दिल्ली निवडणूक: भाजपने पंतप्रधान मोदी, अमित शहांसह ४० स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर
January 15, 2025 10:24 PM
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने बुधवारी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, पियुष गोयल, शिवराज सिंह चौहान यांचाही समावेश आहे. या यादीत खासदार बनलेले अनेक सिनेस्टार जसे मनोज तिवारी, दिनेश लाल यादव, हेमा मालिनी, रवी किशन, हंसराज हंस, स्मृती इराणी यांचाही समावेश आहे.
चौथ्या यादीची प्रतीक्षा
धुक्यात लपेटलेल्या राजधानी दिल्लीत निवडणुकीमुळे मात्र वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होईल तर ८ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. भाजपच्या चौथ्या यादीची प्रतीक्षा आहे. भाजपची ही शेवटची यादी असेल यात ११ जणांचा समावेश असेल. दरम्यान, सध्या पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.
नरेंद्र मोदीजगत प्रकाश नड्डाराजनाथ सिंहअमित शाहनितीन गडकरीपियुष गोयलशिवराज सिंह चौहानमनोहर लाल खट्टरधर्मेन्द्र प्रधानसरदार हरदीप सिंह पुरीगिरिराज सिंहयोगी आदित्यनाथदेवेंद्र फडणवीसहिमंत बिस्वा सरमाडॉ. मोहन यादवपुष्कर सिंह धामीभजन लाल शर्मानायब सिंह सैनीवीरेंद्र सचदेवाबैजयंत जय पांडाअतुल गर्गडॉ. अकला गुर्जरहर्ष मल्होत्राकेशव प्रसाद मौर्यप्रेम चंद बैरवासम्राट चौधरीडॉ. हर्षवर्धनहंसराज हंसमनोज तिवारीरामवीर सिंह बिधूड़ीयोगेन्द्र चंदोलियाकमलजीत सहरावतप्रवीण खंडेलवालबांसुरी स्वराजस्मृति इराणीअनुराग ठाकुरहेमा मालिनीरवि किशनदिनेश लाल यादव (निरहुआ)सरदार राजा इकबाल सिंह