Home टॉप स्टोरी महाड दुर्घटनेतील दुसरी एसटी बस सापडली

महाड दुर्घटनेतील दुसरी एसटी बस सापडली

2

महाड दुर्घटनेत वाहून गेलेली दुसरी बसही सापडली. नौदलाच्या शोधकार्य पथकाला ५०० मीटर अंतरावर ही बस सापडली आहे.

महाड- महाड दुर्घटनेत वाहून गेलेली दुसरी बसही सापडली. नौदलाच्या शोधकार्य पथकाला शनिवारी सकाळी ही बस ५०० मीटर अंतरावर सापडली आहे.

दोन दिवसांपुर्वी राजापूर-बोरिवली पहिली बस सापडली असून ती क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. तर तब्बल ११ दिवसानंतर कोसळलेल्या पुलापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर दुसरी अपघातग्रस्त एसटी बस सापडली.

२ ऑगस्टच्या मध्यरात्री महाडमधला सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्यामुळे अपघात झाला. घडलेल्या या दुर्घटनेत दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडी वाहून गेली होती. यातील ४१ बेपत्ता प्रवाशांपैकी २६ जणांचे मृतदेह सापडले असून १५ प्रवासी बेपत्ता आहेत.

[EPSB]

महाड दुर्घटनेतील एसटीचे सांगाडे सापडले

महाड दुर्घटनेत बेपत्ता झालेली एसटी बस नऊ दिवसांनंतर पुलापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर सापडली. [/EPSB]

2 COMMENTS

Leave a Reply to विशाल Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version