Home मजेत मस्त तंदुरुस्त सांधेदुखीवर करा मात

सांधेदुखीवर करा मात

14

ओस्टिओआर्थरायटीस हा आर्थरायटीसचा सर्वसाधारणपणे आढळून येणारा प्रकार आहे, ज्यामध्ये सांधेदुखी आणि सूज येणे असा त्रास होतो. सौम्य स्वरूपाच्या पण नियमितपणे केलेल्या व्यायामाने आणि निरोगी आहार घेतल्याने या आजाराची तीव्रता कमी करता येते.

सुजलेले आणि ठणकणारे सांधे घेऊन जगणं कसं असेल याचा फक्त विचार करा. खेळ, नाचणं वगरे सोडूनच द्या पण चालणं, हातापायांना ताण देणं किंवा दात घासण्यासारख्या रोजच्या क्रियादेखील अतिशय मरणप्राय वेदना देणा-या ठरू शकतील. पापण्यांची उघडझाप आणि अन्न चावणं या क्रियाच फक्त आपल्या सांध्यात कळ न येऊ देत करता येण्याजोग्या क्रिया उरतील. संपूर्ण आयुष्यभर अशी वेदना घेऊन जगण्याची कल्पनादेखील करवत नाही. जगभरातील लाखो लोक अशा वेदनादायक वास्तवात जीवन कंठत आहेत.

आपल्या शरीरातील सांध्याकडे आपण द्यायला हवं तितकं लक्ष देत नाही आणि त्यांचे महत्त्व आपल्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि झालेली हानी भरून काढण्यापलीकडे गेलेली असते. सांध्यात वेदनादायक जळजळ होत असेल आणि काठिण्य असेल तर त्या आजाराला ओस्टिओआर्थरायटीस (ओए) असं म्हणतात. हा आर्थरायटीसचा सर्वसाधारणपणे आढळून येणारा प्रकार आहे. या आजाराला डीजनरेटिव्ह जॉइंट डीसीज (डीजेडी) असंही म्हणतात. हा आजार वय वाढल्याने आणि सांध्याची हानी अथवा झीज झाल्याने होतो.

ओस्टिओआर्थरायटीसमध्ये शरीरातील सांध्यांना आधार देणा-या कार्टिलेजची मोडतोड होते. कार्टिलेजमुळे हाडांच्या टोकांमध्ये अतिशय सहज, अतिशय कमी घर्षणासह हालचाल होऊ शकते. कार्टिलेजमध्ये झालेल्या झीजेमुळे हाडांची उघडी टोके एकमेकांवर घासली जातात आणि हा अनुभव अतिशय वेदनादायक असतो. त्यामुळे सांधे हलवण्यात अडचण येऊ शकते. गुडघे, कंबर आणि हातांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार विकसित देशांमध्ये विकलांगत्वास कारणीभूत असलेल्या पहिल्या दहा आजारांमध्ये ओस्टिओआर्थरायटीसचा क्रमांक येतो. जगभरतील ६० वर्षावरील जवळपास १० टक्के पुरुष आणि १८ टक्केस्त्रियांमध्ये ओस्टिओआर्थरायटीसची लक्षणं आढळून आलेली आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ओस्टिओआर्थरायटीसने पीडित असलेल्या जवळपास ८० टक्के व्यक्तींच्या हालचालींवर मर्यादा येतात. तर २५ टक्के व्यक्तींना नित्यनेमाच्या क्रिया करतानाही त्रास होऊ शकतो.

रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, एक्स-रे आणि काही प्रकरणांच्या बाबतीत हानी झालेल्या सांध्यांतील सिनोव्हियल द्रावाची चाचणी करून ओस्टिओआर्थरायटीसचं निदान करता येतं. दुर्दैवाने हा आजार बरा होत नाही. या आजाराकरिता उपाययोजना करताना लक्षणांवर भर देऊन आराम देण्यावर आणि सांध्यांची हालचाल चालू ठेवण्यावर भर दिला जातो. वेदनेवर उतारा म्हणून डॉक्टर्स पेनकिलर्स, काही पूरक औषधे आणि जळजळ कमी होण्याकरिता काही औषधे घ्यायला सांगू शकतात. कॉर्टिसोनसारखी स्टिरॉइड्स थेट दुख-या सांध्यांत टोचली जाऊ शकतात. परिस्थिती अगदीच गंभीर असेल तर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. ओस्टिओआर्थरायटीसची प्रक्रिया मंदावू शकेल आणि त्याची वृद्धी थांबवता येईल, अशा उपचार योजनेकरिता संशोधन सुरू आहे.

14 COMMENTS

  1. फक्त लेखाचे नाव सांधेदुखीवर करा मात पण फक्त आजाराची माहिती उपचार दिलेला नाही फक्त जाहिरातबाजी दिसते

  2. संधिवात रक्ताची चाचणी + आली आहे . नेहमी पाठीत , कमरेत ‘ पायात तर कधी हाताची बोटे दुखतात काय करू ? उपचार सांगा

  3. संधिवात ने पुरे अंग खूप दुखते please काहीतरी उपाय सांगा बेड वरून खाली उतरता पण येत नाही काहीतरी उपाय सांगा

  4. हात पायाची बोटे सुझ्तात ३ महीय पासून त्रास होतोय प्ल्झ उपाय सुचवा …

  5. Thandi suru zali ki tal pay khup dukhto,ani hatachi bot hi dukhtat… Aajun sandhivat test keli nahi..
    Kahi gharguti upay aasel tar sanga…vyayam, yoga ..Prakar sanga.
    Age – 41yrs.

Leave a Reply to Chandrashekhar Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version