Home Uncategorized गिरीराज कोंबडी पालन करताना हे ध्यानात घ्या

गिरीराज कोंबडी पालन करताना हे ध्यानात घ्या

15

आपल्या देशामध्ये कोंबडीपालन हा व्यवसाय मोठय़ा शहरांपर्यंतच मर्यादित राहिला आहे. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागामध्ये लोकांना मांसयुक्त व अंडीयुक्त आहाराची कमतरता आहे.

आपल्या देशामध्ये कोंबडीपालन हा व्यवसाय मोठय़ा शहरांपर्यंतच मर्यादित राहिला आहे. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागामध्ये लोकांना मांसयुक्त व अंडीयुक्त आहाराची कमतरता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अंडी व कोंबडयांचे मांस जास्त पैसे देऊन विकत घ्यावे लागते. आपल्या देशातील पारंपरिक आहारामध्ये पौष्टिक तत्वे कमी असतात आणि प्रथिने यांचे प्रमाण कमी आहे.

म्हणून ग्रामीण जनता पूरक आहार बिन्स व डाळयुक्त आहारावर अवंलबून असते. अशारितीने ग्रामीण जनता प्रोटीनयुक्त आहारापासून वंचित राहत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक प्रकारचे रोग, कुपोषणाचा प्रश्न भेडसावत आहे. याचा प्रभाव विशेषकरून गर्भवती, स्तनपान करणा-या मातांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये दिसून येतो.

ग्रामीण भागात कोंबडी पालन व्यवसायाच्या विकासावर सरकार भर देत आहे. वास्तविक पाहता शहरामध्ये अंडी व मातांची उपलब्धता चांगली असूनसुद्धा ग्रामीण क्षेत्रातून उत्पादित केलेल्या अंडयांना व कोंबडयांना अधिक चांगल्या दराने मागणी येते.

यासाठी आपल्या देशात अधिक प्रतीकार शक्ती असलेल्या व ग्रामीण क्षेत्रामध्ये अधिक टिकाऊपणे राहतील अशा विविध रंगांतील जाती विकसित करून त्यावरती संशोधन चालू आहे.

या संशोधनातून निर्माण झालेली एक जात म्हणजे ‘गिरीराज’ ही होय. या जातीमधील नरपक्षी १० ते १२ आठवडयांत जास्तीत जास्त वजन देतात, त्याचप्रकारे मादी पक्षीसुद्धा १५० अंडी प्रतिवर्षी मुक्त पद्धतीत देतात. ग्रामीण क्षेत्रात उपलब्ध असणा-या वनस्पती व पूरक खाद्यावरती ही जात उत्तम प्रकारे वाढू शकते.

या मुक्त पद्धतीने वाढणा-या कोंबडय़ा, त्यांना आवश्यक असणारी प्रथिने कीटकांपासून मिळवतात. त्यामुळे त्यामधील ऊर्जेमध्ये कमतरता असू शकते. त्यासाठी विविध धान्यापासून खाद्य उपयुक्त आहे. देशी कोंबडीसुद्धा गिरीराज या जातीचे अंडी उबवू शकतात.

15 COMMENTS

  1. मला गिरीराज पालन करायचे आहे, त्या बद्दल माहिती व ते कसे करायचे… आणि ते कसे मिळतील, यवतमळ मध्ये मिळतील का.. 9130661375

    • हो. कृषी विज्ञान केंद्र ,वाघापूर रोड यवतमाळ येथे संपर्क साधा आणि नवनवीन जातीचे पक्षी उच्चं उत्पादन असलेले कोंबडीच्या जाती मिळवून घेऊया…धन्यवाद ….डॉ.पंकज राठोड

  2. मला गिरीराज कोंबडी palan करायचे आहे तर मला त्या विषयी माहिती द्यावी मी सातारा मादे राहतो माजी पोल्ट्री १००/३० ची आहे

  3. गिरीराज कोंबड्याच्या खाण्या विषयी माहिती पाहिजेय. त्यांना कोणत्या प्रकारचे खाणे घालावे ?

  4. मला अलिबाग रायगड येथे गिरीराज कोंबड्याच्या व्यवसाय सुरु करायचा आहे. मला त्या बद्दल सर्व माहिती कुठे मिळेल ? तसेच कुक्कुट पालनाचे प्रशिक्षण कुठे मिळेल याची माहिती देणे

  5. मला गिरीराज कोंबडी पालन करायचे आहे तर मला त्या विषयी माहिती द्यावी
    मी अमरावतीला राहतो माझा मो. ९४०३६२२१४५

  6. मला गिरीराज कोंबडी पालन करायचे आहे तरी मला त्या एका पिल्लाची किंमत किती व त्या बद्दल माहिती हवी आहे
    नाव- अभिमान गायकवाड उपळवटे ता, माढा जि,सोलापूर
    मो, ९६७३०६८६८९
    मो, 9637252014

  7. मला गिरीराज कोंबडी पालन करायचे आहे तर १क पिलाची किंमत व त्याबद्दल माहिती हवी होती

  8. मला गिरीराज कोंबडी पालन करायचे आहे तरी मला त्या एका पिल्लाची किंमत किती व त्या बद्दल माहिती हवी आहे

  9. मला गिरीराज कोंबडी पालन करायचे आहे तरी मला त्या एका पिल्लाची किंमत किती व त्या बद्दल माहिती हवी आहे
    माझा न. ९६०४४८८५८६

  10. मला अंडी व्यवसायासाठी वनराज गिरिराज जातिचे गावरान कोंबड्या पुण्यात पाहिजे.कोठे मिळेल?
    8888824928

Leave a Reply to Sohrab Desai Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version