Home देश अमेरिका पाकला एफ-१६ विमाने विकणार, भारताचा आक्षेप

अमेरिका पाकला एफ-१६ विमाने विकणार, भारताचा आक्षेप

2

अमेरिकेच्या संसदेतील अनेक सदस्यांनी विरोध करूनही अमेरिकेने पाकिस्तानला आठ एफ- १६ लढाऊ विमान विकण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.

नवी दिल्ली- अमेरिकेच्या संसदेतील अनेक सदस्यांनी विरोध करूनही अमेरिकेने पाकिस्तानला आठ एफ- १६ लढाऊ विमान विकण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. ओबामा प्रशासनाने पाकिस्तानला ७०० दशलक्ष डॉलर्स किमतीची आठ एफ – १६ लढाऊ विमान विकण्याच्या या निर्णयावर भारताने आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूताला बोलावून ही नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानला एफ – १६ जातीची आठ लढाऊ जेट विमाने देण्याच्या कराराला अमेरिकेने शुक्रवारी संमती दिली. पाकिस्तानला ही विमाने, त्यासाठी लागणारी अन्य उपकरणे, प्रशिक्षण आणि दळणवळण यंत्रणा या बाबी पुरवण्यात येणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

पेंटागॉनच्या संबंधित विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला असून हा निर्णय अमेरिकेच्या पराराष्ट्र धोरणाला अनुसरून असल्याचे म्हटले आहे. तसेच या विमानांमुळे पाकिस्तानच्या हवाई दलाची क्षमता वाढेल आणि देशातील दहशतवादाला आळा घालण्यास मदत होईल, असा दावाही पेंटागॉनने केला आहे.

कोणत्याही हवामानात शत्रुवर हल्ला करण्याची क्षमता या लढाऊ विमानात आहे. दक्षिण आशियामधला पाकिस्तान हा अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार असून त्याची सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या विक्रीमुळे या प्रांतातील लष्करी संतुलन ढळणार नाही, अशी पृष्टीही अमेरिकेने जोडली आहे.

अमेरिकेतील सत्ताधारी व विरोधकांमधील काही प्रभावशाली खासदारांनी पाकिस्तानशी हा करार करू नये, यासाठी विरोध दर्शवला होता. अनेकवेळा सांगितल्यानंतरही पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कसारख्या दहशतवादी संघटनांवर ठोस कारवाई केली नसल्याने त्यांना विमाने देऊ नयेत, असे काही खासदारांचे म्हणणे होते.

तसेच, पाकिस्तान सरकारमधील काही अधिका-यांच्या मदतीने दहशतवादी मुक्तपणे पाकिस्तानात फिरत असतात, असेही त्यांनी सरकारला कळविले होते. मात्र, अमेरिका सरकारने पाकिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, भारताने या व्यवहारास विरोध केला असून आपली नाराजी अमेरिकेला कळवली आहे. तसेच अमेरिकेचे राजदूत यांना समन्सही पाठविण्यात आले आहे.

2 COMMENTS

  1. 8 एफ-१६ विमाने पाकिस्तानला दिल्या बद्दल अमेरिकेचे आभार मानायला पाहिजे. कारण कपडे काढून नाचणार्यांना कपडे घाल सांगणे मुर्ख पनाचे लक्षण आहे. त्याच्या नाचाची स्तुती करणे शहाणपणाचे लक्षण आहे.

  2. ओबामा लबाड आहे.. तो बोलतो एक आणि करतो एक.. ओसामा आणि ओबामा एका नाण्याची दोन बाजू आहेत.

Leave a Reply to RAJESH Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version