सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिक महापालिकेत मेगाभरती ! 212 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची अंतिम मुदत

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी तब्बल १८ संवर्गांतील २१२ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही भरती मानधन तत्त्वावर केली जाणार असून वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टरांपासून ते स्टाफ नर्स आणि फार्मासिस्ट अशा विविध पदांचा यात समावेश आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया हाती घेतली आहे. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी तब्बल १८ संवर्गांतील २१२ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही भरती मानधन तत्त्वावर केली जाणार असून वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टरांपासून ते स्टाफ नर्स आणि फार्मासिस्ट अशा विविध पदांचा यात समावेश आहे.


या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया २४ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ९ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. अर्जाचा नमुना नाशिक महापालिकेच्या अधिकृत www.nmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.



कुठे आणि कसा कराल अर्ज ?


उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करायचा आहे. अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण सार्वजनिक आरोग्य विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक असे आहे. कार्यालयीन वेळेत उमेदवारांना येथे अर्ज जमा करता येणार आहेत.



कोणत्या पदांसाठी किती जागा ?


या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या १५, शल्यचिकित्सक २, स्त्रीरोग तज्ज्ञ ५, अस्थिरोग तज्ज्ञ २, बालरोग तज्ज्ञ ५, क्ष-किरण तज्ज्ञ २, बधिरीकरण तज्ज्ञ २, त्वचारोग तज्ज्ञ २ आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या २ जागा आहेत. याशिवाय फिजिओथेरपिस्ट २, स्टाफ नर्स ७९, एएनएम ५७, फार्मासिस्ट २५, कुष्ठरोग तंत्रज्ञ ४, शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञ २, ईसीजी तंत्रज्ञ २, बायोमेडिकल इंजिनिअर १ आणि संगणक ऑपरेटरच्या १० जागा भरल्या जाणार आहेत. अशा एकूण २१२ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.






निवड प्रक्रिया आणि नियुक्तीचा कालावधी


उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेतील गुण आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव तसेच तांत्रिक प्रमाणपत्रे असणे बंधनकारक आहे. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.


निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मानधन तत्त्वावर नियुक्ती दिली जाणार आहे. ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असून, या भरतीतून महापालिकेच्या नियमित सेवेत कायम होण्याचा कोणताही अधिकार मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



अर्ज करण्याची महत्त्वाची माहिती


अर्ज सुरू होण्याची तारीख : २४ नोव्हेंबर २०२६


अर्जाची अंतिम तारीख : ९ डिसेंबर २०२६


अंतिम वेळ : सायंकाळी ५ वाजेपर्यंत


अधिकृत संकेतस्थळ : www.nmc.gov.in


अर्ज सादर करण्याचे ठिकाण : सार्वजनिक आरोग्य विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून आरोग्य विभागातील मनुष्यबळ वाढवण्याच्या दृष्टीने महापालिकेची ही भरती महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे संबंधित शैक्षणिक पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी ही संधी ठरणार आहे.

Comments
Add Comment

Nvidia server supply halt Southeast Asia : दक्षिण-पूर्व आशियातील ४ देशांत 'एनव्हिडिया'कडून सर्व्हर पुरवठ्याला ब्रेक; जेनसन हुआंग पुन्हा CEO पदी परतताच...AI क्षेत्रात खळबळ

प्रसिद्ध अमेरिकी चिप उत्पादक कंपनी 'एनव्हिडिया'ने (Nvidia) दक्षिण-पूर्व आशियातील चार देशांना होणारा सर्व्हर पुरवठा

सौदीच्या तेल प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला! कच्चे तेल $82 च्या पार; जागतिक बाजारपेठेत खळबळ?

रियाध : मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला असून, येमेनमधील हुथी बंडखोरांनी बुधवारी सौदी

Pankaj Tripathi: मराठी नाटकाच्या प्रेमात पंकज त्रिपाठी! 'एक तिची गोष्ट'ला म्हणाले 'अद्भुत'

मुंबई: सध्या मराठी मनोरंजन विश्वाला चांगले दिवस आले असून एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

केन विल्यमसन आता थेट मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत; SA20 मध्ये नवी इनिंग!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केन विल्यमसनने आता एका नव्या आणि

उधार घेतलेली बॅट अन् बदललेलं नाव! दुसऱ्या कसोटीपूर्वी ऋषभ पंतने न्यूझीलंडमध्ये खेळला लोकल सामना; VIDEO व्हायरल

भारत न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्च येथे सुरू होमार आहे. या

Oregon coast king tide video : काळजाचा ठोका चुकवणारा थरार! 'किंग टाइड'च्या महाकाय लाटांमध्ये माणूस आणि कुत्रा वाहून गेले, पण पुढे जे घडलं...

अमेरिकेतील ओरेगन प्रांताच्या समुद्रकिनाऱ्यावर उसळलेल्या जोरदार लाटांमध्ये एक माणूस आणि त्याचा पाळीव कुत्रा