Home Uncategorized सागाची शेती फायद्याची

सागाची शेती फायद्याची

14

सागाचे लाकूड हे बांधकामासाठी सर्वात मजबूत समजले जाते. यामुळे घरातील लाकूडसामानापासून ते अगदी घराच्या वाशापर्यंत या सागाच्या लाकडाला सर्वाधिक मागणी मिळते.

सागाचे लाकूड हे बांधकामासाठी सर्वात मजबूत समजले जाते. यामुळे घरातील लाकूडसामानापासून ते अगदी घराच्या वाशापर्यंत या सागाच्या लाकडाला सर्वाधिक मागणी मिळते. या लाकडाचे महत्त्व पाहता त्याची व्यावसायिक लागवड आर्थिकदृष्टया फायद्याचीच ठरेल.

सागाची लागवड पडीक डोंगरउताराला केल्यास यातून शेतक-यांना चांगला नफा मिळू शकतो. सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत लागवडीसाठी हेक्टरी ८४.४ हजार ४०० अनुदान मंजूर केले आहे. याचा शेतक-यांनी लाभ उठवून सागाच्या झाडांची लागवड केल्यास भविष्यात त्यांच्यासाठी मोठा आर्थिक स्रेत उपलब्ध होऊ शकेल.

इमारती, फर्निचर व औद्योगिक अशा नित्योपयोगी वस्तूंसाठी सागाच्या लाकडाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. लाकडाचा आकर्षक रंग व त्यात असलेला चिवटपणा, तासकामासाठी उत्तम, पाण्यात अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता आदी गुणधर्मामुळे सागाच्या लाकडास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

या झाडाची लागवड ही कायमस्वरूपी उत्पन्न देणारी आहे. एकदा लागवड केल्यानंतर साग तयार झाल्यावर त्याचे तोडकाम केल्यास जुन्या खोडास पुन्हा धुमारे येतात. यामुळे त्याचे उत्पन्न वर्षानुवर्षे मिळत राहते. अशा स्थितीत मागणी जास्त, मात्र उत्पादन कमी असलेल्या सागाला दरही चांगला मिळतो. या दृष्टीने शेतक-यांना पडीक जमिनीत सागाची लागवड करून काही वर्षानी भरघोस आर्थिक उत्पन्न मिळू शकते.

सागलागवडीसाठी साधारण उष्ण व दमट हवामान आवश्यक असते. अशा हवामानात सागाची वाढ चांगल्या प्रकारे होते. १० अंश ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सागास मानवते. सागाच्या लागवडीसाठी थोडी-फार चढउताराची, पाण्याची योग्य निचरा होणारी जमीन असेल तर ती योग्य समजावी. सागाची लागवड बियाणे पेरून, रोपाची लागवड करून किंवा खोडमूळ (स्टम्प) लावून करता येते.

सागाच्या बियांवरील कवच मऊ करून अंकुर येण्यास सुलभ करण्यासाठी पावसाळय़ात मोकळय़ा जागेत बियाणे पसरून दररोज खालीवर करावे लागते. ४ ते ६ आठवडय़ांनंतर बियांवरील कवच मऊ होऊन बी रुजण्यास मदत होते.

सागलागवडीबाबत कृषी विभागातर्फे काही मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली गेली आहेत. यानुसार जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर २ बाय २ मीटर अंतरावर ३० बाय ३० बाय ३० सेंमी आकाराचे खड्डे खोदून त्यामध्ये लागवड करावी. लागवडीनंतर रोप, स्टम्पच्या बाजूला पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

सागाची वाढ जोमाने होण्यासाठी प्रतिरोप १० ग्रॅम नत्र व १० ग्रॅम स्फुरद आळे पद्धतीने देणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाचे दिलीप चव्हाण यांनी सांगितले. लागवडीनंतर साधारण दोन वर्षापर्यंत पाणी देणे गरजेचे आहे. नियमित पाणी व वर्षातून तीन वेळा खत दिल्यास सागाची वाढ जोमाने होते. सागाच्या झाडाला हुमणी व प्युरा या किडी व भुरी रोगांचा प्रादुर्भाव झालेला आढळतो.

