Women Reservation : 2029 च्या निवडणुकीपासून महिला आरक्षण लागू होणार ? केंद्र सरकारची तयारी ; पंतप्रधान मोदी म्हणाले, महिलांना दिलेला शब्द पूर्ण करणार

नवी दिल्ली : देशातील महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून महिला आरक्षण लागू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावांनुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधील जागांची संख्या वाढवण्याची तरतूद केली जाणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिला आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करत महिलांना दिलेला शब्द पूर्ण करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट शेअर करत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. देशातील प्रत्येक महिलेला आश्वस्त करताना त्यांनी सांगितले की, महिला आरक्षण लागू करण्याच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना महिलांचा राजकीय सहभाग वाढवण्यापासून रोखता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


महिला आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक दशकांपासून चर्चेत आहे. संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न होत आले आहेत. आपणही या प्रयत्नांचा दीर्घकाळापासून एक भाग असल्याचे मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. अनेक महिलांनी भेटीदरम्यान हा विषय आपल्यासमोर मांडला असून, अनेक भगिनींनी पत्रांच्या माध्यमातून महिला आरक्षणाबाबतच्या अपेक्षा आणि भावना व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.





महिला आरक्षणासाठी केंद्र सरकारची तयारी काय ?


महिला आरक्षणाची अंमलबजावणी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना आणि लोकसभा तसेच विधानसभांमधील जागांची संख्या वाढवण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२३ मध्ये संसदेने 'नारी शक्ती वंदन अधिनियम' मंजूर केला होता. या कायद्यानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.


मात्र, या आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी मतदारसंघ पुनर्रचना आणि संबंधित घटनात्मक प्रक्रियेशी जोडलेली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या नव्या हालचालींनंतर महिला आरक्षण प्रत्यक्षात कधी लागू होणार आणि २०२९ च्या निवडणुकीत महिलांना किती प्रतिनिधित्व मिळणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Bank Holiday December 2026 : डिसेंबरमध्ये बँका किती दिवस राहणार बंद ? RBI ची सुट्ट्यांची यादी जाहीर

Bank Holiday December 2026 : जर तुम्ही डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी

Indian Railways News: ट्रेनचे जुने डबे आता भंगारात नाही, तर रेस्टॉरंटमध्ये! रेल्वेची कमाईची अनोखी शक्कल

भारतीय रेल्वे ही केवळ प्रवासाचे साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो प्रवासी

Swiggy Instamart: स्विगीच्या इन्स्टामार्टमध्ये मोठी पुनर्रचना, 340 कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या क्विक कॉमर्स विभाग इन्स्टामार्टमध्ये मोठी कपात करण्याचा

Ducati DesertX V2 भारतात लॉन्च ; दमदार 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स

Ducati DesertX V2 : भारतीय प्रीमियम बाईक बाजारात Ducati ने आपली नवी अ‍ॅडव्हेंचर बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने दुसऱ्या जनरेशनची Ducati

दक्षिणेत पावसाचा तडाखा, उत्तरेत दाट धुक्याचा कहर! हवामान विभागाचा खळबळजनक इशारा; 50 किमी ताशी वेगाने वारे वाहणार

नवी दिल्ली : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत असून, भारतीय हवामान विभागाने 27 नोव्हेंबर

पश्चिम बंगालमधील सर्व शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी; 2 जानेवारीपासून अंमलबजावणी

पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक