मुंबई २६/११: वीरांच्या शौर्याची कहाणी सांगणारे चित्रपट- वेब सीरिज
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा थरार आणि त्या काळ्या रात्रीच्या घटनांचे चित्रण करणारा चित्रपट म्हणजे द अटॅकस ऑफ 26/11 .
November 26, 2026 04:14 PM
Photo: AI Generated
The Attacks of 26/11 (2013): मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा थरार आणि त्या काळ्या रात्रीच्या घटनांचे चित्रण करणारा चित्रपट म्हणजे द अटॅकस ऑफ 26/11 . मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याची भयावहता, दहशतवाद्यांचा शहरातील प्रवास आणि पोलिसांच्या धैर्याची कहाणी या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. 26/11 हल्ल्यातील घटनांवर आधारित हा चित्रपट त्या काळातील भीषण वास्तवाची आठवण करून देतो.
Hotel Mumbai (2019): ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यादरम्यान हॉटेल कर्मचारी, पाहुणे आणि सुरक्षा दलांनी दाखवलेले धैर्य या चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. संकटाच्या काळात मानवता आणि शौर्य कसे उभे राहते, याचे चित्रण हा चित्रपट करतो.
Major (2022): हा चित्रपट एनएसजी कमांडो संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा बायोपिक मोहिमे दरम्यानचे त्यांचे जीवन आणि बलिदान दर्शवतो, तसेच रणांगणापलीकडील शौर्याचा गौरव करणारा आहे.
Phantom (2015): 26/11 च्या घटनेनंतरच्या पार्श्वभूमीवर आधारित एक काल्पनिक सूडपट म्हणजे हा चित्रपट. फॅनटम जबाबदार लोकांना लक्ष्य करणाऱ्या एका गुप्त मोहिमेची कल्पना करतो, जी राष्ट्रीय संताप आणि न भरून आलेल्या जखमांचे प्रतिबिंब आहे.
Mumbai Diaries 2611 (2021) मुंबईतील रुग्णालयांमध्ये हल्ल्याच्या रात्री डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या संघर्षाची ही मालिका आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवकांचे धैर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा अधोरेखित केली आहे.
State of Siege 2611 (2020) 2611 हल्ल्यादरम्यान NSG कमांडोंनी केलेल्या ऑपरेशनचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. दहशतवाद्यांचा मुकाबला करताना जवानांनी दाखवलेले धैर्य, रणनीती आणि त्याग या मालिकेचा केंद्रबिंदू आहे.