Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

जर्मनीतील गेल्सेनकिर्चेन येथील एका 31 वर्षीय महिलेसोबत नेमके हेच घडले. केवळ नाराज असताना मुलांच्या खेळाच्या मैदानातील बाकावर बसल्यामुळे तिला 25 युरो म्हणजे सुमारे 27 डॉलर, किंवा अंदाजे 2,300 रुपये दंड भरावा लागला.

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते. अशावेळी आपण बागेत फिरायला जातो किंवा विचार करण्यासाठी शांत ठिकाणी बसतो. विचार करता करता मनसोक्त रडण्याचा प्रयत्न करणे, हे जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी केले असेल. पण हेच करताना तुम्हाला कधी कुठल्या अधिकाऱ्याने दंड आकारला तर? असाच एक धक्कादायक प्रकार जर्मनीमध्ये घडला आहे.

जर्मनीतील गेल्सेनकिर्चेन येथील एका 31 वर्षीय महिलेसोबत नेमके हेच घडले. केवळ नाराज असताना मुलांच्या खेळाच्या मैदानातील बाकावर बसल्यामुळे तिला 25 युरो म्हणजे सुमारे 27 डॉलर, किंवा अंदाजे 2,300 रुपये दंड भरावा लागला. या वृत्तामुळे अनेक स्थानिक नागरिक नाराज झाले असून, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपली सारासार बुद्धी कार्यालयातच सोडली होती का, असा जोरदार सवाल उपस्थित केला आहे.


हाना नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महिलेने जर्मन वृत्तपत्र बिल्डला सांगितले की, तिला तिच्या मावशीशी फोन आला होता, तिच्याशी बोलत असताना ती एका बाकावर बसली होती. वैयक्तिक तणावामुळे ती स्वतःला सावरू शकली नाही आणि तेथे रडू लागली. परंतु तिला एकांत मिळण्याऐवजी, अचानक तिच्यासमोर पालिकेचे तीन सार्वजनिक सुव्यवस्था अधिकारी उभे दिसले. त्या अधिकाऱ्यांनी तिला विचारले की समोर खेळत असलेल्या मुलांपैकी कोणी तिचे आहे का? जेव्हा तिने नाही असे सांगितले, तेव्हा त्यांनी तिला सांगितले की मुलांशिवाय प्रौढांना या परिसरात प्रवेश करण्याची परवानगी नाही आणि तात्काळ तिच्या हातात 25 युरो दंडाची पावती दिली. या घटनेमुळे जगभरात याची चर्चा होत आहे.






ती महिला वैयक्तिक आणि आर्थिक समस्यांशी झगडत होती. त्यात तिला 25 युरो, म्हणजेच सुमारे 2300 रुपयांचा दंड ठोठावला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या महिलेला रडल्याबद्दल किंवा फोनवर बोलल्याबद्दल नव्हे, तर मुलांच्या खेळण्याच्या जागेत एकही मूल नसताना बसल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला. ही घटना जर्मनीतील गेल्सेनकिर्चेन येथील ग्लुकॉफपार्कमध्ये घडली. सदर महिला रसायनशास्त्राचा अभ्यास करत होती आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातही कठीण काळातून जात होती. त्यामुळे, तिने काही वेळ एकटे राहून आराम करण्याचे ठरवले.


हानाच्या म्हणण्यानुसार, तिला त्या क्षणी एकटे राहायचे होते. तिला रडताना कोणीही पाहू नये असे तिला वाटत होते. पण मग, शहराचे तीन अधिकारी तिथे आले जे शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था आणि स्थानिक नियमांवर देखरेख ठेवतात. त्यांनी हानाला विचारले की जवळच झोके घेत असलेली दोन मुले तिची आहेत का? हानाने उत्तर दिले की नाही. त्यावर अधिकाऱ्यांनी तिच्याकडे ओळखपत्र मागितले आणि तिला सांगितले की, मुलांच्या खेळाच्या मैदानात एकही मूल नसताना उपस्थित राहून ती नियमांचे उल्लंघन करत आहे. त्यानंतर तिला 25 युरोचा दंड ठोठावण्यात आला.



