Home टॉप स्टोरी राज, माहिती घ्या आणि नंतरच बोला!

राज, माहिती घ्या आणि नंतरच बोला!

5

दिनांक १५ फेब्रुवारी, २०१३ रोजी श्री. राज ठाकरे यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी एक तथाकथित अहवाल वाचून दाखविला. त्यानंतर.. ‘‘हे त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे. हे जर मालवणमधले असेल तर हे नारायण राणेंबद्दल आणि त्यांच्या इतर लोकांबद्दलच त्यांनी लिहिले असणार. जर तसे नसेल तर नारायणराव राणे यांनी याचा खुलासा करावा,’’ असे वक्तव्य श्री. राज यांनी केले.

भरगच्च एस.टी. बसमध्ये श्री. शैलेश माळवदे यांना कोणी एक कांदळगांवकर भेटले, तेही जमिनीचा व्यवहार करणारे. त्याशिवाय रिटायर्ड तलाठी. त्यांचे पूर्ण नाव नाही. ओरोस येथे जैतापूर कॉलनीमध्ये त्यांच्या वर्णनाचे कोणीतरी कांदळगांवकर राहतात. मालवणच्या जवळपास नाही. अशा कांदळगांवकर यांनी दिलेल्या ऐकीव माहितीवर फेलोशिप मिळालेल्या माळवदे यांच्यासारख्या व्यासंगी पत्रकाराने हे लिखाण केले. कांदळगांवकर सांगतात. दमदाटी करून मालवणात बंगला रिकामा करून घेतला. तो बंगला आहे कुठे? मालक कोण? घटना कधी घडली? घटनेची पोलिसात तक्रार दिली का? याची कोणतीही माहिती नाही. फेलोशिप मिळालेल्या व्यासंगी पत्रकाराने असे निराधार लिखाण करून जनतेच्या मनात संशय निर्माण करणे, शोभा देणारे नाही, असे माझे मत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरील स्थानिक लोकांनी जमिनी विकल्या व आजही विकत आहेत. मला विचारून किंवा सांगून हे व्यवहार होत नाहीत. भारतीय नागरिकाला राज्य घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे कोठेही जमीन घेण्याचा व विकण्याचा अधिकार आहे. या अधिकाराप्रमाणे सगळीकडे जमिनीचे व्यवहार होतात. श्री. माळवदे व श्री. कांदळगांवकर यांच्या चर्चेमध्ये कोणाला दमदाटी करून जमीन विकण्यास भाग पाडल्याची एकही तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल असल्याचा उल्लेख नाही. महत्त्वाचे हे की, राज्यात गुन्ह्यांचे सर्वात कमी प्रमाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे.

एस.टी.मधल्या ओळखीच्या बळावर श्री. माळवदे यांनी श्री. कांदळगांवकर यांनी इमानेइतबारे चाकरी केल्याचा दाखला दिला. त्यांनी दिलेल्या माहितीवरून श्री. माळवदे यांना सिंधुदुर्गातील परिस्थिती भयावह वाटली. हे सर्व ऐकताना, हे सर्व लिहिताना, कोकण विकासाचे चित्र त्यांना दिसलेच नाही, याला काय म्हणावे! ज्या रस्त्याने ती एस.टी. जात होती, तो रस्ता तरी त्यांनी पाहावा. सिंधुदुर्गातील शिक्षण व्यवस्था, प्रत्येक तालुक्यात इंग्रजी शाळा, आय.टी.आय., इंजिनीअरिंग, डेअरी आणि उद्यानविद्येची कॉलेजेस आणि येणारे मेडिकल कॉलेज हे सर्व कांदळगांवकरांच्या बोलण्यात का आले नाही? विमानतळ, रेडी बंदर, सी-वर्ल्ड, गार्मेट इंडस्ट्रीज, आय.टी. पार्क, हायवेचे चौपदरीकरण हे सर्व निवृत्त सरकारी नोकर श्री. कांदळगांवकर कसे विसरले? गरीब म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नामध्ये पाचव्या क्रमांकावर आला, तो कांदळगांवकरांमुळे की माळवदे यांच्यामुळे? श्री. शैलेश माळवदे यांचा लेख कोकणाच्या विकासाची माहिती देणारा नसून आकसाच्या दृिष्टकोनातून लिहिला गेला आहे. देशामध्ये सिंधुदुर्ग हा पहिला ई-ऑफिस जिल्हा झाला, हे सुद्धा या व्यासंगी पत्रकारास दिसले नाही. त्यामुळे मी त्यांच्या लिखाणावर प्रतिक्रिया पूर्ण करून श्री. राज यांच्याकडे वळतो.

