Home देश बिन्नी मूर्खपणा करताहेत- केजरीवाल

बिन्नी मूर्खपणा करताहेत- केजरीवाल

4

मर्जीनुसार न वागल्याने बिन्नी आप सरकार आणि पक्षाच्या धेय्यधोरणांवर बेताल वक्तव्य करत असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नवी दिल्ली- दिल्लीत निवडून आलेला आम आदमी पक्षाचा कोणताही आमदार लोकसभेची निवडणूक लढणार नाही, असे ‘आप’चे प्रमूख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सांगितले. तसेच आमदार विनोद कुमार बिन्नी हे मूर्खपणा करत आहेत. त्यांच्या मर्जीनुसार न वागल्याने बिन्नी आप सरकार आणि पक्षाच्या धेय्यधोरणांवर बेताल वक्तव्य करत असल्याचे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बिन्नी यांनी मंत्रीपदासाठी माझ्याकडे आग्रह केला होता. मात्र त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. तसेच बिन्नी यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र पक्षाने निवडून आलेल्या कोणीही आमदाराने लोकसभेची निवडणूक लढवू नये असा ठराव केला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा स्पष्ट नकार दिल्याने बिन्नी बिथरल्याचे केजरीवाल यांनी पत्रकारांना सांगितले.

‘आप’ला जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडू लागला आहे. ‘आप’ची ज्या मुद्यावर स्थापना झाली होती त्यापासून ‘आप’ दूर जात असल्याचा आरोप बिन्नी यांनी केला आहे.

दरम्यान, बिन्नी यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सुत्रांकडून समजते.

4 COMMENTS

  1. This is a very remarkable and admirable initiative which will go a long way in increasing the use of Mai Marathi on the web. This will enable more and more people to express themselves on the web.

    We teach translation skill through distance education and see that font problem is a key issue. Prahhar has solved it very ably.

    Hats off to Prahhar!

    Regards,
    Prakash Almeida IIM-A
    Founder-Director
    KnowledgeFountain
    http://www.knowledgefountain.org

Leave a Reply to sandip Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version