Home टॉप स्टोरी आंबेडकर भवन गुपचुप पाडले

आंबेडकर भवन गुपचुप पाडले

1

दादरमधील आंबेडकर भवनची इमारत रात्री गुपचुप पाडण्यात आल्याने आंबेडकरांच्या कुटुंबियांनी जोरदार विरोध करत पाडकामाचा निषेध केला.

मुंबई- आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ऐतिहासिक वास्तूमधून १९४७ साली बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस सुरू केली त्या दादरमधील डॉ. आंबेडकर भवनावर शनिवारी मध्यरात्रीनंतरच्या अंधारात बुलडोझर फिरवण्यात आला. दोन बुलडोझर आणि पाचशे ते सहाशे सुरक्षारक्षकांचे बळ वापरून ही कारवाई करण्यात आली. यावेळी आंबेडकर भवनातील काही कर्मचा-यांनाही मारहाण झाल्याचे वृत्त आहे.

आंबेडकर भवनापासून हाकेच्या अंतरावरील भोईवाडा पोलिसांना या कारवाईचा काहीच मागमूस नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या कारवाईमागे राज्याचे माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांचा हात असून त्यांना राज्यातील भाजपा सरकारचा पाठिंबा आहे, असा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.

गायकवाड यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यासमोर फडणवीस सरकार आणि रत्नाकर गायकवाडांविरोधात घोषणा देत पाच तास आंदोलन केले. गायकवाड यांना हाताशी धरून राज्यातील भाजपा सरकार आंबेडकरी चळवळीचे केंद्र उद्ध्वस्त करू पाहत आहे, ते आंबेडकरी जनता कदापि सहन करणार नाही. आरोपींवर तत्काळ कारवाई न झाल्यास त्याची मोठी किंमत या सरकारला मोजावी लागेल, असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड, श्रीकांत गवारे, योगेश व्हरांडे, नागसेन सोनारे, अभय बांबोले, बोधवडे यांच्यासह ४०० ते ५०० अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत बाबासाहेबांची बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस, भारिप बहुजन महासंघाचे कार्यालय, रिपब्लिकन सेना व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले आहे. या इमारतीतील ऐतिहासिक आणि चळवळीच्या साक्षीदार असलेल्या वस्तू, समाजाला दिशा देणारी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता अशी नियतकालिके छापणारी छपाई यंत्रे सारे मातीच्या ढिगा-याखाली दडपले गेले आहे.

पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टला महापालिकेची नोटीस पण?

दी पीपल्स् इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेला गोकुळदास पास्ता लेन दादर पूर्व येथील आंबेडकर भवनातील जीर्ण इमारत पाडण्याची नोटीस महापालिकेने बजावली होती. ही इमारत वावरासाठी धोकादायक झाल्याचे सांगत ही नोटीस बजावण्यात आली होती. १ जूनला पालिकेने ट्रस्टला रितसर नोटीसही पाठवली होती. त्यानुसार ३० दिवसांच्या आत ही इमारत पाडणे बंधनकारक होते. मात्र शुक्रवारी रात्रीची कारवाई महापालिकेने केली नसल्याचा खुलासा आल्याने ही कारवाई नेमकी कोणी केली? यामागे कोणाचा हात आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

फडणवीस सरकारचे करायचे काय?

आंबेडकर भवनावरील कारवाईचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले असून औरंगाबाद, नांदेड, अकोला, पुणे, दर्यापूर आणि मुंबईतील बहुतांश भागात आंबेडकरी जनतेने तीव्र आंदोलन केले. मुंबई पोलीस, राज्यातील भाजपा सरकार आणि रत्नाकर गायकवाड यांच्या मिलिभगतमुळे आंबेडकर भवन पाडण्यात आल्याचा आरोप होत आहे. याचा संताप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यासमोर सकाळी नऊ ते एक असे सलग पाच तास धरणे धरून व्यक्त केला. यावेळी रत्नाकर गायकवाडचे करायचे काय, खाली डोके वर पाय, फडणवीस सरकार हायहाय, भोईवाडा पोलीस हाय हाय, मोदी सरकार हाय हाय अशा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

आंबेडकर भवनमधून ऐतिहासिक ठेवा चोरीला

आंबेडकर भवन रातोरात जमीनदोस्त करताना या वास्तूतील बुद्धभूषण प्रिटिंग प्रेसमधून बाबासाहेबांनी १९५६ साली स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचा संपूर्ण रेकार्ड (नोंदी) गायब झाल्याचे आनंदराज यांनी सांगितले.

