Home Uncategorized हमखास उत्पन्न वाढवणारे अळंबी पीक

हमखास उत्पन्न वाढवणारे अळंबी पीक

25

नुसती अळंबी म्हटली तरी तिची चव जिभेवर रेंगाळू लागते. यामुळे बाजारातही तिला मोठी मागणी आहे. अगदी साध्या ढाब्यापासून पंचतारांकित हॉटेलांमध्ये मागणी असल्याने शेतक-यांना यातून उत्पन्नाचा नवा स्त्रोत सापडू शकेल.

नुसती अळंबी म्हटली तरी तिची चव जिभेवर रेंगाळू लागते. यामुळे बाजारातही तिला मोठी मागणी आहे. अगदी साध्या ढाब्यापासून पंचतारांकित हॉटेलांमध्ये मागणी असल्याने शेतक-यांना यातून उत्पन्नाचा नवा स्रेत सापडू शकेल. अळंबीचे पीक घेण्यासाठी जागेचीही फारशी अडचण नाही. अगदी घरातील फडताळापासून ते छपरावरही तिचे सहज पीक घेतले जाते.

वाढत्या मागणीमुळे हमी भावाचीही फारशी चिंता उरत नाही. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील प्रा. रमेश रणदिवे यांनी राबवलेल्या कल्पवृक्ष आळंबी प्रकल्पाची यशोगाथा एव्हाना जागतिक पातळीवर पोहोचली आहे. ते प्रकल्पातून साधारण ३६ हजारांचे मासिक उत्पन्न कमवत आहेत. त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन या नव्या व्यवसायाची त्यांना ओळख करून देत आहेत.

बारा वर्षापूर्वी रमेश रणदिवे यांनी पुणे येथे अळंबी प्रकल्प पाहिला. अळंबी पिकाविषयी मनात कुतूहल निर्माण झालेल्या रणदिवे यांनी या पिकाची उत्पादन पद्धती माहिती, त्यासाठीचे आवश्यक भांडवल आणि नफ्याचे प्रमाण यांची माहिती घेतली. या व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो याची पक्की खात्री पटल्यानंतर त्यांनी अळंबी पिकवण्याचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. राहुरी कृषी विद्यापीठात या पिकाविषयीचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांना कळले आणि २००० साली येथून प्रशिक्षण घेऊन ते बाहेर पडले. त्यानंतर २००७ साली खामसवाडी येथे स्वत:च्या घरातच त्यांनी प्रकल्प उभारला.

सुरुवातीला एका खोलीत सुरू केलेल्या प्रकल्पात त्यांनी एकूण दोन लाखांची गुंतवणूक केली. गेल्या पाच वर्षापासून त्यांचा हा प्रकल्प सुरू असून त्याचे आता मोठया प्रकल्पात रूपांतर झाले आहे. या व्यवसायातून त्यांना वर्षाकाठी दोन लाखांहून अधिक निव्वळ उत्पन्न मिळत आहे. घरातील पाच सदस्य या प्रकल्पात काम करत असून १२ बाय १५च्या खोलीत हा प्रकल्प सुरू आहे. गेल्या पाच वर्षात रणदिवे यांनी अळंबीची स्वत:ची अशी बाजारपेठ तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी बरीच पायपीटही केली.

विविध कृषी प्रदर्शनात स्टॉल लावून अळंबीचे पीक आणि त्यातून मिळणा-या फायद्याचा प्रसार केला. अळंबीच्या विविध उपयोगाचे महत्त्व पटवून दिले. म्हणूनच त्यांच्या या मेहनतीला आता मोठे यश आल्याचे दिसून येत आहे. पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळूरु आणि इतर मोठय़ा शहरांतून त्यांच्याकडे थेट मागणी नोंदवली जात आहे. तसेच अळंबीची निर्यातही केली जात असल्याचे रणदिवे यांनी सांगितले. मात्र निर्यात करण्यात येणाऱ्या अळंबीची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेष करून ती जंतुविरहित तसेच सहा महिन्यांहून जुनी असू नये, असे त्यांनी सांगितले.

अळंबीची लागवडीविषयीही रणदिवे यांनी माहिती दिली. गहू, ज्वारी, मका, हरभ-याच्या भुशामध्ये अळंबीचे बी पेरले जाते. या बिया जैवतंत्रज्ञानासह तयार केल्या जातात. राहुरी कृषी विद्यापीठ तसेच स्वत: रणदिवेही त्या शेतक-यांना उपलब्ध करून देतात. खोडवा पद्धतीने आळंबीची लागवड केली जाते. साधारण २५ दिवसांनंतर पहिले पीक तयार होते. त्यानंतर दर सहा दिवसांनंतर काढणी केली जाते. अशा प्रकारे एका लागवडीपासून दोन महिन्यांमध्ये दहा पिके हाती लागत असल्याचे रणदिवे म्हणाले. रणदिवे हे शेतक-यांना आळंबी उत्पादनाविषयी प्रशिक्षण देण्याचेही काम करत असून त्यांनी आतापर्यंत २०० शेतक-यांना प्रशिक्षण दिले आहे. शिवाजी लोकविद्यापीठांतर्गत त्यांच्या या प्रशिक्षण वर्गाला कृषी तंत्र विद्यालय म्हणून मान्यता मिळाली आहे.

