Nashik Crime : होस्टेलवर राहणाऱ्या तरुणींना अश्लील व्हिडिओ पाठवले अन्..., 21 वर्षीय संशयित पेठमधून ताब्यात

Nashik Crime :  नाशिकमध्ये शिक्षणासाठी होस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणींना लक्ष्य करून त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून अश्लील व्हिडिओ पाठवणे, तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या अंबड युनिट-३ पथकाने संशयिताला पेठ येथून ताब्यात घेतले आहे. प्रसाद मारुती माळी (वय २१, रा. सोनेवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे त्याचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि तिची मैत्रीण शिक्षणासाठी होस्टेलमध्ये वास्तव्यास आहेत. याचदरम्यान संशयित प्रसाद माळी हा त्यांना वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून अश्लील व्हिडिओ पाठवत असल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.






या प्रकरणी शुक्रवारी (दि. २०) रात्री अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने संशयिताचा शोध सुरू केला. तपासादरम्यान अंबड गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयित पेठ येथे असल्याची माहिती मिळवली.


त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण आणि पोलीस अंमलदार कुणाल पचलोरे यांच्या पथकाने मंगळवारी (दि. २४) रात्री साडेनऊच्या सुमारास पेठ येथील शिवांजली हॉटेल परिसरात सापळा रचला. या कारवाईत प्रसाद माळी याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Ramayana Movie: ‘रामायण’ टीमची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट; चित्रपटाने कमाईचे विक्रम मोडले

काही दिवसांतच नमित मल्होत्राच्या 'रामायण' चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण होईल आहे

Aata Hou De Dhingana: 'आता होऊ दे धिंगाणा'च्या प्रेक्षकाला सोन्याची भेट! पुण्याच्या श्रीदेवींनी जिंकले 1 तोळ्याचे नाणे

Aata Hou De Dhingana: स्टार प्रवाहच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या धिंगाणेबाज कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या घराघरांत आनंद आणि

Delhi Crime News : प्रवास सेवा देण्याच्या बहाण्याने 25 लाखांची फसवणूक; दोघांना अटक

दिल्ली : प्रवास सेवा पुरवण्याच्या बहाण्याने कंपनीच्या प्रतिनिधीची 25 लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी

क्रीजवर कोणीच नाही, तरीही बॉल टाकला अन् फलंदाज OUT! क्रिकेटमधील हा अजब नियम तुम्हाला माहिती आहे का? VIDEO

वुमन्स बिग बॅश लीग 2026 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात लढत झाली. या

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन अलर्ट ! सर्व विभागांना 15 डिसेंबरची डेडलाईन ; आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश

Nashik : आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्यासाठी नाशिक प्रशासनाने आतापासूनच तयारीला वेग दिला आहे. कुंभमेळ्याच्या काळात

'रेड बुक'वरून योगी आदित्यनाथांचा विरोधकांना टोला; संविधान दिनी जोरदार टीका!

Constitution Day 2026: संविधान दिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्रिमंडळातील