यासाठी कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कीटकनाशकांचा वापर करणे हितावह ठरते. सागलागवडीसाठी या वर्षी १६२ रुपये मजुरीप्रमाणे साफसफाई, खड्डे खोदणे, खड्डे भरणे लागवड करणे, आंतरमशागत, पाणी देणे आदींसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत हेक्टरी ८४ हजार ४०० रुपये अनुदान मिळू शकते. याचा लाभ शेतक-यांनी घेणे गरजेचे असून या लागवडीतून आपली आर्थिक मान उंचावणे आवश्यक आहे.

14 COMMENTS

    • टिश्यू कलचर बर्मा सागवान रोपे
      टिशयूकलचर सागवान रोपे
      1 वर्षात 15 ते 18 फूट वाढते
      लॅब व सागवान बाग पाहण्यासाठी
      बर्मा सागवान रोपे
      फांदी नसते फकत पाने असतात
      2 वर्षात 35 ते 40 फूट वाढते
      सोटमूळ असते
      कोणतीही आतरपिके घेता येतात
      उदाहरणार्थ ऊस,मका,केळी,मिरची असे कोणतेही आतरपिके घेता येतात
      वर्षानंतर जाड़ी सुरुवात होते
      पाणी कमी लागते
      उत्पन्न 8 ते 9 वर्षा मधये 15 ते 18 घनफूट लाकूड मिळते
      जनावरे खात नाहीत
      एकरी 605 रोपे
      आजचा दर 3000 ते 3500 पतिघनफूट
      मनुष्य बळ जास्त लागत नाही
      बाराही महिने लागवड़ करता येते
      लाखात उत्पादन
      टिश्यू कल्चर सागवान, टिशयूकलचर ड़ाळीब ,टिशयूकलचर केळी,चंदन रोपे उपलब्ध
      2 वष्रे गॅरंटी
      8 वर्षात 1 झाड़ा पासून 20000 रुपये उत्पादन
      सल्ला व मार्गदर्शन मिळेल
      लागवड़ अतर 8 ×8 = 680 रोपे एकरी
      8 × 9 = 570 रोपे एकरी रोपे
      1000 रोपे 65 रुपये दर
      अ‍ॅडव्हान्स बुकिंग
      मो. नं. 8879307716/ 8830040793

  1. आमच्या शेता मध्ये १५ वर्षे जुनी सागाची ५० झाडे आहेत
    त्याची विक्री करायची आहे
    त्यासाठी काय करावे, चौकशी कोठे करावी, साधारण काय विक्री दर असेल ?

    • टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,८ते ९ वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क – सिमा बायोटेक कोल्हापूर मो न – ९८२२०५०४८९ \ ९७६३३९६७९३

  2. मला २ एकर जमिनीमध्ये साग शेती करायची आहे, त्यासाठी माहिती हवी आहे .. मला कर्ज मिळू शकेल का? आणि अजून काही सरकारी योजना आहे का ? त्याविषयी माहिती हवी आहे… आपल्याकडे माहिती असेल तर या ठिकाणी द्या ..

    • टिश्यू कल्चर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे, सरळ वाढ, आंतरपिके घेता येतात, ऊस, मका, केळी, चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते, ८ ते ९ वर्षात तोड़णीस, लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क – कृषी बायोटेक कोल्हापूर मो न – ९८२२०५०४८९ \ ९७६३३९६७९३

  3. मला अडिच एकर जमिनीमध्ये साग शेती करायची आहे, त्यासाठी माहिती हवी आहे .. मला कर्ज मिळू शकेल का? आणि अजून काही सरकारी योजना आहे का ? त्याविषयी माहिती हवी आहे… आपल्याकडे माहिती असेल तर या ठिकाणी द्या

Leave a Reply to Pralhad Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version