1 COMMENT

  1. अपार कष्टाने,मेहनतीने जिद्दीने, आपल्या अलौकिक बुध्दीमत्ताच्या जोरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला नरकातून बाहेर काढले.हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाही फिरणारे उपकार समाजावर होते व राहतीलच यात तिळमात्र शंका नाही. हे त्रिवार सत्य असले तरी डाॅ. बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांच्या विरोधातच निवडणूक लढणारे आणि परम् पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करणारे लाळचाटे गद्दार समाजाने पाहीले आहेत, अनुभवले आहेत. या गद्दारांची पिलावळ म्हणजे ज्यांनी मुंबई दादर येथील आंबेडकर भवन उध्वस्त केले ते आर.के.गायकवाड आणि त्यांचे गुंड साथीदार होत.
    तुमच्या बापासह तुमच्याही ढूंगणावर थिगळं होती ती थिगळं बाबासाहेबांच्या आशिर्वादाने झाकली.त्यांच्यांच कृपेने तुम्ही कथीत “साहेब” झाले. त्या उपकारांची हरामखोरांनो जाण ठेवा.माजू नका.
    आंबेडकर भवनात नालायकांनो ज्या बाबासाहेबांचं नाव घेण्याची लायकी नाही त्या आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताच्या अॅड. बाळासाहेब आंबेडकर,भीमरावजी, आनंदराज यांच्या द्वारे राजकीय, सामाजिक, धाम्मीक कार्याचे देशातील चळवळीचे केंद्र म्हणून आंबेडकर भवन नावारूपाला आले होते.
    अवलादींनो तुमच्या जवळ तुमच्या बापाच्या कि पापाच्या कमाईचे 50-60 कोटींचे बजेट आहे आणि बाबासाहेबांच्या नावाचा फारच पुळका आहे तर तुम्हाला आंबेडकर भवन सोडून दुसरी जागा नव्हती का रे मुर्खांनो?
    ज्या पध्दतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरा नंतर चळवळ तुम्ही कधी काँग्रेसच्या तर कधी भाजपच्या दावणीला बांधल दावणीला बांधली! आणि समाज, चळवळ खिळखिळी नेस्तनाबूत केली. आणि स्वतःचं चांगभलं करून घेतलं!
    परंतु बाबासाहेब रक्त ते बाबासाहेबांचंच राहणार. अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्ही घालवलेली चळवळीची “पत” परत मिळवली. अरे बाळासाहेबांच्या स्वाभिमानी चळवळीमुळेच तर तुमची किंमत आहे! स्वाभिमानी चळवळ घालवण्यासाठी तर आरएसएस तुम्हाला गोंजारतेय! तुमची लायकी आरएसएसला माहीत आहे. तुम्हाला कधी व किती तुकडा टाकायचा आहे? तुम्ही फेकलेल्या तुकड्यावर भाळले आणि स्वाभिमानी चळवळीचं केंद्र आंबेडकर भवन तुमच्या गुंडांच्या मदतीने उध्वस्त केलं!
    परंतु कथीत शिकले सवरले टाय सुटाबुटातले साहेबकीचा आव आणणारे आणि प्रसंगी स्वतःला प्रती बाबासाहेब समजणारे आर.के.गायकवाड आणि या ***चे साथीदारांनो एक लक्षात ठेवा. … जिवंतपणीच बाबासाहेबांनी तुमच्या सारख्या शिकलेल्या ***ना “चळवळीचा घात करणारे” घातकी म्हणुन संबोधले होते. त्याची प्रचिती आज पुन्हा आंबेडकर भवनाच्या उध्वस्तीकरणानंतर आली आहे. तुमचा खरा बाप .. बोलविता-करविता धनी कोण आहे ? हे समजण्या इतके आंबेडकरी जनता नक्कीच दुधखुळी नाही !
    तुम्ही कितीही बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगीतला.. आणि खुद्द बाबासाहेबांच्या रक्ताच्या वारसांची हेटाळणी-प्रतारणा केली तरीही तुम्ही आंबेडकरी जनतेच्या भायी चळवळीचे- समाजाचे मारेकरी म्हणुनच इतिहास तुमच्याकडे पाहिल.
    जी वास्तु बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाली होती ती ऐतिहासिक वास्तू तुम्ही कोणाताही आचारविचार नाही करता चोरून अर्ध्यारात्री उध्वस्त केली … आंबेडकरी समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार कोण ?
    वाचा आणि विचार करा

    काल मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या मेहनतीने उभारलेले दादरचे आंबेडकर भवन रत्नाकर गायकवाड व त्याच्या भाडोत्री गुंडांकडून उध्वस्त करण्यात आले. आंबेडकर परिवार जेव्हा याच्या अवैध कृत्याच्या विरोधात रस्त्यावर उतरला तर लगेच काही चोरांच्या बोंबा सुरू झाल्या की, बाबासाहेबांनी स्वतःच्या परिवाराला वारस न बनविता त्यांच्या सर्व संस्था, संघटनांचे वारस समाजाला बनविले आहे. रक्ताचे आहेत म्हणून वारस म्हणता येणार नाही. ब्ला ब्ला ब्ला !

