Home टॉप स्टोरी मिलिंद एकबोटेंना चार दिवसांची पोलीस कोठडी

मिलिंद एकबोटेंना चार दिवसांची पोलीस कोठडी

1

भीमा-कोरेगाव येथे जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना शिरुर तालुका न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पुणे- भीमा-कोरेगाव येथे जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना शिरुर तालुका न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शिरूर तालुका न्यायालयाच्या या निर्णयामुळे एकबोटेंची सुटकेची आशा मावळली आहे. सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकबोटेंना आता शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.

एकीकडे एकबोटेंच्या जामीन अर्जावर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असताना त्याचवेळी शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकबोटे यांच्यावर नोंद असलेल्या गुन्ह्याप्रकरणी शिरुरच्या तालुका न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करत एकबोटेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

१ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचारात शंभरहून अधिक वाहनांचे नुकसान झाले होते. यामध्ये सुमारे ५ कोटी ९४ लाखांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी अगोदरच ४४ जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यात एकबोटेंच्या नावाची भर पडल्याने यातील आरोपींची संख्या ४५ वर पोहोचली आहे. मिलिंद एकबोटेंचा या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना शिक्रापूर पोलिसांकडे वर्ग करावे यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता.

1 COMMENT

  1. हे तर चोर सोडून संन्याशाला फाशी देण्या सारखे झाले !!!!!
    ज्यांनी तोडफोड केली ,प्रक्षोभक भाषणे केली ,जातीयवादी विष पसरवले त्यानंचे काय…. ?

    ज्यांनी संपूर्ण आयुषय धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधी स्थळा साठी घालवले ,कधी हि जाती चा विचार करून काम केले नाही .
    पुण्यात वऱ्हाडवाडी भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले . त्यांच्यावर असे आरोप करणे चुकीचे आहे.

Leave a Reply to Kunal Someshwar Kamble Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version