२००९ पासून त्यांनी ही प्रशिक्षण मोहीम सुरू केली आहे. प्रशिक्षण घेतलेल्या शेतक-यांना प्रकल्प उभारणीसाठी मार्गदर्शन तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या अळंबीच्या खरेदीची हमीही दिली जाते आणि त्यांना हमीभावही दिला जातो. शेड, कुडाचे घर आणि छप्पर तसेच घरातील फडताळातही अळंबीचे पीक घेता येते. मात्र थंड हवामान लागणा-या या पिकाचा ऊन आणि पावसापासून बचाव करणेही तितकेच आवश्यक असते. अळंबीला हॉटेलमध्ये मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. मशरूम समोसा, आवळा मशरूम जाम, मशरूमवडा, भाजी अशा वेगवेगळय़ा पदार्थाना मोठी मागणी आहे. महिन्याकाठी जवळपास ५० ते ६० किलो अळंबी पिकवत असल्याचे रणदिवे यांनी सांगितले. तसेच प्रशिक्षण घेतलेल्या शेतक-यांकडून ३० ते ४० किलो अळंबीची खरेदी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याची शेतीची अवस्था पाहता शेतक-यांनी अळंबीचे पीक घेतल्यास त्यांच्यासाठी चांगला उत्पन्नाचा स्रेत मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले. भारतीय कृषक समाज, दिल्लीकडून डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार तसेच शंकरराव चव्हाण किसान कृषिरत्न पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. राष्ट्रीय फलोत्पादन पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.  बेरोजगारांनी नोकरीच्या मागे न लागता अळंबी उद्योग सुरू करून बेरोजगारीवर मात करावी, असे रणदिवे यांनी सांगितले. त्यांच्या कल्पवृक्ष अळंबी प्रकल्पाची यशोगाथा ‘एनजीआय’ या जागतिक स्तरावरील मासिकामध्ये प्रकाशित झाल्यामुळे अकोला कृषी विद्यापीठाने त्यांचा नुकताच सत्कारही केला.

अळंबीमध्ये औषधी गुणधर्म
अळंबीचा उपयोग औषधांमध्येही केला जातो. संधिवात, मूळव्याध, मधुमेह, कर्करोग यांसारख्या व्याधींसाठीच्या औषधांमध्ये याचा वापर केला जात असल्याचे रणदिवे यांनी सांगितले. ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या जीवनसत्त्वांनी युक्त असलेल्या अळंबीत मानवी शरीरासाठी आवश्यक १८ अमिनो आम्ल उपलब्ध असल्याचे शास्त्रज्ञांच्या प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. फळे, अंडी वा अन्य मांसाहारी पदार्थामध्ये शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्व एकत्रित मिळत नसल्याचा दावाही शास्त्रज्ञांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रक्रिया उद्योगासाठीही संधी
अळंबीचे पीक हे शेतक-यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणारे पीक आहे. आळंबीपासून विविध उपपदार्थ तयार केले जाऊ शकतात. पापड, लोणचे, सूप पावडर अशा उपपदार्थाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभा राहू शकतो. या पदार्थाना मागणीही चांगली असल्याने पैसे चांगले मिळतील, असे रणदिवे यांनी सांगितले.

25 COMMENTS

  1. नमस्कार , मला आळंबी बद्दल माहिती द्यवी .प्रशिक्षण केंद्रा बद्दल सुचवा .पवन आढाव:-9860894601
    धन्यवाद….

  2. नमस्कार , मला आळंबी बद्दल माहिती द्यवी .प्रशिक्षण केंद्रा बद्दल सुचवा .mo no 9049825430
    धन्यवाद….

  3. नमस्कार साहेब
    मला मनापासून हा व्यवसाय करायचा आहे मला माहीती द्या

  4. प्राध्यापक रणदिवे साहेबांना भेटायची ईच्छा आहे तरी त्यांचा contact number द्यावा

  5. नमस्कार, मला आळंबी बद्दल माहिती द्यावी. प्रशिक्षण केंद्राबद्दल सुचवा.

  6. नमस्कार साहेब मला आपणाकडून अळंबी याच्यविषयी माहिती हवी आहे माझा मोबाइलला नंबर 9423864734 हा आहे तरी कृपया संपर्क करावा.

  7. क्रुपया रणदिवे सरांचा मोबाईल नंबर व पत्ता द्या. माझा 9422706294 आहे. धन्यवाद !

  8. नमस्कार सर मला याविषयी मार्गदर्शन करा मि हा व्यवसाय करू इच्छितो माझा नंबर 8390871826

  9. नमस्कार सर मला अळंबी शेती करायची आहे मला याविषयी मार्गदर्शन करा . रोहित पाटील कामेरी (वाळवा) सांगली फोन : ७३८७२७३७६२/ ९९२२१९९३८४.

  10. नमस्कार सर मला अळंबी शेती करायची आहे मला याविषयी मार्गदर्शन करा
    बाळकृष्ण पीतांबरे -9637739804

  11. नमस्कार सर। मला अळम्बी शेती करायची आहे। कृपया आपले मार्गदर्शन दया। maza मोब न 9552706449

  12. नमस्कार सर मला अळंबी व्यवसाय करायचा आहे मला याविषयी मार्गदर्शन करा.मी पुणे येथे राहतो
    ९७६४३१००८१

  13. मला घरी आळंबी शेती करायची आहे. आपले मार्गदर्शन व बियाणं पाहिजे. आवश्यक ती माहिती व फोन नंबर पाहिजे. 9763539013

  14. मला घरी आळंबी शेती करायची आहे. आपले मार्गदर्शन व बियाणं पाहिजे. आवश्यक ती माहिती व फोन नंबर पाहिजे. ९६६३१६८९७१
    कोल्हापूर मधील चंदगड मध्ये
    मी राहतो . येते वातावरण थंड आहे . कृपया मला मददत करा तुमचा नंबर द्या.

    .

  15. सर मला ऑईस्टर अळंबीचे स्पॉन कुठे मिळेल सांगा हि आग्रहाची विनंती माझा मो ८६९८२७६५२८ सर

Leave a Reply to नितीन गावडे Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version