मुंबई: केंद्र सरकारने महिलांच्या हितासाठी आणलेल्या डिलिमिटेशन विधेयकावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या विधेयकावर टीका करणाऱ्या विरोधकांवर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी जोरदार निशाणा साधला आहे. "संजय राऊत यांना या विधेयकाचे काहीही देणेघेणे नाही. उबाठा गटाच्या सध्याच्या संख्याबळावर त्यांना पुन्हा खासदारकी मिळणार नसल्याने, केवळ आपली संपत आलेली खासदारकी वाचवण्यासाठीच ते ही टीका करत आहेत," असा थेट आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना खूश करण्यासाठीच संजय राऊत सातत्याने टीका करत आहेत.
विजय वडेट्टीवारांवरही टीकास्त्र
यावेळी नरेश म्हस्के यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका केली. "विजय वडेट्टीवार यांच्याशी या विषयावर काय बोलायचे? त्यांना यावर बोलण्याचा अधिकार आहे का? जे स्वतः इतके पक्ष बदलून आले आहेत, त्यांच्याबाबत जनतेनेच ओळखावे," अशा शब्दांत म्हस्के यांनी वडेट्टीवार यांना टोला लगावला.
लखनऊमध्ये 1 ते 10 डिसेंबरदरम्यान भव्य 'यूपी कोऑपरेटिव्ह एक्स्पो- 2026' चे आयोजन
उत्तर प्रदेशचे सहकार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जे.पी.एस. राठौर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी राजधानी लखनऊमध्ये आगामी 'यूपी कोऑपरेटिव्ह ...
विधेयकाला पाठिंबा आणि व्हिप जारी
डिलिमिटेशन विधेयकाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना म्हस्के यांनी सांगितले की, "केंद्र सरकारने महिलांच्या हितासाठी हे अत्यंत महत्त्वाचे विधेयक आणले आहे. शिवसेना पूर्वीपासूनच एनडीएचा (NDA) भाग राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आम्ही या विधेयकाला पूर्ण पाठिंबा देत आहोत. यासंदर्भात पक्षाकडून सर्व खासदारांना व्हिप देखील जारी करण्यात आला आहे." दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेही या विधेयकाला आपला पाठिंबा दर्शवला असून, त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असेही नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.