    आता या दिडदमडीच्या दिडशहाण्यांनी काही प्रश्नांची उत्तरे द्यावी.
    ( या शब्दात बोलायला व लिहायला नको पण परिस्थितीच तशी आणलीय या *****नी की आता माझे शिक्षण, विद्वत्ता वगैरे वगैरे बाजूला ठेऊनच बोलतो व विचारतो या *****ना…अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर)

    तर सांगा व उत्तरे द्या ? अन्यथा तुमच्या लाथा मारायला समाज येईल.

    १) भारतातल्या कोणत्या कायद्याने समाज किंवा समुह पॉपर्टीचा वारसदार बनतो ?
    २) संस्था, संघटनांवर असणाऱ्या व्यक्ती म्हणजे समाज वारसदार होतो का ?
    ३) संस्था, संघटनांवर असणाऱ्या काही व्यक्ती म्हणजे समाज होतो का ?
    ४) तुम्ही तुमच्या बापाच्या संस्था, संघटनांवर व पॉपर्टी वर समाजाला वारस कधी बनवले आहे का ?
    ५) बाबासाहेबांच्या संस्था, संघटनांवर समाजाला वारस बनविण्यासाठी कोणत्या कायद्याला तुम्ही जन्म दिला ?
    ६) बाबासाहेब आंबेडकरांची PES (पिपल्स् एज्युकेशन सोसायटी) असो की PIT (पिपल्स् इंम्प्रुमेंट ट्रस्ट) असो या संस्थांवर अवैध कब्जा मिळविणारे ५-१० माणसे म्हणजे समाज होतो का ? व ते वारसदार होतात का ?
    ७) या संस्था संघटनांवर ५-१० लोकांचा ताबा म्हणजे समाजाचा ताबा होतो का ? की समाज वारसदार होतो का ? सांगा रे भडव्यांनो…
    ८) वारसानाचा कायदा काय म्हणतो ? व तुम्हाला समाजाच्या नावाचे वारसान पत्र कुणी बहाल केले ?
    ९) कायद्याने लढा म्हणून सांगणारे तुम्ही सारे भाडोत्री ज्यांनी बाबासाहेबांच्या खऱ्या वारसदारांना डावलून चोरांच्या हातात सुत्रे सोपवतांना वारसदाराची कायद्याची व्याख्या तरी तपासली का ?
    १०) रत्नाकर गायकवाड किंवा अन्य ट्रस्टी हे बाबासाहेबांचे वारसदार आहेत का ? ते कसे वारसदार बनले ? हे वारसदार असणे म्हणजे समाज वारसदार होणे आहे का ? यांना कुणी वारसदार बनविले ?
    ११) बाबासाहेबांच्या संस्था, संघटनांवर रत्नाकर गायकवाड, गांगुर्डे, रणपिसे, वऱ्हाडे सारखे ** बसले म्हणजे समाज वारसदार कसा काय ठरतो ? व बाबासाहेब आंबेडकरांचे रक्तच आंबेडकर परिवार या संस्था संघटनांवर असला किंवा आला तर समाज वारसदार राहणार नाही का ?
    १२) नेमका समाज वारसदार म्हणजे कोण ? कुठल्या कायद्याने ? कुठल्या नियमाने ? कसे ठरवणार ?
    १३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉपर्टी, संस्था, संघटनांचा समाज वारसदार आहे. म्हणजे नेमके कोण ? असा काही कायदा या देशात आहे का की हवेवर बाबासाहेबांचे नाव घेणारे वारसदार बनतात ? की तुम्हाला जाणिवपुर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवाराला त्यांच्या प्रॉपर्टी, संस्था, संघटनांपासून दूर ठेवायचे आहे ?

