Home टॉप स्टोरी महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी ‘ई लॉकर’ची सुविधा

महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी ‘ई लॉकर’ची सुविधा

47

ब-याचदा नोकरी अथवा अन्य कोणत्याही कामांसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे प्रवासादरम्यान बाळगणे जोखमीचे काम असते. कधी कधी ही कागदपत्रे गहाळ होण्याचीही भिती असते. यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने आधार कार्डशी संबंधित ‘ई लॉकर’ची सुविधा सुरु केली आहे.

मुंबई – ब-याचदा नोकरी अथवा अन्य कोणत्याही सरकारी कामांसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे प्रवासादरम्यान बाळगणे जोखमीचे काम असते. कधी कधी ही कागदपत्रे गहाळ होण्याचीही भिती असते. यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने आधारकार्डशी संबंधित नवीन ‘ई लॉकर’ची सुविधा सुरु केली आहे. या नव्या सुविधेमुळे तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे ‘ई लॉकर’मध्ये सुरक्षित ठेवू शकता.

ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी elocker.maharashtra.gov.in या वेबसाईटद्वारे तुम्ही ‘ई लॉकर’ला लॉग इन करु शकता. लॉग इन करण्यासाठी तुमचा आधार नंबर गरजेचा आहे. यामध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करु शकता आणि जेव्हा गरज पडेल त्यावेळी त्यांचा उपयोग करु शकता, अशी माहिती सचिव स्तरावरील आयटी विभागाचे संचालक विरेंद्र सिंग यांनी दिली. तसेच जन्म, विवाह, आयकर आणि जात प्रमाणपत्र यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे या ई लॉकरमध्ये सुरक्षित ठेवता येतात. ज्यामुळे तुम्हाला सतत ती घेऊन फिरण्याची गरज नाही.

या लॉकरच्या सुरक्षिततेबाबत सिंग यांना विचारले असता ते म्हणाले, नागरिकांच्या महत्त्वांच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेसाठी वन टाईम पासवर्डची सुविधा देण्यात आली आहे. ज्यावेळी आधार क्रमांकाच्या सहाय्याने यूझर लॉकर उघडण्यासाठी लॉग इन करेल त्यावेळी मोबाईलद्वारा नवीन पासवर्ड यूझरला पाठवला जाईल. त्यामुळे कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही आणि सुरक्षितता कायम राहील.

47 COMMENTS

  1. elocker.maharashtra.gov.इन या वेबसाईट वर मी टाकलेले आधार कार्ड नंबर बरोबर असून माझा मो.नंबर स्वीकारत नाही मग आपल्याला काय कराव लागेल

  2. प्रिय मित्रानो मी इ लॉकर यशस्वी रित्या ओपन केले असून माझी माहिती त्यामध्ये स्कॅन करून अपडेट करून ठेवली आहे अधिक माहिती साठी संपर्क करा ८०८०३२१७८९ रात्रो ७.३० नंतर धन्यवाद

  3. e lockerchi suvidha khup chhan aahe.
    elocker.maharashtra.gov.इन या वेबसाईट वर मी टाकलेले आधार कार्ड नंबर बरोबर असून माझा मो.नंबर स्वीकारत नाही मग आपल्याला काय कराव लागेल. plz help me.

  4. मी लोंग इन केले आहे परंतु पिन नंबर टाकलेला असून तो विसरलेला गेला आहे नवीन लोंग इन करता येईल का

  5. elocker.maharashtra.gov.इन या वेबसाईट वर मी टाकलेले आधार कार्ड नंबर बरोबर असून माझा मो.नंबर स्वीकारत नाही मग आपल्याला काय कराव लागेल. plz help me.

  6. मी आधार कार्ड नंबर टाकला परंतु मोबाईल नंबर नॉट रजिस्टर येत आहे काय करू

  7. ए लोकर ला आधार नंबर दिल्या नंतर तो मोबाएल नंबर रजिस्टर नाही असे सांगतो

  8. आधार कार्ड वरील मोबएल नम्बर ए लोकर ला यतो नवीन मोबएल नम्बर वर OTP PASSWORD यण्या करिता काय करू हेल्प मी

  9. सर्वाना गव्हर्नमेंट तर्फे इन्फॉर्म करा.. आता पर्यंत सर्वाना याबाबत माहित नाही.

  10. महत्वाच्या कागदपत्रासाठी ई-लोकेर सुविधा सुरू केल्याबद्द्ल सर्पप्रथम महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन ! हा एक महत्तपुर्ण निर्ण्य आहे. सर्व जंनतेला नम्र विनंती आहे कि, यासुविधेचा लाभ घ्यावा.

  11. हे सर्व खर आहे पण आधार चा काला बझार रोकणार कोण कारण सेलू शहरात मागील १ महिन्यापासून अधर्नोंद्निसाठी ७० ते १०० रु खुले अं घेतले जातात याचे करावयाचे काय यासाठी शासनाचे उपाय हवे

  12. काहीही करत असत गर्व्हमेंट काय गरज आहे याची आमचे मेल आयडी प्रायव्हेट असले तरी आम्ही तीथेही कागदपत्र ठेवू शकताो, जे मी १० वर्षापूर्वी केलय ते हे आत्ता आणताहेत. निव्वळ वेळेचा अपव्यय

  13. नेट सोबत वाय-फाय व जीपीएस ऑन करा. आणि मग इ लॉकर ओपन करण्यासाठी प्रयत्न करा. सफल व्हाल.

  14. महत्वाच्या कागदपत्रासाठी ई-लोकेर सुविधा सुरू केल्याबद्द्ल सर्पप्रथम महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन ! हा एक महत्तपुर्ण निर्ण्य आहे.

  15. ए लोकर ला आधार नंबर दिल्या नंतर तो मोबाएल नंबर रजिस्टर नाही असे सांगतो

Leave a Reply to Shekhar Chaudhari Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version