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, वाहनचालक पसार

भंडारा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील तामसवाडी येथे हिट अँड रनची घटना घडली असून भरधाव