Delimitation Bill : डिलिमिटेशनला शरद पवार, एम. के. स्टॅलिन यांचाही पाठिंबा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वागत

या विधेयकांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे, असे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.

Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण ही विधेयके देशाच्या विकासासाठी तसेच लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाची आहेत. या विधेयकांच्या समर्थनार्थ शरद पवार आणि एम. के. स्टॅलिन यांच्यासारख्या नेत्यांनीही भूमिका मांडली आहे. या विधेयकांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे, असे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.






मतदारसंघ पुनर्रचनेला शिवसेनेचा पाठिंबा


लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या 22 ते 26 लाखांपर्यंत पोहोचली असून, काही मतदारसंघांची लांबी 100 किलोमीटरपेक्षाही अधिक आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंख्येला न्याय देण्यासाठी आणि विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक असल्याचे शिंदे म्हणाले. ( Women Reservation)


डिलिमिटेशन विधेयकाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत, पक्षाचे सर्व खासदार या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



महिला आरक्षणामुळे महिलांना राजकारणात अधिक संधी


महिला आरक्षण विधेयकामुळे लोकसभा आणि विधानसभा स्तरावर महिलांना लोकसेवेची अधिक संधी उपलब्ध होईल. राजकीय क्षेत्रात महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वाचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळत असल्याचे सांगत, महिला आरक्षणामुळे राजकारणात महिलांचा सहभाग वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



दोन्ही विधेयकांना समर्थन देणाऱ्यांचे स्वागत


देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असून भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचे शिंदे म्हणाले. विकासाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिक प्रभावी असणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना महत्त्वाची असल्याची भूमिका त्यांनी मांडली.


30 तारखेला ही दोन्ही विधेयके मंजूर झाल्यास देशाच्या इतिहासातील तो महत्त्वाचा टप्पा ठरेल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.



Comments
Add Comment

Nashik Police Transfer : नाशिक पोलिस दलात मोठे फेरबदल ! आठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

Nashik Police Transfer : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाज अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने आठ पोलिस

BMC : घाटकोपर, मानखुर्द चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अनधिकृत व्यवसाय आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. या

मुंबईत ५१ दिवसांमध्ये १६,१५३ बॅनरांची फाडाफाडी

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनरबाजांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असून

'काशी तमिळ संगमम ५.०'ला सुरुवात, २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना

चेन्नई : तमिळनाडू आणि काशी यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या

WhatsApp Update: व्हॉट्सॲपवर आता मेसेज होणार ऑटोमॅटिक! पण शेड्यूल करण्याआधी जाणून घ्या 5 गोष्टी

आता WhatsApp वापरकर्त्यांना मेसेज पाठवण्यासाठी सतत वेळ पाहण्याची गरज भासणार नाही. कारण WhatsApp ने बहुप्रतीक्षित Scheduled Messages

Telangana Crime : पतीसोबत वाद झाला अन् संतापाच्या भरात आईने थेट तीन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत फेकलं पुढे...

Telangana Crime : तेलंगणामधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्या वादानंतर एका महिलेने आपल्या तीन