Nashik : पंचवटी एक्सप्रेसखाली येऊन मामा-भाचा गंभीर जखमी, मामाच्या हाताची चार बोटे तुटली तर भाच्यानं पाय गमावला

या अपघातात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने दोघांनाही गंभीर दुखापत झाली. १२ वर्षीय भाच्याचा एक पाय निकामी झाला असून, त्याला तो गमवावा लागला आहे. तर मामाच्या हाताची चार बोटे तुटली आहेत. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

नाशिक : रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात पंचवटी एक्सप्रेसखाली आल्याने मामा आणि त्यांचा अवघा १२ वर्षांचा भाचा गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत चिमुकल्या भाच्याला आपला एक पाय गमवावा लागला, तर मामाच्या हाताची चार बोटे तुटली आहेत.



नेमका हा अपघात कसा घडला ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मामा आणि त्यांचा १२ वर्षीय भाचा पंचवटी एक्सप्रेसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान गाडी इगतपुरी रेल्वे स्थानकावर थांबली. यावेळी भाचा लघुशंकेसाठी खाली उतरला. मात्र, तो खाली उतरलेला असतानाच अचानक रेल्वे सुरू झाली. याच गडबडीत दोघांचाही तोल गेला आणि ते थेट रेल्वेच्या चाकाखाली आले. या अपघातात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने दोघांनाही गंभीर दुखापत झाली. १२ वर्षीय भाच्याचा एक पाय निकामी झाला असून, त्याला तो गमवावा लागला आहे. तर मामाच्या हाताची चार बोटे तुटली आहेत. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.






 इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु 


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही तात्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता पुढील उपचारांसाठी नाशिकला हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा या घटनेतून अधोरेखित झाली आहे. गाडी थांबल्यानंतरही सुरक्षिततेची खात्री केल्याशिवाय खाली उतरू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिकमध्ये FDA ची धडक कारवाई ! तीन आस्थापनांचे परवाने निलंबित

नाशिक : शहरातील हॉटेल आणि अन्न आस्थापनांमधील स्वच्छता तसेच अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात

Nashik : पंचवटीत खोदकामादरम्यान पुरातन मंदिरांचा शोध ! नंदी, शिवलिंगासह मंदिरांचे अवशेष आढळले

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात सुरू असलेल्या रामकाल पथ विकासकामादरम्यान एक

School Bus Accident: आनंदाच्या सहलीचा दुःखद शेवट! स्कूल बस आणि ट्रक अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर मंगळवारी (24 नोव्हेंबर) सकाळी भीषण रस्ते अपघात घडला.

उद्योगजगताला कानपिचक्या

सरकारने करसवलती, व्यापार करार आणि उद्योगपूरक धोरणांतून उद्योगजगतासाठी संधींची दारे खुली केली आहेत. आता

FDA Mumbai: मुंबईत अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; विद्यापीठ कॅन्टीनसह 6 आस्थापनांवर कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर धडक कारवाई

दुष्काळी भागात ताकदीने काम करा; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नगराध्यक्षांना निर्देश

राज्यातील दुष्काळाची दाहकता पाहता दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जोमाने काम करा, असे निर्देश