Home देश धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती धोक्यात

धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती धोक्यात

2

ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता, त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या ‘चले जाव’ चळवळीलाही विरोध केला होता, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून हल्ला केला.

नवी दिल्ली- देशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता, त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या ‘चले जाव’ चळवळीलाही विरोध केला होता, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून हल्ला केला. त्या लोकसभेत बोलत होत्या.

स्वातंत्र चळवळीतील महत्त्वाचा भाग असणा-या ‘चले जाव’ चळवळीला बुधवारी ७५ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त लोकसभेत विशेष सत्राचे आयोजन केले होते.

सोनिया म्हणाल्या, सध्या देशात द्वेषाचे आणि बदल्याचे राजकारण केले जात आहे. यामध्ये खुला संवाद आणि चर्चेला स्थान नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यामुळे आज धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती धोक्यात आली आहे. यालाच विभाजनाचे राजकारण म्हणतात.

आपल्याला आपले स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर आपल्याला अशा विरोधी शक्तींचा मुकाबला करायला हवा. स्वातंत्र्य चळवळीतील माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इतर काँग्रेस नेत्यांविषयी बोलताना सोनिया म्हणाल्या की, स्वातंत्र्य चळवळीदरम्यान पंडित नेहरूंनी जीवनातील बरीच वर्षे तुरुंगात घालवली. इंग्रजांनी भारतातून निघून जावे यासाठी सुरू झालेल्या ‘चले जाव’ चळवळीदरम्यान, आंदोलकांवर अनेक अत्याचार झाले. मात्र तरीही ते मागे हटले नाहीत.

दुस-या महायुद्धावेळी ८ ऑगस्ट १९४२ रोजी हे आंदेलन सुरू झाले होते. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी हे आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर गांधीजींच्या आवाहनानुसार देशभरात आंदोलने झाली.

2 COMMENTS

  1. इतिहास नीट वाचा अगोदर , आणि हो भारताचं वाचा … नाहीतर चुकून इटली चा वाचतात.

    Read before u talk :
    Mahatma Gandhi’s visit to an RSS camp in Wardha in 1930.
    Dr.Hedgewar, the freedom fighter , founder of RSS was a pre-RSS Congressman .

  2. When I visited the RSS camp, I was very much impressed by your discipline and the complete absence of untouchability.
    – Mahatma Gandhi at the RSS rally, Delhi 16.9.1947

    In the Congress those who are in power feel that by virtue of authority they will be able to crush the R.S.S. By “danda” you cannot suppress an organization. Moreover “danda” is meant for thieves and “dakus”. Using of “danda” will not help much. After all, R.S.S. men are not thieves and dacoits. They are patriots. They love their country.
    – Sardar Vallabhbhai Patel in a public meeting, Lucknow 6.1.1948

    I am surprised to find the Swayamsevaks moving about in absolute equality and brotherhood without even caring to know the caste of the others.
    – Babasaheb Ambedkar at Pune Camp, May 1939

    The allegations against RSS of violence and hatred against Muslims are wholly false. Muslims should learn the lesson of mutual love, co-operation and organization from RSS.
    – Dr. Zakir Hussain

    Yours is a revolutionary organization in the forefront of social transformation taking place today. You alone have the capacity to end casteism and wipe the tears from the eyes of the poor.
    – Jayaprakash Narayan at RSS public function, Patna 3.11.1977

    The name of RSS is a household word for selfless service all over the country.
    – Koka Subba Rao, Rtd. Chief Justice of Bharat, 25.8.1968

    RSS has played an honourable role in maintaining Hindu-Sikh unity before and after the murder of Indira Gandhi in Punjab, Delhi and other places.
    – Sardar Khushwant Singh in Sunday Column .

Leave a Reply to Kunal Someshwar Kamble Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version