    तुमचे मनसुबे स्पष्ट झालेत. बाबासाहेबांच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारून तुम्हाला तुमच्या सात पिढ्यांची सोय करून ठेवायची आहे. त्यामुळे ‘बाबासाहेबांनी समाजाला वारस बनविले.’ या फसव्या गोष्टींना पुढे करून अनफड, अडाणी समाजाला फसविता व आंबेडकरी परिवाराच्या पाठीशी उभे राहू देत नाही.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिवाराला जितके दिले नाही तितके समाजाला दिले. या जागतिक क्रांतिपुरूषाचे उपकार विसरून आज त्यांच्या पश्चात त्यांनी मागे सोडलेल्या संस्था, संघटना व प्रॉपर्टी चोरांच्या घशात चालल्या. पण आंबेडकर परिवारातील एकही माणूस त्यात येणार नाही याची दक्षता घेऊन, प्रस्थापितांना हाताशी धरून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवाराला षडयंत्रपुर्वक दूर ठेवले. समाजातले तुम्ही अतिविद्वान लोकं बाबासाहेबांना परतफेड म्हणून तरी आंबेडकर परिवाराच्या पाठीशी राहायला पाहीजे होते. परंतु तुम्ही चोरांच्याच पाठीशी गेले. पोट भरायसाठी. आणि तोंड वर करून सांगता की आम्हीच वारस आहोत म्हणून. जरा तुमच्या धमन्यांतले रक्त तपासून या म्हणजे तुम्ही कुणाचे वारस आहात हे कळेल.

    रत्नाकर गायकवाड व इतर ट्रस्टी व संस्था संघटनांवरील सदस्य/पदाधिकारी वारसदार होत असतील व ते त्या संस्था, संघटनांवर राहीले तर समाज वारसदार बनत असेल. तर प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भिमराव आंबेडकर हे त्या संस्था संघटनांचे वारसदार बनले, तर समाज बाबासाहेबांचा वारसदार होणार नाही का ?

    किती डोक्याचा भूगा कराल रे ! तथ्यहीन, अकायदेशीर, अविवेकी, अवास्तविक बाबी पुढे करून तुम्ही चोरांना किती दिवस पोसत राहणार ? व चोरांच्या उलट्या बोंबा केव्हापर्यंत ठोकत राहणार ? बाबासाहेबांच्या उद्देशाला काळीमा फासून त्यांच्या संस्था, संघटनांना पोखरणाऱ्या चोरांना किती पाठीशी घालणार ?

    बापाची पॉपर्टी टिकवून ठेवण्यासाठी पोरं धडपडत असतात. शेजारी नाही. त्यातही बाबासाहेब ज्यांचे खरे बाप व आजोबा आहेत. त्यांची जबाबदारी तर तुमच्यापेक्षा मोठी आहे. त्यामुळे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इस्टेट (वैचारिक वारसा, संस्था, संघटना, ट्रस्ट) टिकवून ठेवण्याची कसरत खरे पोरं व नातवंडेच करू शकतात.
    मा. प्रकाश आंबेडकर स्वतः म्हणतात, “तुम्ही बाबासाहेबांना विकून खाल्ले, व खात आहात. पण मी बाबासाहेबांचा नातू असल्याने ते पण मला करता येत नाही.”
    काय अर्थ प्रतिध्वनित होतो या वाक्यातून ? कळेल का तुम्हाला ?

    बाबासाहेब तुमचाही बाप आहे, वगैरे वगैरे भावनिक आम्हाला सांगू नका. जरा स्वतःचे डिएनए तपासून पहा. किंवा स्वतःच्या खऱ्या बापाला एकदा विचारून या. कानफडात बापाने शेकले की मग संपर्क करा.

    आता थांबतो. परत बाबासाहेबांचे संचित, उद्धरण, वारस, बाप वगैरे वगैरे सांगू नका. बाबासाहेबांनी तुमच्यासाठी केलेल्या उपकाराची परतफेड करायची असेल तर बाबासाहेबांच्या सच्च्या वारसांना साथ द्या. त्यांना बाबासाहेबांच्या संस्था , संघटनांवर येऊ द्या. सहकार्य करा. मग बघा बाबासाहेबांचा उद्देश या चोरांपेक्षा दुप्पटीने सफल होईल. व मरगळ आलेल्या संस्था, संघटना परत नव्याने आंबेडकरी समाजाला व चळवळीला समर्थ खांद्यावर पुढे घेऊन जातील.
    _अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर…
    सच्चे आंबेडकरी अनुयायी असाल तर समाजासमोर हे वास्तव घेऊन जाल. व आंबेडकर परिवाराला न्याय मिळवून देऊन चोरांना त्यांची जागा दाखवून द्याल

Leave a Reply to vishwashanti Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version