Home देश गरजेपेक्षा जास्तीचा पैसा समाजकार्यासाठी वापरा

गरजेपेक्षा जास्तीचा पैसा समाजकार्यासाठी वापरा

1

माणसाच्या गरजेपेक्षा अधिक पैसा असणे हा शाप आहे. असा जास्त पैसा सामाजिक आणि विधायक कार्यासाठी वापरला तर त्याच्यासारखे अन्य समाधान दुसरे असूच शकत नाही, असे प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक आणि इन्फोसिसच्या अध्यक्ष डॉ. सुधा मूर्ती यांनी पणजीत एका कार्यक्रमात बोलताना केले.

पणजी- माणसाच्या गरजेपेक्षा अधिक पैसा असणे हा शाप आहे. असा जास्त पैसा सामाजिक आणि विधायक कार्यासाठी वापरला तर त्याच्यासारखे अन्य समाधान दुसरे असूच शकत नाही, असे प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक आणि इन्फोसिसच्या अध्यक्ष डॉ. सुधा मूर्ती यांनी पणजीत एका कार्यक्रमात बोलताना केले. दानशूर हात आणि मृदू हृदय हीच माणसाची सर्वात मोठी श्रीमंती असल्याचेही त्या म्हणाल्या.

गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याने आयोजित केलेल्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात पहिले व्याख्यान पुष्प गुंफताना डॉ. मूर्ती बोलत होत्या. रक्षामंत्री मनोहर र्पीकर यांनी या पाच दिवसांच्या विचार महोत्सवाचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कला आणि संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर, विधानसभेचे उपसभापती आणि कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू सुर्या वाघ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

आपल्या खुमासदार, मिश्किल तसेच प्रगल्भ आणि साध्या भाषेत केलेल्या व्याख्यानात डॉ. मूर्ती यांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली. इंजिनियिरगचे शिक्षण घेण्यासाठी आपण इच्छा व्यक्त केली तेव्हा आपले मनोधर्य खच्ची करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. महाविद्यालयात आपण एकटीच मुलगी असल्याने स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था नव्हती. केवळ त्याचसाठी मैलभर पायपीट करावी लागत होती, याची आठवण त्यांनी करून दिली.

प्रतिकूल परिस्थिती असतानाही मागे हटले नाही म्हणूनच आजचा दिवस आपण पाहात असल्याचे त्या म्हणाल्या. महाविद्यालयातील अनुभवांमुळेच इन्फोसिस फाउंडेनशनच्या माध्यमातून देशभरात तेरा हजार महिला प्रसाधनगृहे उभारण्यात आल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. देशातल्या सर्वाधिक श्रीमंत माणसाची पत्नी म्हणून मिरवत असतानाही साधी राहणी आपण सोडलेली नाही, असे त्यांनी सांगितले. देवदासींच्या पुनर्वसनासाठी काम करतानाचे अनुभव अंगावर शहारे आणणारे होते, असे सांगून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जाताना आपल्याला त्यांच्या पेहरावासारखाच पेहराव करावा लागला होता, याचे स्मरणही त्यांनी करून दिले. पैसा हा कोणाचीच शक्ती होऊ शकत नाही. खरी शक्ती ही प्रत्येकाच्या अंतर्यामात असलेला आत्मविश्वासच असतो, असेही त्यांनी नमूद केले.

1 COMMENT

Leave a Reply to Pandudada, Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version