Bandra Station: बांद्रा स्टेशनला 162 वर्षे पूर्ण; तीन दिवसीय ‘बांद्रा स्टेशन महोत्सव 2026’ ला उत्साहात सुरुवात

Bandra Station: मुंबईच्या ऐतिहासिक बांद्रा रेल्वे स्टेशनने १६२ वर्षांचा टप्पा गाठला आहे. या निमित्ताने पश्चिम रेल्वेच्या मुंबई मंडळाने २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान ‘बांद्रा स्टेशन महोत्सव २०२६’ आयोजित केला आहे. स्टेशनच्या स्थापत्य कला, इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचा जागर या महोत्सवातून केला जात आहे. २८ नोव्हेंबर १८६४ रोजी बांद्रा उपनगरीय स्टेशनचं उद्घाटन झालं होतं. त्या ऐतिहासिक दिवसाच्या १६२ व्या वर्धापन दिनानिमित्त हा तीन दिवसीय सोहळा रंगतोय. शुक्रवारी या महोत्सवाचं उद्घाटन झालं. राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, बांद्रा पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई आणि मुंबई सेंट्रल मंडळाचे मंडल रेल प्रबंधक पंकज सिंह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी वरिष्ठ रेल्वे अधिकारीही उपस्थित होते.सोहळ्याची सुरुवात रेल्वे सुरक्षा बलाच्या फ्लॅग मार्चने झाली.


यानंतर बांद्रा स्टेशनच्या वारशाला समर्पित ‘द स्टेशन दॅट मेड हिस्ट्री’ या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं. त्यानंतर नुक्कड नाटक आणि पश्चिम रेल्वेच्या सांस्कृतिक टीमचा संगीतमय कार्यक्रम रंगला. याने उपस्थितांची मने जिंकली.या महोत्सवात बांद्रा स्टेशनच्या इतिहासाची झलक दाखवणारी विशेष हेरिटेज फोटो प्रदर्शनी मांडण्यात आली आहे. दुर्मिळ जुन्या छायाचित्रांमधून स्टेशनचा भूतकाळ आणि त्याच्या विकासाचा प्रवास पाहायला मिळतोय. पहिल्या दिवशी फोटो प्रदर्शनाचं उद्घाटन आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे मुख्य आकर्षण ठरलं.दुसऱ्या दिवशीही सोहळा सुरूच राहणार आहे. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता होणारा ‘आफ्रिकन आर्ट ऑफ ड्रमिंग’ हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अनुभव देणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. समारोपाच्या दिवशीही विविध सांस्कृतिक आणि हेरिटेज उपक्रम होणार आहेत.






जनसहभाग वाढावा म्हणून ‘बांद्रा स्टेशन’ या संकल्पनेवर आधारित कला आणि छायाचित्रण स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे. तसंच आगंतुकांसाठी खास सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. तिथे नागरिक या सोहळ्याच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करू शकतात.बांद्रा रेल्वे स्टेशन हे मुंबईतील सर्वात सुंदर उपनगरीय स्टेशनांपैकी एक आहे. १९ व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य शैली आणि आकर्षक छतांच्या रचनेमुळे त्याला ग्रेड-१ हेरिटेज वास्तूचा दर्जा मिळाला आहे. या महोत्सवातून स्टेशनचं ऐतिहासिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं आणि रेल्वेच्या वारशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण करणं, हा पश्चिम रेल्वेचा उद्देश आहे.हा महोत्सव २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, नागरिक, रेल्वेप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावं, असं आवाहन पश्चिम रेल्वेने केलं आहे.

Comments
Add Comment

Central Railway Block : पनवेल - कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; काही एक्स्प्रेस गाड्या उशिरा धावणार

पनवेल येथे सुरू असलेल्या कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेने २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान

Sunday Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : मुंबईकरांनो, रविवारी (29 नोव्हेंबर) लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर रेल्वेचे वेळापत्रक आधी तपासा.

Western Railway : पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री चार तासांचा जम्बो ब्लॉक; सांताक्रूझ-माहीमदरम्यान फास्ट लोकल धीम्या मार्गावर

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुंबईत 'आदर्श दुय्यम निबंधक' कार्यालय

मुंबई : पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेले पहिले आदर्श सह दुय्यम

Devendra Fadnavis: वसई-विरार, कर्जतला गेलेल्या गिरणी कामगारांना पुन्हा मुंबईत आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई : पूर्वीच्या धोरणांमुळे दक्षिण मुंबईतून वसई, विरार आणि कर्जतपर्यंत स्थलांतरित व्हावे लागलेल्या गिरणी

बँकेमध्ये नोकरीची संधी, अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेमध्ये वाढ; 837 पदांसाठी केली जातेय नोकरभरती

मुंबई: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. वेल्थ मॅनेजमेंट पदासाठी 'बँक ऑफ