मनातलं

11

महिलांच्या मनातले प्रश्न, त्यांच्या समस्या मांडण्याचं हक्काचं व्यासपीठ. यात तुम्ही तुमच्या मनातलं दु:ख, आनंद काहीही आमच्याशी शेअर करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला येत असलेल्या पाककृती, कलाकृती आमच्याकडे लिहून पाठवू शकता. तुम्हाला आलेले काही भन्नाट अनुभव, भन्नाट कल्पना आम्हाला पाठवू शकता. सांगू शकता तुम्हाला सलणारं काही, तुम्हाला भावणार काही. प्रहार स्त्री प्रेरणाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत हेही आम्हाला मोकळेपणी सांगा.
तुमच्या मनातलं काही आम्हाला लिहून पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे… ईमेल –  striprerana@prahaar.co.in

याबद्दल महिलांना आपली मते, अनुभव, भन्नाट कल्पना आम्हाला पुढील पत्त्यावरही पाठवता येतील.

शब्दमर्यादा : १५० ते २०० शब्द. पाकिटावर ‘स्त्री प्रेरणासाठी’ असा आवर्जून उल्लेख करावा.

पत्र पाठवण्यासाठी पत्ता…

‘स्त्री प्रेरणासाठी’

प्रहार कार्यालय,

वन इंडियाबुल्स सेंटर, नववा मजला,

ज्युपिटर मिल्स कंपाउंड, लोअर परळ, मुंबई – ४०००१३,

फॅक्स : ०२२-६१२३९९००. ०२२- ६१२३९९६६

तुमच्या मनातलं’ ऑनलाइन

ऑनलाइन पत्र लिहा… आपली मते तुम्ही striprerana@prahaar.co.in या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.

तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता. त्यासाठी लॉग इन करा  www.prahaar.in

11 COMMENTS

  1. प्रहार स्त्री प्रेरणा खूप चांगला उपक्रम आहे, असाच जोरात सुरु राहू दे त्यासाठी शुभेछा.

  2. महिलांच्या मनातले प्रश्न, त्यांच्या समस्या मांडण्याचं हक्काचं व्यासपीठ पाहिजे जे आहे प्रहार स्त्री प्रेरणा. आमचा भागातही सुरु करण्यासाठी मी पुढाकार घेईन.

  3. प्रहार स्त्री प्रेरणा या माध्यमातून मला मी तयार केलेली कविता द्यायला आवडेल. हि कविता मी माझा मैत्रिणीला समर्पित करत आहे.
    सुखात आपल्याला सामावून घेते
    दूखात मदतीला विसरत नाहीत
    चार शब्द ऐकवायला कचरत नाही
    शिकवते आयुष जगायला
    शिकवते शहाण्यासारखे वागायला
    प्रेम करते, रागावते सुद्धा
    खूप बोलते न बोलता सुद्धा
    कितीही चुकले तरी समजून घेते
    यावरून एकच म्हणेन काही नाती अनमोल असतात
    माझा आयुष्यात तुझी मैत्री अशीच राहू दे.

  4. तुम्ही दिलेल्या या प्रतीक्रीयाबद्दल धन्यवाद रोहिणीताई आणि रागिणीताई

    तुप्ती राणे
    स्त्री प्रेरणा
    समन्वयक

  5. वरदाताई खूप छान कविता आहे. तुमची मैत्रीणहि नक्कीच छान असणार. त्यानाही प्रेरनामध्ये सहभागी व्हायला सांगा.

    तुप्ती राणे
    स्त्री प्रेरणा
    समन्वयक

  6. खूप सुंदर उपक्रम आहे. हा असाच सुरु राहावा ही सदिच्छा. स्त्री प्रेरणेने विविध कार्यक्रम घेऊन महिलांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून त्याचा गरजू महिलांना उपयोग होईल. स्त्री प्रेरणेला मनापासून खूप खूप शुभेच्छा.

  7. प्रहार वृत्तपत्राने प्रहार स्त्री प्रेरणेच्या माध्यमातून महिलांसाठी खूप चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महिलांच्या विविध समस्या, त्यांच्या मनातले प्रश्न, समाजात वावरताना आलेले बरे-वाईट अनुभव हे सगळ सांगायला, मांडायला या मंचाचा खूप उपयोग होईल. आपल्याला आलेल्या अनुभवाचा इतरांना त्यांच्या कामासाठी उपयोग झाला तर त्याचा आपल्याला आनंदच होईल. मलासुद्धा इतरांचे असे अनुभव वाचायला आवडतील. जास्तीत जास्त महिलांनी या संस्थेत सहभागी होऊन या मंचाचा उपयोग करून घ्यावा. प्रहार स्त्री प्रेरणेच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा.

  8. धन्यवाद प्राची ताई,
    आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण म्हटल्याप्रमाणे आमचाही असाच प्रयत्न आहे की, अधिकाधीक महिला व मुलींपर्यंत पोहचावं. या माध्यमाद्वारे महिलांचा सर्वागीण विकास व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे.
    आपली.
    तृप्ती राणे
    समन्वयक, स्त्री प्रेरणा

  9. आनंदीबाई जोशी यांच्यावरील तुमचा लेख वाचला. खूप सुंदर माहिती तुम्ही दिली आहे. ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे कठीण होते त्याकाळात त्या आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर MD झाल्या. आनंदीबाईंनी स्त्रियांसाठी खूप मोठा आदर्श घालून दिला आहे. लहान वयात त्यांना झालेले मुल अवघ्या काही दिवसात दगावले म्हणून त्यांनी स्वतः डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला व तो तडीस नेला. या व अशा अनेक स्त्रिया ज्यांनी महिलांसाठी वेगवेगल्या क्षेत्रात आदर्श निर्माण केले आहेत त्यांच्याबद्दलची माहिती तुम्ही तुमच्या या पानावर लिहित राहावी. जेणेकरून अनेक विविध महिलांना त्यातून प्रोत्साहन मिळेल. काहीतरी करून दाखवण्याची उमेद त्यांच्यात जागृत होईल. स्त्री प्रेरणेची वाटचाल अत्यंत योग्य दिशेने होत आहे असे मला वाटते. हळू हळू तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र विस्तीर्ण करून आपल्या कामाची व्याप्ती वाढवत न्याल अशी मी अशा करते. तुम्हाला तुमच्या कामासाठी शुभेच्छा. असेच काम तुम्ही यापुढेही सुरु ठेवावे.

    • धन्यवाद स्नेहा,
      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. नक्कीच यापुढेही आमचा असाच प्रयत्न राहील. पण आपणही आपल्या मनातले विचार या व्यासपीठाच्या माध्यमातून मांडावेत अशी आपल्या विनंती आहे. आपला एखादा अनुभव, कल्पना आम्हाला सांगाव्यात अशी अपेक्षा आहे.
      – तृप्ती राणे
      समन्वयक, प्रहार स्त्री प्रेरणा

Leave a Reply to Trupti Rane Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version