कोणत्या नियमांतर्गत दंड आकारण्यात आला?


जर्मनीतील गेल्सेनकिर्चेन शहरात, स्थानिक प्रशासनाने मुलांच्या खेळाच्या मैदानांसंदर्भात एक नियम बनवला आहे. ज्यात 14 वर्षांपर्यंतची मुले पालक, पालकत्व स्वीकारलेली व्यक्ती किंवा काळजीवाहकासोबत खेळाच्या मैदानात प्रवेश करू शकतात. परंतु, मुलाशिवाय आलेल्या प्रौढ व्यक्तीला खेळाच्या मैदानात थांबण्याची परवानगी नाही. हा नियम केवळ झोपाळे किंवा इतर खेळण्याच्या साधनांचा वापर करण्यापुरताच नाही, तर बाकांवर बसण्यालाही लागू होतो. याचा अर्थ असा की, जरी एखादी व्यक्ती मुलांसोबत नसली आणि केवळ आराम करण्यासाठी खेळाच्या मैदानातील बाकावर बसली, तरीही तिच्यावर कारवाई होऊ शकते. हानाला याच नियमांतर्गत दंड आकारण्यात आला आहे.


हानाने या कृतीबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे. तिचे म्हणणे आहे की, ती आधीच खूप अस्वस्थ आहे आणि त्यावेळी तिला सहानुभूतीची गरज होती. जेव्हा अधिकाऱ्यांनी तिला रडताना पाहिले, तेव्हा त्यांनी किमान एकदा तरी विचारायला हवे होते की, तिची तब्येत ठीक आहे का किंवा तिला काही मदतीची गरज आहे का? किंवा अधिकाऱ्यांनी तिला नियम समजावून सांगून दुसरीकडे बसायला सांगायला हवे होते. जर त्यांनी तसे केले असते, तर ती सहजपणे तिथून निघून गेली असती. पण तिची परिस्थिती न समजता त्यांनी थेट दंड आकारल्यामुळे तिला खूप वाईट वाटले. त्यावेळी तिला एक माणूस म्हणून स्वतःची काहीच किंमत नाही असे वाटले. मुलांच्या खेळाच्या मैदानांसाठी नियम असावेत पण त्यांची अंमलबजावणी करताना त्यात थोडी माणुसकी असायला हवी. पुढील प्रशासकीय कारवाई किंवा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी तिने दंड भरला.


दरम्यान, शहर प्रशासनाने या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या कृतीचे समर्थन केले आहे . प्रवक्ते मार्टिन शुलमन यांनी 25 युरोचा दंड वाजवी आणि तुलनेने किरकोळ असून तो प्रस्थापित नियमांच्या चौकटीत असल्याचे म्हटले आहे. तसेच शहराच्या नियमांची अंमलबजावणी करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या मते, या प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीत अधिकाऱ्यांकडून कोणतेही अयोग्य वर्तन झाल्याचे दिसून आलेले नाही. परंतु, या कारवाईबाबत स्थानिक रहिवासी आणि राजकारण्यांची वेगवेगळी मते आहेत.

Comments
Add Comment

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.

AI तंत्रज्ञानावर अमेरिकेचे निर्बंध कडक; एन्व्हिडियाकडून 4 देशांना सर्व्हर पुरवठा रोखला

अमेरिकन चिप निर्माती कंपनी एन्व्हिडियाने मलेशिया, सिंगापूर, थायलंड आणि इंडोनेशियासह आग्नेय आशियातील चार

Nvidia server supply halt Southeast Asia : दक्षिण-पूर्व आशियातील ४ देशांत 'एनव्हिडिया'कडून सर्व्हर पुरवठ्याला ब्रेक; जेनसन हुआंग पुन्हा CEO पदी परतताच...AI क्षेत्रात खळबळ

प्रसिद्ध अमेरिकी चिप उत्पादक कंपनी 'एनव्हिडिया'ने (Nvidia) दक्षिण-पूर्व आशियातील चार देशांना होणारा सर्व्हर पुरवठा