
बाजारपेठेतून चिप्स, बिस्किटे, चॉकलेट किंवा कोणतेही पॅकेज्ड फूड खरेदी करताना अनेकदा पाकिटाच्या मागील बाजूला बारीक अक्षरात लिहिलेली माहिती असते, ती माहिती वाचणे कठीण जाते. अनेकदा आपण नकळत “HIGH FAT”, “HIGH SUGAR” किंवा “HIGH SALT” असलेले पदार्थ खातो. मात्र, नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, “HIGH FAT”, “HIGH SUGAR” किंवा “HIGH SALT” असलेल्या पॅकेज्ड खाद्यपदार्थांच्या पॅकेटच्या पृष्ठभागावर स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे. संविधानात आरोग्याच्या अधिकाराचा उल्लेख असून, संविधान दिनाच्या निमित्ताने दिलेला हा निर्णय देशाला निरोगी भविष्याकडे नेणारा ठरेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
(बातमी अपडेट होत आहे)






