Home महामुंबई लाचखोरीच्या जाळ्यात अधिकारीच!

लाचखोरीच्या जाळ्यात अधिकारीच!

1

लाललुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) पहिल्या सहा महिन्यांतच रचलेल्या ७२१ सापळ्यांत ९७७ जण अडकले.

मुंबई- लाललुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) पहिल्या सहा महिन्यांतच रचलेल्या ७२१ सापळ्यांत ९७७ जण अडकले. गेल्या वर्षी याच काळात ३३६ कारवाईंत केवळ ४३७ जणांना अटक झाली आहे. लाचखोर अधिका-यांच्या अटकेचे हे प्रमाण २०१३च्या तुलनेत या वर्षी दुपटीने वाढले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत अनुक्रमे ७१, ६१, ६१, ६०, ५५, ४९, ६२ जणांना अटक झाली होती. या तुलनेत या वर्षी पहिल्या सात महिन्यांत अनुक्रमे १०१, १०३, १५४, ११९, १४७, १४८, १५८ जणांना अटक झाली होती. मागील पाच वर्षाच्या तुलनेत राज्यातील लाचखोर अधिका-यांची संख्या वाढली आहे.

२०१३ मध्ये राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या ५८३ कारवाईंत ८०५ जणांना अटक झाली. याशिवाय २००८ मध्ये लाचखोरीच्या तक्रारींनंतर ३६० कारवाई करण्यात आल्या. २००९ मध्ये ४०५, २०१० मध्ये ४८६, २०१२ मध्ये ४८९ सापळे रचले गेले. गेल्या वर्षी सर्वाधिक म्हणजेच १५५ सापळे पोलिसांविरोधात रचण्यात आले.

त्यात २३७ जणांना अटक झाली. त्यात १७ खासगी व्यक्तींचाही समावेश आहे. पोलिसांपाठोपाठ ‘एसीबी’ने महसूल विभागाशी संबंधित अधिकारी व कर्मचा-यांविरोधात १४८ कारवाई केल्या. यात १८८ जणांना अटक झाली आहे. पैकी २६ खासगी व्यक्तींचाही समावेश आहे.

या पाठोपाठ ३७ गुन्ह्यांत ५६ महापालिका अधिका-यांनाही अटक झाली आहे. गेल्या वर्षी एसीबीच्या मुंबई विभागाने लाचखोरीप्रकरणी सर्वाधिक म्हणजेच २२३ गुन्हे दाखल केले. त्याच्यापाठोपाठ पुणे १९६, नाशिक १८५ व ठाण्यात १४७ गुन्हे दाखल झाले आहेत.

1 COMMENT

Leave a Reply to Pandudada, Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version