Home देश नीरा राडीया टेप, सीबीआय चौकशीचे आदेश

नीरा राडीया टेप, सीबीआय चौकशीचे आदेश

1

नीरा राडीयाच्या टेपमधील संभाषणाच्या विश्लेषणातून सहा मुद्दे उपस्थित झाले असून, या सहा मुद्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

नवी दिल्ली – कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडीयाच्या टेपमधील संभाषणाच्या विश्लेषणातून सहा मुद्दे उपस्थित झाले असून, या सहा मुद्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

या टेपमधील संभाषणातून वयैक्तीक फायद्यासाठी खासगी उद्योगांनी सरकारी अधिका-यांच्या साथीने मिळून भ्रष्टाचाराची योजना आखल्याचे प्रतीत होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एस.सिंघवी यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. न्यायालायने सीबीआयला दोन महिन्यांच्या आत १६ डिसेंबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

राडीयाच्या टेप संभाषणामध्ये काही प्रमाणात गुन्हेगारीचा भाग असल्याची माहिती सीबीआयने ३१ जुलैला सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. या टेपमध्ये राडीयाच्या अनेक उद्योगपीत, पत्रकारांबरोबरच्या संभाषणाची रेकॉर्डींग आहे.

1 COMMENT

Leave a Reply to yashwant Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version