श्री. राज सिंधुदुर्गात आल्यानंतर त्यांना हा तथाकथित अहवाल व भयावह परिस्थिती समजली. त्यांनी मला फोन केला असता, तर बरं झाले असतं. मी त्यांना खुलासेवार माहिती, ती माहिती देणा-याच्या पूर्ण तपशिलासह दिली असती. तसे न करता, श्री. राज जाहीर सभेत बोलले. राजकीय नेत्यांचे पुराव्याशिवाय चारित्र्यहनन करणे हा एकच कार्यक्रम राबवून स्वत:ची तुंबडी भरणे हा ‘एबीपी माझा’सारख्या चॅनेल्सचा नित्यक्रम झाला आहे. श्री. राज यांच्या वक्तव्याला अतिरंजित फोडणी देऊन या चॅनेलवर बदनामीकारक हेडलाइन्स झळकविण्यात आल्या. टीआरपीसाठी कोणाची नाहक बदनामी होते याचे त्यांना सोयरसूतक असण्याचे कारण नाही.

मी पालकमंत्री असेपर्यंत माळवदे लिहितात तशा घटना घडू शकतील यावर श्री. राज यांनी विश्वास ठेवावयाला नको होता. खासगी जागा बाजारभावाने विकत घेऊन कॉलेजेस्, बचत गटांच्या जिल्हा शिखर संस्थेसाठी भव्य इमारत असे सार्वजनिक उपक्रम मी जिल्ह्यात सुरू केले. या उपक्रमांमध्ये हजारो युवक-युवतींना शिक्षणाच्या, रोजगाराच्या व नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. असे असताना बिनबुडाचे पोकळ आरोप करून लांच्छन लावण्याचा प्रयत्न शोभादायक नाही. मी कोणाची एक इंच जरी जमीन बळकावली, असे पुराव्यानिशी दाखवून दिले तर एक दिवससुद्धा मी सार्वजनिक जीवनात राहणार नाही. आता एवढेच पुरे!

– नारायण राणे

5 COMMENTS

  1. राणे साहेब,
    तुम्ही केलेला खुलासा तुमच्या व्यक्तीमत्वाला शोभणारा नाही. कोकणातील तुमचे कार्य आणि स्थानिक राजकारणावरील तुमची पकड निर्विवादच.. राज यांना मिडीया मॅनेजमेंड चांगलीच जमते. काय बोलले म्हणजे हेडलाईन होईल,याचे त्यांचे कसब खरोखर वाखाणण्याजोगे आहे. म्हणून तर त्यांनी शिवसेनेविषयी शब्दही न उच्चारचा आपल्याला टीकेचे लक्ष्य केले.
    आपणही त्यांना ब्रकींग न्यूजनेच उत्तर दिलेले आम्हाला आवडेल.
    – रवींद्र खैरनार

  2. आरोप सगळ्यांच्या वर होत असतात पण साहेब तुम्ही खूपच मनाला लावून घेतलेत.
    बातम्या येतेच असतात, त्याच पद्धतीने आपण उत्तर दिले पाहिजे होते.
    आणी मिडिया अंगावर घेवू नका .मिडिया आपले काम करत असते .

  3. SAHEB AAMHI SWATA COLLEGE LA ASTANA AAMCHYA DISTRICT HOT HOTA TOH VIKAS BAGHITALA AAHE AAMHE SIR AAMHALA BOLAYCHE KI JAR EKHADI PREGNANT LADIES LA JAR SINDHUDURGACHYA ROAD VARUN GHEUN HOSPITAL LA JAAT ASAL TAR RASTYATACH DELIVER HOIL MHANUN. N AAJ AAMHI GAVI JATO TAR AAMCHYA GHARAPARYANT ROAD AAHE TO PAN EKDAM CHANGALA HE JARA TIKA KARRAANA BAGHAYLA SANGA.

    SAHEB KUTRI KITIHI BHUNKALI TARI AAMHI TUMCHYA SATH KADHI SODNAR NAAHI.
    MAZE VADIL KAYAM TUMCHYA SOBAT RAHILE AGADI MAREPARYANT. KARAN TE KAYAM MHANAYCHE SINDHUDURG CHA VIKAS JAR KONI KARU SHAKEL TAR TE FAKT TUMHICH N TUMHICH.

Leave a Reply to vijaykumar swami Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version