Home मध्यंतर सुखदा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र

10

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही संस्था शासनाच्या पुढाकाराने स्थापन झालेली आणि उद्योग विभागाच्या आधिपत्याखाली कार्यरत स्वायत्त संस्था आहे.

ही संस्था शासनाच्या पुढाकाराने स्थापन झालेली आणि उद्योग विभागाच्या आधिपत्याखाली कार्यरत स्वायत्त संस्था आहे. या संस्थेची १ ऑक्टोबर १९८८ रोजी स्थापना झाली असून, संस्था नोंदणी अधिनियम १९६० अन्वये आणि मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये नोंदणीकृत आहे.

या संस्थेचे मुख्य कार्यालय औरंगाबादला असून, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड, औरंगाबाद आणि मुंबई या ठिकाणी स्वतंत्र विभागीय कार्यालय तर जिल्हास्तरावर प्रत्येक जिल्हयात जिल्हा उद्योग केंद्रात संस्थेचे आणि उद्योजकता संबंधीचे उपक्रम राबवण्यासाठी संस्थेचा प्रकल्प अधिकारी आणि त्याच्या मदतीला सहाय्यक असतो.

तसंच तालुका स्तरावर कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यक्रम आयोजक असतात. १९८८ पासून संस्थेने स्वयंरोजगार आणि उद्योजकता क्षेत्रात जवळपास १० लाख लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. राज्यात उद्योजकतेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून संस्थेमार्फत ‘उद्योजक’ हे मराठी मासिक प्रसिद्ध केलं जातं.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमातील अनुभव, तज्ज्ञ प्रशिक्षकांची उपलब्धता, पोर्टल नोंदणी माध्यमातून नोंदणीकृत नामांकित व व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षक आणि संस्थेचे नेटवर्क इ. व्यवस्थापनाचा प्रस्तुत प्रकल्पाच्या अंमलबजावणीत उपयोग करून घेण्यात येतो.

एमसीईडीचे विविध प्रशिक्षण कार्यक्रम

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम – (ईडीपी)

उद्योग आणि उद्योजकता या दोन भिन्न बाबी आहेत. स्वभावत:च उद्योजकता असलेली व्यक्ती त्याने स्वत: ठरवले तर उत्कृष्ट उद्योजक बनू शकतो. उद्योजकता विकसित व्हावा असा प्रयत्न केला जातो. उद्योग व्यवसाय हे तीन प्रकारचे असतात.

१. सेवा, २. व्यापार, ३. उद्योग, ईडीपी (एऊढ) हा विशेषत: उत्पादनाच्या क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणा-यासाठी अत्यंत उपयुक्त कार्यक्रम ठरत आहे. कार्यक्रमाचा कालावधी ६ आठवडे (३४ दिवस) दररोज किमान ३ तास अशा प्रकारे दुपारी किंवा संध्याकाळची बॅच असते.

कृषी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (एईडीपी)

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, दुग्धव्यवसाय, विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालयातर्फे एक महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमधून कृषी पदवीधर, दहावी पास किंवा नापास, बारावी पास बेरोजगार तरुण यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान वापरण्याबाबतचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्मितीची तयारी करून घेतली जाते.

स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम (डीपीएसई)

हा कार्यक्रम शहरी किंवा ग्रामीण भागासाठी जिल्हा उद्योग केंद्राने पुरस्कृत केलेला आहे. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे प्रामुख्याने पंतप्रधान रोजगार योजना, सुशिक्षित बेरोजगार योजना इ. योजना राबवल्या जातात. या कार्यक्रमाद्वारे या योजनांसाठी लाभार्थी निर्माण करणे आणि त्यांना स्वयंरोजगाराचे माध्यम निर्माण करून देणे हा हेतू आहे.

किमान २५ हजार रुपये ते ५० हजार रुपये गुंतवणुकीचे उद्योग व्यवसाय तरुणांनी उभारावेत यासाठी आवश्यक ती माहिती, उद्योगाची निवड, कर्जाच्या योजना, बाजारपेठ पाहणी, विक्री कौशल्य, व्यवस्थापन इ. व्याख्याने आयोजित केली जातात.

पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत प्रशिक्षण

»  तंत्रशिक्षणावर आधारित उद्योजकता विकास

»  व्यवस्थापकीय विकास प्रशिक्षण

»  प्रेरक प्रशिक्षक कार्यक्रम

»  उद्योजकता परिचय कार्यक्रम

»  कॉम्प्युटर प्रशिक्षण कार्यक्रम

वरील सर्व कार्यक्रमामधील प्रशिक्षणार्थीना कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिलं जातं. शासकीय व निमशासकीय संस्था एमसीईडीच्या उपक्रमात प्रमाणपत्र देण्यात येतं.

महाराष्ट्र व्यवसाय मार्गदर्शन केंद्र

उदबत्ती, डिर्टजट, जेली, सोप, फिनाइल घरगुती उत्पादनं, विविध प्रकारची फुलं आणि भेटकार्ड, मोत्याचे अलंकार, स्क्रीन प्रिंटिंग पदवीधरांसाठी संभाषण, व्यक्तिमत्त्व विकास.

संपर्क : म्युन्सिपल शाळा, पहिला मजला, भवानी शंकर मार्ग, दादर (प), मुंबई २८

कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय

महिलांसाठी सुरू केलेलं व्यासपीठ असून एक महिन्यापासून पाच महिन्यांपर्यंत विविध मुदतीचं प्रशिक्षण येथे दिलं जातं. आतापर्यंत हजारो महिलांनी लाभ घेतला असून अनेक महिलांनी ग्रामोद्योग सुरू केला आहे.

संपर्क पत्ता : कस्तुरबा महिला ग्रामोद्योग विद्यालय, आगाखान पॅलेस, नगर रोड, पुणे – ४११ ००६

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अभ्यासक्रम

महाराष्ट्रात महिलांसाठी १५ स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १०४ बिगर-शासकीय महिला महाविद्यालये आहेत. अभ्यासक्रमाची आखणी, नियमन आणि परीक्षा ‘महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ’ यांच्यामार्फत करण्यात येते. अभ्यासक्रमाच्या नावाची यादी पुढीलप्रमाणे –
»  इलेक्ट्रॉनिक गट
»  तांत्रिक गट
»  अन्न प्रक्रिया गट
»  मुद्रणशास्त्र गट
»  वस्त्रोद्योग गट
»  शिवण-कर्तन गट

अशा अनेक छोटया-मोठया उद्योग व्यवसाय प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी ६६६.ेूी.िल्ल्रू.्रल्ल तसंच प्रत्यक्ष भेटण्यासाठी झेप उद्योगिनी कार्यालय, याशिवाय एमसीईडी मुंबई डिव्हिजनचे पदाधिकारी राठोड : ९४०३०७८७७३ यांच्याशी संपर्क साधा.

10 COMMENTS

  1. सर मला वही बनवण्याचा उद्योग सुरु करायचा आहे.कृपया मला सगळ्या प्रकारची मदत करावी ही विनंती.

  2. सर मला माझ्या उद्योगाचे रजीस्टेशन करायचे आहे कृपया web व हेल्प द्या.

  3. मला फीनाईल, टाँयलेट क्लीनर, हँण्ड वाँश, डीशवाँश बनवण्याचा घरगूती व्यवसाय करावयाचा आहे. त्यासाठी आवश्यक परवाने , नोंदणी कोणत्या असतात ple.reply.
    pationr0975@gmail.com

  4. मला फीनाईल, टाँयलेट क्लीनर, हँण्ड वाँश, डीशवाँश बनवण्याचा घरगूती व्यवसाय करावयाचा आहे. त्यासाठी आवश्यक परवाने , नोंदणी कोणत्या असतात ple.reply..

  5. सर मला इलेक्ट्रॉनिक मध्ये रुची आहे . तसे मी होम सर्विस मानून काम करत आहे . तर मला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये स्वतःचे मॅनुफॅक्टयरिंग करायचे आहे तर ते कसे करायचे याचे मला माहित हवी आहे. L E D मॅनुफॅक्टयरिंग .सिंगल फेज ऑल मोटर मॅनुफॅक्टयरिंग. याबद्दल माहिती .

  6. खूपच छान माहिती आहे, मला पण उद्योजक बनायचे आहे. पण कोणता उद्योग करावा हे काही काळात नाही. ट्रैनिंगची गरज आहे. कृपया मदत करावी.

  7. सर मला कुकुट पालन आणि शेळी पालन कराच आहे तर कोणची सरकारी योजना आहेका

Leave a Reply to Arvind ghanshyam Patil Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version